कराड दक्षिणची निवडणूक महिला आणि युवकांच्या हातात 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

डॉ. अतुल भोसले; कराड मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्‌घाटन

कराड/प्रतिनिधी : – 

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजप – महायुतीचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांना कराड शहरासह ग्रामीण भागात मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. ही निवडणूक महिला आणि युवावर्गाने हातात घेतली असून त्यांनी परिवर्तन करण्याचा निश्चय केला आहे. त्यामुळे या निवडणुकीत डॉ. अतुलबाबांचा विजय निश्चित आहे, असा ठाम विश्वास कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी व्यक्त केला.

कराड : भाजप – महायुतीचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाच्या उद्‌घाटनप्रसंगी कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले.

कराड मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्‌घाटन : कराड शहरातील कृष्णा नाका परिसरात डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री खा. भगवंत खुबा, आ. श्रीकांत कुलकर्णी, माजी आ. आनंदराव पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

कराडला राज्यातील मोठी बाजारपेठ  करण्याचा प्रयत्न : कराड शहराचा आणि एकूणच कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगिण विकास होण्यासाठी गेल्या वर्षभरात डॉ. अतुलबाबांनी चांगले प्रयत्न केल्याचे सांगत याप्रसंगी बोलताना डॉ. सुरेश भोसले म्हणाले, विशेषतः स्टेडियम, वाखाण रोड, कराड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनची दुरुस्ती, दैत्यनिवारणी मंदिर संरक्षण भिंत अशा कामांसाठी कोट्यवधींचा निधी महायुती सरकारच्या माध्यमातून आणण्यात ते यशस्वी झाले आहेत. एवढेच नव्हे, तर येत्या काळात कराडला राज्यातील मोठी बाजारपेठ उभी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

कराडला सर्वसमावेशक नेतृत्व मिळणार : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाला डॉ. अतुल भोसले यांच्या रूपाने सर्वसमावेशक नेतृत्व मिळणार असल्याचे सांगत माजी आ. आनंदराव पाटील म्हणाले, त्यामुळे या निवडणुकीत प्रत्येकाने आपण स्वतः उमेदवार आहोत, असे समजून अतुलबाबांच्या विजयासाठी हिरीरीने प्रयत्न करावा.

मान्यवरांचे मार्गदर्शन : यावेळी माजी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, शिवसेनेचे शहराध्यक्ष राजेंद्र माने, माजी नगरसेविका स्मिता हुलवान, जैन समाज संघाचे कांतीलाल जैन यांनी मार्गदर्शन केले.

विशेष उपस्थिती : कार्यक्रमाला कृष्णा कारखान्याचे व्हा. चेअरमन जगदीश जगताप, संचालक निवासराव थोरात, श्रीरंग देसाई, कराडच्या माजी नगराध्यक्ष रोहिणी शिंदे, माजी उपनगराध्यक्ष सुभाष डुबल, माजी नगरसेवक आप्पा माने, सुहास जगताप, महादेव पवार,  विजय वाटेगावकर, विनायक पानस्कर, रणजित पाटील, मुकुंद चारेगावकर, एकनाथ बागडी, शुभम लादे, सुलोचना पवार, बापू घराळ, गिरीश शहा, विष्णू पाटसकर, प्रशांत कुलकर्णी, स्वाती पिसाळ, जय शहा, भरत पाटील, अजय पावसकर, भारत जंत्रे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

आणखी वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!