निवडणूक आयोगाच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

पी. सेंथील यांच्या आदेश; कराड उत्तर व दक्षिणच्या निवडणूक कामकाजाचा घेतला आढावा

कराड/प्रतिनिधी : –

विधानसभा निवडणूक 2024 अंतर्गत भारत निवडणूक आयोग नवी दिल्ली यांच्यावतीने नियुक्त केलेले निवडणूक खर्च पडताळणी निरीक्षक पी. सेंथील यांनी 259 कराड उत्तर260 कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघास भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. याप्रसंगी त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निर्णय अधिकारी, तसेच कर्मचाऱ्यांना निवडणूक आयोगाच्या सर्व नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या.

कराड उत्तर मतदारसंघ : नियुक्त निरीक्षक पी सेंथील यांनी कराड उत्तर विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक कार्यालयास भेट देवून निवडणूक प्रक्रियेतील विविध विभागांना त्यांनी भेट देऊन संबंधित विभागांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.
तसेच कामकाजाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विक्रांत चव्हाण,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कल्पना ढवळे उपस्थित होत्या.

कराड दक्षिण मतदारसंघ :

निरीक्षक पी. सेंथील यांनी 260 कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघास भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. यावेळी त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत अतुल म्हेत्रे यांनी पी. सेंथील यांचे स्वागत केले. यावेळी सहा. निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता पवार, पी. पी. कोळी, गटविकास अधिकारी प्रताप पाटील उपस्थित होते.

नोडल ऑफिसर यांची बैठक : दरम्यान, पी. सेंथील यांनी प्रथम कराड दक्षिणच्या निवडणूकीच्या कामासाठी नियुक्ती केलेल्या सर्व पथकातील नोडल ऑफिसर यांची बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेतला. तसेच नियुक्त सर्व नोडल ऑफिसर यांना सेंथील यांनी कामकाजाबाबत आवश्यक त्या सूचना व मार्गदर्शन केले.

विविध कक्षांची पाहणी : त्याचबरोबर त्यांनी लेखा शाखा कक्ष, पत्रव्यवहार कक्ष, उपकोषागार कक्ष, उमेदवार खर्च व भत्ते वाटप कक्ष, माध्यम (मीडिया) कक्ष, व्हिडिओ पाहणी पथक कक्ष, संगणक (आय टी सेल) कक्ष आदी कक्षांना भेट देऊन कामकाजाचा आढावा घेत सूचना केल्या. यापुढेही मतदारसंघामध्ये त्यांचा पाहणी दौरा राहणार असून संपूर्ण विधानसभा निवडणूक कालावधीमध्ये निवडणूक खर्च विषयक बाबींवर नियंत्रण ठेऊन ते आयोगास वेळोवेळी अहवाल सादर करणार आहेत, अशी माहिती खर्च विषयक निरिक्षक सेंथील यांच्यावतीने कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी दिली.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

आणखी वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!