आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त प्रशांत मोहिते यांचा उपक्रम
कराड/प्रतिनिधी : –
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे कार्यकुशल आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त बेलवडे बुद्रुक (ता. कराड) येथील युवा नेते प्रशांतदादा मोहिते मित्र परिवार यांच्या वतीने ‘अतुलसंस्कार’ या उपक्रमांतर्गत सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमास विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
दोन शाळांचा सहभाग : या सुंदर हस्ताक्षर स्पर्धेमध्ये कासेगाव शिक्षण संस्थेच्या बेलवडे बुद्रुक (ता. कराड) येथील ब्रह्मदास विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.













