महायुतीच्या दक्षिणेतील उमेदवाराला यशवंत विकास आघाडीचा पाठिंबा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

राजेंद्रसिंह यादव; कराड शहर व तालुक्याच्या विकासासाठी प्रयत्नशील 

कराड/प्रतिनिधी : – 

कराड शहर व तालुक्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली यशवंत विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही कार्यरत आहोत. सध्या होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका महायुतीतील शिवसेना (शिंदे गट), भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) व अन्य घटक पक्षांच्या माध्यमातून लढवण्यात येत आहेत. आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीचा धर्म पाळण्याचा आदेश दिला असून त्यानुसार महायुतीचे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार डॉ. अतुल भोसले यांना आम्ही जाहीर पाठिंबा देत असल्याची घोषणा यशवंत विकास आघाडीचे गटनेते राजेंद्रसिंह यादव यांनी केली.

पत्रकार परिषद : कराड दक्षिणमधील महायुतीच्या उमेदवाराला अधिकृतपणे जाहीर पाठिंबा देत असल्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. माजी आरोग्य सभापती विजय वाटेगावकर, हणमंतराव पवार, स्मिता हुलवान त्यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

कराड दक्षिण मतदारसंघ समन्वयक म्हणून जबाबदारी : सध्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेचे माध्यमातून कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी महायुतीचे समन्वयक म्हणून माझी निवड करण्यात आली असल्याचे सांगत श्री. यादव म्हणाले, महायुतीतील सर्व घटक पक्ष, गटतट, पदाधिकारी यांच्यात समन्वय साधण्याची जबाबदारी माझ्यावर देण्यात आली आहे. विधानसभेत महायुतीचे सरकार आल्यावर शहराचा  कायापालट करण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

300 ते 350 कोटींची कामे प्रस्तावित : कराड शहराच्या विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माझ्यासह यशवंत विकास आघाडीतील सहकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केल्याचे सांगत श्री. यादव म्हणाले, त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी शहराच्या विकासासाठी 100 कोटींचा निधी देण्याची ग्वाही दिली होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. श्रीकांत शिंदे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि खा. उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल 209 कोटींचा निधी मिळाला आहे. यावरच न थांबता येणाऱ्या काळात 300 ते 350 कोटींच्या निधीची कामे प्रस्तावित आहेत. त्यापेक्षा आणखी जास्त निधी आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. 

परिस्थितीनुसार नगरपालिकेची वाटचाल ठरवू 

सध्या महायुती म्हणून विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही काम करत आहोत. अजून नगरपालिका निवडणुका दूर आहेत. परंतु, नगरपालिका निवडणुकीवेळी तत्कालीन राजकीय परिस्थिती आणि स्थानिक राजकारण यांनुसार आपली भूमिका वाटचाल ठरवणार असल्याचे सूचक विधानही माध्यमांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना श्री. यादव यांनी केले. 

शहराच्या विकासासाठी ड्रीम प्रोजेक्ट 

शहरासाठी आणलेल्या विकासनिधीतून शहराच्या वाढीव भागात 195 कोटी रुपयांच्या निधीतून आरसीसी रस्ते व गटर बांधण्यात येणार आहेत. तसेच 9 कोटी रुपयांच्या निधीतून शहरातील 5 उद्यानांचे सुशोभीकरण करण्यात येणार असून अन्य 2 नवीन उद्यानांची निर्मिती करण्यात येणार आहे. यासह सोलर प्लांट, 24 बाय सात नळ पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करणे व अन्य कामे मार्गी लावण्यात येणार असल्याचे सांगत शहराच्या विकासात हे ड्रीम प्रोजेक्ट महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार असल्याचा विश्वासही श्री. यादव यांनी यावेळी व्यक्त केला. 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

आणखी वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!