डॉ. अतुलबाबा भोसले; विंग, आणे येथे प्रचार दौरा
कराड/प्रतिनिधी : –
कृष्णा विश्व विद्यपीठाच्या शिरवळ कॅम्पसच्या माध्यमातून 2500 लोकांना रोजगार मिळणार आहे. फाइव स्टार एमआयडीसीच्या माध्यमातून आपल्या भागात एखादा आंतरराष्ट्रीय प्रकल्प आणण्याच्या प्रयत्नही करणार असून कराडमधील स्थानिक भूमिपुत्रांना, तसेच युवकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करण्याचा संकल्प माझा असल्याचे आश्वासन डॉ. अतुलबाबा भोसले यांनी दिले.
प्रचार दौरा : विंग (ता. कराड) येथे महायुतीतर्फे भाजपचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले हे प्रचार बैठकीत बोलत होते. यावेळी बाजार समितीचे माजी उपसभापती सुनील पाटील, कृष्णा कारखान्याचे संचालक वसंतराव शिंदे, सयाजी यादव, जयवंत माने, महादेव पाटील, हेमंत पाटील, राजेंद्र खबाले, सचिन पाचपते, हेमंत पाटील, विकास खबाले, बंडा खबाले, संजय खबाले, आबासो खबाले, अमोल पाटील, भिमराव कणसे, धनाजी कणसे, शिवाजी पाटील, श्रीरंग नलवडे, सुरेश खबाले, संभाजी पाटील, विकास होगले यांची प्रमुख उपस्थिती होती.
विंग गावाला 13 कोटी निधी दिला : विंग गावाला 13 कोटी निधी दिला असल्याचे सांगत डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, या निधीतील अनेक कामे सध्या पूर्ण झाली आहेत. गावातील मूलभूत प्रश्न सोडवले जात आहेत. विंग गावाने आम्हाला मोठे सहकार्य केले आहे. कराड दक्षिणला 745 कोटी रुपयांचा निधी महायुतीने दिला असून याच सरकारला आपण निवडून आणुया. यासाठी येत्या 20 तारखेला कमळ चिन्हाच्या समोरील बटन दाबून मला मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केले.
अतुलबाबांनी मोठा विकासनिधी आणला : अतुलबाबांनी 2019 ते 2024 पर्यंत पाच वर्षांत मोठ्या प्रमाणात विकासनिधी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात आणला असल्याचे सांगत सुनील पाटील म्हणाले, सर्व शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या आहेत. कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून आरोग्य सुविधा लोकांना उपलब्ध करून दिली असून करोना काळात त्यांनी लोकांची मोठी सेवा केली आहे. कोणतेही पद नसताना मोठा विकास निधी आणून ते सातत्याने जनसंपर्कात आहेत. परंतु, विरोधी आमदार मतदार संघातील काही गावात 10 वर्षे झाली फिरकलेलेच नाहीत. विरोधकांच्या भूलथापांना लोक भुलणार नाहीत. कराड शहरातून मताधिक्य मिळणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
अतुलबाबांकडे भागाचा विकासाचे व्हिजन : अतुलबाबा यांच्याकडे आपल्या भागाचा विकास करण्याचे व्हिजन आहे. असे सांगत विकास खबाले म्हणाले, अतुलबाबा उमदे व्यक्तिमत असून येत्या काळात अतुलबाबा राज्यातील मोठे नेतृत्व म्हणून पुढे येणार आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी त्यांच्या हात बळकट करूयात.
पक्षप्रवेश : डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या उपस्थितीत विंग येथील युवा नेते विकास खबाले, जगन्नाथ खबाले, विजय खबाले, विठ्ठल माने, शरद घोरपडे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह भाजपामध्ये प्रवेश केला. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी त्यांचे स्वागत केले. सचिन पाचूपते यांनी स्वागत केले. शिंदेवाडीचे सुरेश शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. आभार वसंतराव शिंदे यांनी मानले.
जाहीर पाठिंबा : मौजे आणे, कोळे, विंग याठिकाणी मतदारांसोबत डॉ. अतुलबाबा भोसले यांनी संवाद साधला. आणे वारकरी मंच महाराष्ट्र राज्याचे प्रदेश उपाध्यक्ष ह. भ. प. मधुकर महाराज जाधव यांनी भारतीय जनता पक्ष व महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ.अतुलबाबा भोसले यांना पाठिंबा देत तसे पत्रही सुपूर्द केले. यावेळी सुनील पाटील कृष्णा कारखान्याचे संचालक श्रीरंग देसाई, आणेचे सरपंच किसन देसाई, दादासो पाटील, सुभाष पाटील, सुरेश देसाई, सदाशिव चव्हाण आदींची उपस्थिती होती.