पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर फडणवीस यांनी केलेली टीका लाजिरवाणी बाब

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

शिवराज मोरे; देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचाही घेतला समाचार

कराड/प्रतिनिधी : –

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या जबाबदार नेत्याने भाजपच्या प्रचार सभेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर खालच्या पातळीवरील केलेली टीका टिप्पणी अत्यंत निंदनीय व लाजिरवाणी बाब आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, यशवंतराव मोहिते, पी. डी. पाटील, विलासकाका पाटील – उंडाळकर, तसेच पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब पाटील यांनी कराडचा सुसंस्कृतपणा जोपासण्याचे काम केले. परंतु, गेल्या काही वर्षांपासून भाजपचे लोक कराडची संस्कृती बिघडवण्याचे काम करत असून त्याला देवेंद्र फडणवीस यांच्याकडून खतपाणी घातले जात असल्याचा आरोप महाराष्ट्र युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे यांनी पत्रकार परिषदेत केला.  

म्हणून… महामोर्चा रद्द : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा काँग्रेसतर्फे निषेध नोंदवत महामोर्चाची हाक देण्यात आली होती. परंतु, आचारसंहितेमुळे प्रशासनाने मोर्चाला परवानगी नाकारली. कराच्या निवडणुकीला कधीही वेगवेगळे लागले नाही. त्यासाठी आम्हीही महामोर्चा काढला नाही, असेही श्री. मोरे यांनी स्पष्ट केले.

मुळ जागी पुनर्वसन शक्य नव्हते : माजी मुख्यमंत्र्यांनी कराडला फुटकी कवडी दिली नाही, त्यांना झोपडपट्टी हटवता आली नाही, या ना. फडणवीस यांचा समाचार घेताना श्री. मोरे म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना झोपडपट्टी वासियांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला. परंतु, संबंधितांनी आहे त्याच जागेवर घरे बांधून देण्याचा अट्टाहास धरला. त्यात अनेक तांत्रिक अडचणी होत्या. तसेच सदर खाजगी जागेवर न्यायालयात दावा सुरू असल्याने त्याच ठिकाणी पुनर्वसन होणे शक्य नव्हते.

कराडकरांची दिशाभूल : खरेतर, 2016 मध्ये जनशक्तीच्या माध्यमातून कराड नगरपालिकेची निवडणूक लढवण्यात आली. परंतु, निवडून आल्यानंतर नगरसेवकांनी भाजपची साथ दिली. न्यायप्रविष्ट बाब बदलून भाजपच्या नगराध्यक्षा, मुख्यमंत्री आणि पंतप्रधान असतानाही त्यांनी झोपडपट्टी वासियांचे पुनर्वसन का केले नाही, असा सवालीही त्यांनी उपस्थित केला. पालिका निवडणुकीत प्रसिद्ध केलेल्या शब्द नावाच्या जाहीरनाम्यातील एकही विकासकाम केलेने नाही. त्यामुळे त्यांच्याच आवाहनानुसार भाजप उमेदवाराला मते मागण्याचा कोणताही नैतिक अधिकार नसून कराडकरांची दिशाभूल केलेल्या उमेदवाराला जनता कदापि साथ देणार नाही.

बिनबुडाचे आरोप : कराड पालिकेतील भाजपचा नाकर्तेपणा सांगताना श्री. मोरे म्हणाले, नवीन सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे काम झाले नाही. चोवीस बाय सात पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी काहीही प्रयत्न केले नाहीत. याउलट ही योजनाच आता चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे. त्यामुळे शुद्ध पाणी देण्यात पाच वर्षांत नगरपालिकेला पर्यायाने भाजपला अपयश आले आहे. शहराला स्ट्रीट लाईट देणे त्याचे सुशोभीकरण करणे अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करणे या गोष्टीही भाजपला पूर्ण करता आल्या नाहीत. तेच लोक आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर बिनबुडाचे आरोप करत आहेत. त्यामुळे कराडकरच त्यांना त्यांची जागा दाखवून देतील, असेही त्यांनी सांगितले. 

 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

आणखी वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!