श्री सिद्धेश्वर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम साजरे

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

मारूल हवेलीत वज्रलेप, मूर्ती प्रतिष्ठापना व सुशोभीकरण कामांचे लोकार्पण

कराड/प्रतिनिधी : –

पाटण तालुक्यातील मारूल हवेली येथील प्राचीन श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांची उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात सांगता झाली. मंदिराच्या विकास व सुशोभीकरणासाठी करण्यात आलेल्या विविध कामांचे लोकार्पणही यावेळी करण्यात आले.

वज्रलेप : माजी खासदार श्रीनिवास पाटील यांच्या मार्गदर्शनातून आणि देणगीतून सिद्धेश्वर पिंडीचा वज्रलेप करण्यात आला असून, पिंडीवर आकर्षक पितळेचे कवच बसविण्यात आले आहे.

प्रतिष्ठापना व नूतनीकरण : श्री पार्वती व श्री दत्त यांच्या मूर्तींची विधिवत प्रतिष्ठापना, गाभाऱ्याचे सुशोभीकरण, तसेच मंदिराच्या प्रवेशद्वाराचे नूतनीकरण करण्यात आले.

होमहवन : कार्यक्रमानिमित्त होमहवन, पूजा-अर्चा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. मारूल गावासह परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन घेतले आणि धार्मिक विधींमध्ये सहभागी होत भक्तिभाव व्यक्त केला.

मान्यवरांची उपस्थिती : या प्रसंगी माजी खासदार श्रीनिवास पाटील, सनबीम शिक्षण समूहाचे अध्यक्ष सारंग पाटील, मिरज संस्थानचे युवराज श्रीमंत माधवराजे पटवर्धन, युवराणी श्रीमंत आनुसयाराजे पटवर्धन, सौ. रचनादेवी पाटील, अंशुमन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व : झीज झालेल्या प्राचीन पिंडीचे पुनरुज्जीवन करण्याचे काम मुर्तीकार प्रसाद परब यांनी कुशलतेने पूर्ण केले असून, वज्रलेप प्रक्रियेद्वारे पिंडीला मूळ स्वरूप प्राप्त करून दिले आहे. या उपक्रमामुळे मंदिराच्या धार्मिक व ऐतिहासिक महत्त्वात अधिक भर पडली आहे.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

error: Content is protected !!