कराड अर्बन बँकेच्या योजनांचा लाभ घ्या 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

बसवेश्वर चेणगे; सांगोला शाखेतर्फे वाहन वितरण उत्साहात 

सांगोला/प्रतिनिधी : – 

कराड अर्बन बँकेच्या विविध कर्ज योजनांचा ग्राहकांनी लाभ घेऊन आपली प्रगती साधावी, असे आवाहन कराड अर्बन बँकेच्या सांगोला शाखेचे शाखा व्यवस्थापक बसवेश्वर चेणगे यांनी केले.

कार्यक्रम : कराड अर्बन बँकेच्या सांगोला शाखेच्यावतीने वाहन वितरण कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शाखेचे सभासद सुनिल महाजन व अधिकारी सूरज जाधव प्रमुख उपस्थित होते.

प्रगतीकडे वाटचाल : श्री. चेणगे यांनी अर्बन कुटुंबप्रमुख  सुभाषराव जोशी, बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाषराव एरम, उपाध्यक्ष समीर जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव, पुणे विभागाचे उपमहाव्यवस्थापक रवींद्र कांबळे व सोलापूर विभागाचे सहाय्यक महाव्यवस्थापक सूरज शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला शाखा प्रगतीकडे वाटचाल करीत असल्याचे सांगितले.

वाहन वितरण : यावेळी शाखेचे खातेदार फैय्याज मुलाणी यांना सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार उमेश महाजन यांच्या हस्ते वाहन वितरण करण्यात आले.

सांगोला तालुक्याच्या प्रगतीमध्ये मोलाची भर : यावेळी बोलताना उमेश महाजन म्हणाले की, कराड अर्बन बँक ही पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य बँक असून ती सांगोला तालुक्याच्या आर्थिक प्रगतीमध्ये मोलाची भर घालेल.

मान्यवरांची उपस्थिती : या कार्यक्रमात याकुब शेख, गणेश हिरोके, राजेश कटकधोंड यांच्यासह ग्राहक वर्ग उपस्थित होते.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

आणखी वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!