कराड रोटरी क्लबकडून प्रशिक्षण; विद्यार्थिनींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद
कराड/प्रतिनिधी : –
रोटरी क्लब ऑफ कराड यांच्यावतीने सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालय आणि कृष्णा कॉलेज ऑफ फार्मसी ऑडिटोरियम यामध्ये सेव्ह गर्ल सेफ गर्ल, नवदुर्गा नारीशक्ती अभियान अंतर्गत किशोरवयीन मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात आले.
सांगली येथील अमोल ढोबळे व त्यांच्या टीमने प्रात्यक्षिकद्वारे उपस्थित विद्यार्थिनींना स्वसरंक्षण कसे करावयाचे, हे सोप्या पद्धतीने सांगून त्यांच्याकडून प्रात्यक्षिके करुन घेतले. या प्रशिक्षणास विद्यार्थिनींकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
‘उंच माझा झोका’ : कृष्णा कॉलेज ऑफ फार्मसी येथे झालेल्या प्रशिक्षणास कृष्णा फार्मसीच्या सौ. मोनाली उपरे यांनी स्वागत केले. रो. किरण जाधव यांनी सुत्रसंचालन केले. रो. डॉ. अस्मिता फासे यांनी प्रास्ताविक केले. दीदी फौंडेशन व रिस्की फायटर मार्शल आर्ट अॅकॅडमी सांगलीचे अमोल ढोबळे यांची ओळख रो. डॉ. भाग्यश्री पाटील यांनी करुन दिली. कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे डीन डॉ. नामदेव जाधव यांनी मनोगत केले. रो. डॉ. रुपाली देसाई यांनी ‘उंच माझा झोका’ ही प्रतिज्ञा उपस्थित विद्यार्थीनींकडून म्हणवून घेतली. रो. सौ. शुभांगी पाटील यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी 400 विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
मान्यवरांची उपस्थिती : यावेळी रोटरी क्लब ऑफ कराडचे अध्यक्ष रो.रामचंद्र लाखोळे, सचिव रो. आनंदा थोरात, रो. गजानन कुसुरकर, रो. डॉ. रूपाली देसाई, रो. पल्लवी यादव, सौ. अनुराधा टकले, रो. प्रताप मोरे उपस्थित होते.
नवदुर्गा नारीशक्ती अभियान :
सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज, कराड येथे रोटरी क्लब ऑफ कराड व कराड प्रसूति आणि स्त्री रोग सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने नवदुर्गा नारीशक्ती अभियानातर्गंत किशोरवयीन मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात आले. अमोल ढोबळे व त्यांची टीमने प्रात्यक्षिकाद्वारे उपस्थित विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे देऊन प्रत्यक्ष करून घेतली.
विद्यार्थिनींना सखोल मार्गदर्शन : याप्रसंगी रो. डॉ. भाग्यश्री पाटील व डॉ. प्रीती देशपांडे यांनी मुलींना स्वसंरक्षणाबरोबरच आरोग्याची निगा कशी राखावी, याचे सखोल मार्गदर्शन केले. प्रा. इ. क. पाटील यांनी स्वागत केले. रो. किरण जाधव यांनी सुत्रसंचालन केले. रो. डॉ. अस्मिता फासे यांनी प्रास्ताविक केले. रो. पल्लवी यादव यांनी ओळख करुन दिली. सद्गुरु गाडगे महाराज कॉलेजच्या उपप्राचार्य सौ.माधुरी कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. रो. रामचंद्र लाखोले यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी 370 विद्यार्थिनी उपस्थित होत्या. याप्रसंगी रो. डॉ. राहुल फासे, रो. डॉ. शेखर कोगणूळकर, रो. आनंदा थोरात, हर्षला देशमुख उपस्थित होते.