महाराष्ट्र - Jan Swarashtra https://janswarashtra.com Latest News | Top News | Breaking News Sat, 07 Jun 2025 17:56:47 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8.2 https://janswarashtra.com/wp-content/uploads/2024/08/cropped-Add-a-heading-5-32x32.png महाराष्ट्र - Jan Swarashtra https://janswarashtra.com 32 32 निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पद https://janswarashtra.com/archives/5977 https://janswarashtra.com/archives/5977#respond Sat, 07 Jun 2025 17:54:43 +0000 https://janswarashtra.com/?p=5977 पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप; बोगस मतदान व पक्षपाती निर्णयामुळे लोकशाही धोक्यात  कराड/प्रतिनिधी : –  महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मतदारसंख्येत झालेली अचानक वाढ, दुबार व तिबार नावांची भर, आणि मतदानाच्या टक्केवारीत संशयास्पद वाढ या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची भूमिका पूर्णतः संशयास्पद असल्याचा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. पत्रकारांशी संवाद : मुंबईत पत्रकारांशी ते बोलत होते. ... Read more

The post निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पद first appeared on Jan Swarashtra.

]]>

पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप; बोगस मतदान व पक्षपाती निर्णयामुळे लोकशाही धोक्यात 

कराड/प्रतिनिधी : – 

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मतदारसंख्येत झालेली अचानक वाढ, दुबार व तिबार नावांची भर, आणि मतदानाच्या टक्केवारीत संशयास्पद वाढ या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची भूमिका पूर्णतः संशयास्पद असल्याचा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

पत्रकारांशी संवाद : मुंबईत पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी भाजप सरकारने निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करून लोकशाही प्रक्रियेलाच गालबोट लावले असल्याचा दावा त्यांनी केला.

महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिलाच प्रकार : “जय-पराजय हा निवडणूक प्रक्रियेचा भाग असतो, पण पक्षपाती पद्धतीने निकाल वळविण्याचा प्रकार महाराष्ट्रात पहिल्यांदाच इतिहासात घडला आहे,” असे म्हणत त्यांनी निवडणूक आयोगावर थेट टीकाही पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

दुबार नावे वगळली नाहीत : श्री. चव्हाण म्हणाले, लोकसभा ते विधानसभा निवडणूक दरम्यान अवघ्या ४-५ महिन्यांत मतदारसंख्येत लक्षणीय वाढ झाली. एका व्यक्तीचे नाव ३-४ ठिकाणी असूनही आयोगाने ते तपासले नाही, असे उदाहरण त्यांनी स्वतःच्या मतदारसंघातील पाहणीच्या आधारे दिले. “एखाद्या व्यक्तीचे नाव जर ३-४ बूथवर असेल, त्याच्याकडे EPIC कार्ड असेल, तर तो मोकळेपणाने मतदान करू शकतो. आयोगाने ही नावे तपासून वगळायला हवी होती, पण ते केले गेले नाही,” असा आरोपही त्यांनी केला.

गंभीर त्रुटींवर टाकला प्रकाश : पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या लेखाचा संदर्भ देत निवडणूक प्रक्रियेतील गंभीर त्रुटींवर प्रकाश टाकला. राहुल गांधींनी स्पष्टपणे म्हटले आहे की, “मॅच फिक्सिंगसाठी अंपायर फिक्स करावा लागतो, आणि भाजपने तो फिक्स केला आहे.”

काँग्रेसने आक्षेप घेतले होते : निवडणूक आयोगातील प्रमुख अधिकाऱ्यांची निवड ही प्रक्रियेपूर्वी बदलण्यात आली आणि त्याविरोधात काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतले होते. या प्रकरणी काँग्रेससह विरोधी पक्षांनी एकमताने निर्णय घेतला असून, जवळपास १०० हून अधिक पराभूत उमेदवारांनी निकालाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. “न्याय मिळेल की नाही, हे माहीत नाही, पण निवडणूक प्रक्रिया तरी पारदर्शक होईल ही अपेक्षा आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

भाजपवर ‘निवडणूक चोरण्याचा’ आरोप

राहुल गांधींनी त्यांच्या विविध भाषणांत, लेखात आणि परदेश दौऱ्यात महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ‘भाजपने सत्तेचा वापर करून चोरली’ असल्याचा ठाम आरोप केला आहे. तसेच”निवडणूक आयोगाने तात्काळ डुप्लिकेट नावे हटवण्यासाठी ‘डी-डुप्लिकेशन सॉफ्टवेअर’ वापरावे आणि सर्व मतदार यादींची फेरतपासणी करावी,” अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. 

The post निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पद first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/5977/feed 0
कराडमध्ये तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद https://janswarashtra.com/archives/5682 https://janswarashtra.com/archives/5682#respond Sun, 18 May 2025 13:03:57 +0000 https://janswarashtra.com/?p=5682 लोकप्रतिनिधींसह प्रशासकीय अधिकारी कर्मचारी, नागरिक, माजी सैनिकांचा सहभाग  कराड/प्रतिनिधी : – काश्मीर येथील पेहेलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैनिकांनी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. भारतीय सैन्याने दाखवलेल्या पराक्रमाच्या सन्मानार्थ रविवारी कराड शहरात तिरंगा रॅली काढण्यात आली. सहभाग : भाजपचे नूतन जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, आमदार मनोज घोरपडे यांच्या ... Read more

The post कराडमध्ये तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद first appeared on Jan Swarashtra.

]]>

लोकप्रतिनिधींसह प्रशासकीय अधिकारी कर्मचारी, नागरिक, माजी सैनिकांचा सहभाग 

कराड/प्रतिनिधी : –

काश्मीर येथील पेहेलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैनिकांनी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. भारतीय सैन्याने दाखवलेल्या पराक्रमाच्या सन्मानार्थ रविवारी कराड शहरात तिरंगा रॅली काढण्यात आली.

सहभाग : भाजपचे नूतन जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, आमदार मनोज घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या रॅलीत अबालवृध्दांनी सहभाग घेतला. भाजपचे नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनाही रॅलीत प्रशासकीय कार्यालयाजवळ आल्यानंतर सहभाग घेतला.

विजयस्तंभास अभिवादन : रविवारी सकाळी येथील विजय दिवस चौकातील विजयस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करत या तिरंगा रॅलीस प्रारंभ करण्यात आला. या रॅलीमध्ये आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, आमदार मनोजदादा घोरपडे, माजी आमदार आनंदराव पाटील, प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे यांच्यासह माजी सैनिक, विद्यार्थी, एनसीसी कॅडेट, महिला, पोलीस, महसूल, पंचायत समिती, नगरपालिका आदींसह विविध सामाजिक संस्था, सेवाभावी संस्था, भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.

विजय घोषणा : ‘सैनिकों के सन्मान में, हर भारतीय मैदान में’, ‘भारतमाता की जय’, वंदे मातरम् , ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय’ अशा घोषणा देत तिरंगा रॅली निघाली. ही रॅली विजय दिवस चौक येथून बस स्थानक समोरील रस्त्यावरून शिवतीर्थ दत्त चौकात पोहोचली. तेथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून पुढे प्रशासकीय मध्यवर्ती कार्यालयासमोर गेली. तेथे मान्यवरांची मनोगते झाल्यानंतर ही रॅली विसर्जित झाली. या रॅलीत नागरिकांसह माजी सैनिकही सहभागी झाले होते.

सैनिक बांधवांप्रती अभिमान व आदरभाव : याप्रसंगी बोलताना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, पाकिस्तानने पाठवलेल्या अतिरेक्यांच्या माध्यमातून पेहलगाममध्ये निष्पाप लोकांची क्रूर हत्या झाली. त्यांना घरातल्यांसमोर धर्म विचारून गोळ्या घातल्या गेल्या. या अत्यंत निंदनीय प्रकाराविरोधात मोठी संतापाची लाट होती. त्याचे प्रत्त्युत्तर चोख भारतीय सैन्यांने दिले. त्यात पाकिस्तानला गुडघ्यावर आणण्याचे काम आपल्या सैनिक बांधवांनी केले. त्याबद्दल सैनिकांप्रती अभिमान व आदरभावना दाखविण्यासाठी तिरंगा यात्रा काढण्यात आली. भारताने पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यामुळे भारत बददला आहे, हाच संदेश भारतीय सैन्याने दिला आहे. त्यानिमित्ताने त्यांचे आभार व अभिमान दाखविण्यासाठी ही रॅली काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

वीर जवानांचे स्मरण : भारतीय जवानांच्या समर्थनार्थ येथे तिरंगा रॅली काढण्यात आल्याचे संगत आमदार अतुलबाबा भोसले म्हणाले, कराड तालुक्यातून मोठ्या प्रमाणात सैनिकांनी सेनेत कामगिरी बजावली आहे. असंख्य मुले आजही सैन्यात व सीमेवरही सेवा बजावत आहेत. निवृत्त सैनिकांसह देशसेवा करणाऱ्यांना घेवून आम्ही तिरंगा यात्रा काढली. त्यात मोठा उत्साह होती. ऑपरेशन सिंदुरमध्ये ज्या वीर सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्या सैनिकांचे आम्ही येथे स्मरण केले. ऑपरेशन सिंदुरनंतर भारताच्या रक्षणासाठी ज्या काही उपाय योजना केल्या, त्याचे आम्ही या रॅलीव्दारे समर्थन करत आहोत.

भारत मजबूत असल्याचा जगभरात संदेश : भ्याड दहशतवादी कृत्ये करणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवताना भारतीय सैनिकांनी अतुलनीय शौर्य गाजविले आहे, असे सांगत आमदार मनोज घोरपडे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खंबीर नेतृत्वाखाली भारत देश मजबूत असल्याचा संदेश जगभर गेला आहे. संपूर्ण देश भारतीय सैन्यदलाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे.

The post कराडमध्ये तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/5682/feed 0
‘एक देश एक निवडणूक’ समितीचा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांशी संवाद https://janswarashtra.com/archives/5670 https://janswarashtra.com/archives/5670#respond Sun, 18 May 2025 12:37:58 +0000 https://janswarashtra.com/?p=5670 कराड/प्रतिनिधी : –  ‘एक देश एक निवडणूक’ विधेयकबाबत केंद्र सरकार कडून स्थापन केलेल्या संयुक्त संसदीय समितीचे सदस्य १७ ते १९ मे दरम्यान तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या समितीने राज्याचे गृह, अर्थ, विधी, शिक्षण, शिष्टाचार, निवडणूक या विभागांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर, तसेच राज्यातील प्रमुख पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली. खा. पी.पी. चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली ३१ खासदारांची ही ... Read more

The post ‘एक देश एक निवडणूक’ समितीचा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांशी संवाद first appeared on Jan Swarashtra.

]]>

कराड/प्रतिनिधी : – 

‘एक देश एक निवडणूक’ विधेयकबाबत केंद्र सरकार कडून स्थापन केलेल्या संयुक्त संसदीय समितीचे सदस्य १७ ते १९ मे दरम्यान तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या समितीने राज्याचे गृह, अर्थ, विधी, शिक्षण, शिष्टाचार, निवडणूक या विभागांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर, तसेच राज्यातील प्रमुख पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली. खा. पी.पी. चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली ३१ खासदारांची ही समिती सर्व राज्यांतील वरिष्ठ अधिकारी व राजकीय नेत्यांशी चर्चा करीत आहेत. आता ही समिती तीन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहे.

प्रमुख नेत्यांची चर्चा : यावेळी समितीने माजी मुख्यमंत्री, सर्व प्रमुख पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व प्रमुख नेते यांच्याशी चर्चा केली. यावेळी मुंबई येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह राज्यातील प्रमुख नेत्यांशी सविस्तर आणि दीर्घ चर्चा केली.

मान्यवरांची उपस्थिती : याप्रसंगी राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे, काँग्रेसचे खा. मनीष तिवारी, शिवसेनेचे खा. अनिल देसाई, आपचे खासदार संजय सिंह, भाजप खा. अनुराग ठाकूर, खा. संबित पात्रा, समाजवादी पार्टीचे आ. अबू आजमी, रासप नेते महादेव जानकर, आदीसह राज्यातील प्रमुख नेते यावेळी उपस्थित होते.

समिती अहवाल तयार करणार : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संयुक्त समितीसमोर ‘एक देश एक निवडणूक’ या महत्वाच्या विधेयकबाबत महत्वपूर्ण चर्चा करीत आपले मुद्दे मांडले. एक देश एक निवडणूक देशासाठी योग्य की अयोग्य याचा अहवाल समिती तयार करणार असून, समितीत भाजपचे 10, काँग्रेसचे 3, समाजवादी, तृणमूल काँग्रेस, डीमके, टिडीपी, राष्ट्रवादी, आरएलडीचे एकूण 21 सदस्य आहेत.

The post ‘एक देश एक निवडणूक’ समितीचा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांशी संवाद first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/5670/feed 0
सेवानिवृत्ती ही एका नव्या पर्वाची सुरुवात https://janswarashtra.com/archives/5565 https://janswarashtra.com/archives/5565#respond Wed, 07 May 2025 18:08:37 +0000 https://janswarashtra.com/?p=5565 डॉ. सुरेश भोसले; कृष्णा विश्व विद्यापीठात ‘कृष्णा सेवागौरव’ समारंभ उत्साहात कराड/प्रतिनिधी : – कृष्णा समूह हे एक कुटुंब आहे आणि या कुटुंबातील सदस्य सेवानिवृत्त झाले; तरी माजी कर्मचारी व कृष्णा समूहाचा स्नेह कायम आहे. सेवानिवृत्ती ही एका नव्या पर्वाची सुरुवात आहे. कृष्णा ही सेवाभावी संस्था आहे. या संस्थेच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याची सेवानिवृत्तीनंतरही काळजी ... Read more

The post सेवानिवृत्ती ही एका नव्या पर्वाची सुरुवात first appeared on Jan Swarashtra.

]]>
डॉ. सुरेश भोसले; कृष्णा विश्व विद्यापीठात ‘कृष्णा सेवागौरव’ समारंभ उत्साहात

कराड/प्रतिनिधी : –

कृष्णा समूह हे एक कुटुंब आहे आणि या कुटुंबातील सदस्य सेवानिवृत्त झाले; तरी माजी कर्मचारी व कृष्णा समूहाचा स्नेह कायम आहे. सेवानिवृत्ती ही एका नव्या पर्वाची सुरुवात आहे. कृष्णा ही सेवाभावी संस्था आहे. या संस्थेच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याची सेवानिवृत्तीनंतरही काळजी घेतली जाईल, असे प्रतिपादन कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांनी केले.

सेवागौरव समारंभ : कृष्णा विश्व विद्यापीठात आयोजित ‘कृष्णा सेवागौरव सेवानिवृत्ती’ समारंभात ते बोलत होते.

मान्यवरांची उपस्थिती : याप्रसंगी व्यासपीठावर कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, कार्यकारी संचालक पी. डी. जॉन, उपकुलसचिव एस. ए. माशाळकर, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. विजय कणसे, मेडिकल ॲडमिनिस्ट्रेटर डॉ. आर. जी. नानिवडेकर, सहाय्यक कुलसचिव सौ. अस्मिता देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

सन्मान : यावेळी कृष्णा विश्व विद्यापीठ आणि कृष्णा हॉस्पिटलमध्ये दीर्घकाळ सेवा बजावणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना डॉ. भोसले यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

कर्मचाऱ्यांचे योगदान : याप्रसंगी बोलताना डॉ. भोसले पुढे म्हणाले, कृष्णा समूहाच्या प्रगतीमध्ये कर्मचाऱ्यांचे योगदान नेहमीच महत्वपूर्ण राहिले आहे. संस्थेचे नाव मोठे होण्यामागे इथल्या कर्मचाऱ्यांचे अपार योगदान आहे. त्यांच्या मेहनतीमुळे आज कृष्णा विद्यापीठाला व कृष्णा हॉस्पिटलला देशपातळीवर ओळखले जाते. सेवानिवृत्तीनंतरही कर्मचाऱ्यांनी आपले अनुभव समाजासाठी वापरावेत आणि सामाजिक कार्यात योगदान द्यावे.

उपस्थिती : मनुष्यबळ विभागाचे व्यवस्थापक विक्रम शिंदे यांनी प्रास्तविक केले. डॉ. दिपाली जानकर यांनी सूत्रसंचालन केले. सहाय्यक व्यवस्थापक चेतन गोरे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला कृष्णा विद्यापीठाच्या दंतविज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ.शशिकिरण एन. डी., फिजिओथेरपी अधिष्ठाता डॉ.जी. वरदराजुलू, नर्सिंग अधिष्ठाता डॉ.वैशाली मोहिते, विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ.गिरीश पठाडे, फार्मसी महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. शुभांगी शिंदे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

The post सेवानिवृत्ती ही एका नव्या पर्वाची सुरुवात first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/5565/feed 0
कृषिभूषण गोविंदराव पवारांच्या मशाल यात्रेचे स्वागत  https://janswarashtra.com/archives/5531 https://janswarashtra.com/archives/5531#respond Sun, 04 May 2025 16:11:33 +0000 https://janswarashtra.com/?p=5531 माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यांची भेट घेऊन उपक्रमाची दिली माहिती   कराड/प्रतिनिधी : –  महाराष्ट्र राज्याच्या ६५ वर्षपूर्तीनिमित्त  कृषिभूषण गोविंदराव पवार यांनी मशालयात्रा सुरु केली. ही मशाल यात्रा कराड येथे आली असता गोविंदराव पवार यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन उपक्रमाची माहिती दिली. उपक्रमाबाबत शुभेच्छा : याप्रसंगी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गोविंदराव ... Read more

The post कृषिभूषण गोविंदराव पवारांच्या मशाल यात्रेचे स्वागत  first appeared on Jan Swarashtra.

]]>

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यांची भेट घेऊन उपक्रमाची दिली माहिती  

कराड/प्रतिनिधी : – 

महाराष्ट्र राज्याच्या ६५ वर्षपूर्तीनिमित्त  कृषिभूषण गोविंदराव पवार यांनी मशालयात्रा सुरु केली. ही मशाल यात्रा कराड येथे आली असता गोविंदराव पवार यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन उपक्रमाची माहिती दिली.

उपक्रमाबाबत शुभेच्छा : याप्रसंगी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गोविंदराव यांना उपक्रमाबाबत शुभेच्छा देत मशाल यात्रेचे स्वागत केले.

उपस्थिती : यावेळी कराड शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष, माजी नगरसेवक प्रदीप जाधव, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस अविनाश नलवडे यांची उपस्थिती होती.

संकल्प : कृषिभूषण गोविंदराव पवार यांनी महाराष्ट्रात एक कोटी झाडे लावण्याचा कार्यक्रम हाती घेतला असून त्यांची सुरुवात त्यांनी गहोली (ता. पुसद) येथून मंत्री इंद्रनील नाईक यांचे हस्ते सुरुवात करून सदर ज्योत प्रवासास प्रारंभ केला.

राज्यातील माजी मुख्यमंत्र्यांच्या समाधीस्थळी अभिवादन : महाराष्ट्र राज्याला समृद्ध करणारे महाराष्ट्रातील सर्व माजी मुख्यमंत्र्यांच्या समाधीस्थळी अभिवादन करून प्रेरणादायी मशाल यात्रा सुरु केली. सदर कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी पुसद येथून प्रथम माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक यांच्या समाधीस्थळी भेट देऊन नांदेड येथे शंकरराव चव्हाण यानंतर लातूर येथे विलासराव देशमुख, शिवाजीराव निलंगेकर यांच्या समाधीस्थळी अभिवादन करत सांगली येथे वसंतदादा पाटील यांचे दर्शन घेतले.

प्रीतिसंगमवरील समाधीस्थळी अभिवादन : यात्रेचा समारोप करताना महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या कराड येथील प्रीतिसंगमवरील समाधीस्थळी अभिवादन केले.

पृथ्वीराज चव्हाण यांची भेट : यानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची त्यांच्या निवासस्थानी गोविंदराव पवार यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या उपक्रमाबद्दल माहिती दिली. तसेच त्यांचा सत्कार केला. यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी गोविंदराव यांचे उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना शुभेच्छा दिल्या.

The post कृषिभूषण गोविंदराव पवारांच्या मशाल यात्रेचे स्वागत  first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/5531/feed 0
काँग्रेस ५७ शहरांत घेणार पत्रकार परिषदा https://janswarashtra.com/archives/5324 https://janswarashtra.com/archives/5324#respond Mon, 21 Apr 2025 11:34:46 +0000 https://janswarashtra.com/?p=5324 नॅशनल हेराल्ड केस प्रकरण; ‘काँग्रेसचे सत्य, भाजपचे खोटे’ मोहिमेंतर्गत पृथ्वीराज चव्हाणांची बेळगावात पत्रकार परिषद कराड/प्रतिनिधी  : – नॅशनल हेराल्ड प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पहिल्या आरोपपत्रात सोनिया-राहुल यांची नावे समाविष्ट केल्याच्या निषेधार्थ काँग्रेस देशभरात पत्रकार परिषदा घेणार आहे. २१ ते २७ एप्रिल दरम्यान ५७ शहरांमध्ये ५७ पत्रकार परिषदा घेण्यात येणार असल्याचे पक्षाने म्हटले आहे. विशेष मोहीम ... Read more

The post काँग्रेस ५७ शहरांत घेणार पत्रकार परिषदा first appeared on Jan Swarashtra.

]]>
नॅशनल हेराल्ड केस प्रकरण; ‘काँग्रेसचे सत्य, भाजपचे खोटे’ मोहिमेंतर्गत पृथ्वीराज चव्हाणांची बेळगावात पत्रकार परिषद

कराड/प्रतिनिधी  : –

नॅशनल हेराल्ड प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पहिल्या आरोपपत्रात सोनिया-राहुल यांची नावे समाविष्ट केल्याच्या निषेधार्थ काँग्रेस देशभरात पत्रकार परिषदा घेणार आहे. २१ ते २७ एप्रिल दरम्यान ५७ शहरांमध्ये ५७ पत्रकार परिषदा घेण्यात येणार असल्याचे पक्षाने म्हटले आहे.

विशेष मोहीम : ‘काँग्रेसचे सत्य, भाजपचे खोटे’ असे या मोहिमेला नाव देण्यात आले आहे. या काळात भाजपचा खोटेपणा समोर आणला जाईल, असे पक्षाचे म्हणणे आहे.

या नेत्यांचा समावेश : अखिल भारतीय काँग्रेस पक्षाकडून 57 नेत्यांची यादीच प्रसिद्ध करण्यात आली असून त्यामध्ये माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर, मणिकम टागोर, गौरव गोगोई, सुप्रिया श्रीनेत, पवन खेरा, छत्तीसगड चे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, कन्हैया कुमार, रणदीप सिंग सुरजेवाला, राजीव शुक्ला, अलका लांबा अशा अनेक बड्या नेत्यांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे.

२३ एप्रिलला पत्रकार परिषद : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची बेळगांव येथे २३ एप्रिल रोजी सकाळी जिल्हा काँग्रेस कमिटी, बेळगाव येथे पत्रकार परिषद होणार आहे.

बैठकीत निर्णय : १९ एप्रिल रोजी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काँग्रेस सरचिटणीस, राज्य प्रभारी आणि आघाडीच्या संघटनांच्या प्रमुखांच्या बैठकीत देशभरात पत्रकार परिषदा घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

The post काँग्रेस ५७ शहरांत घेणार पत्रकार परिषदा first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/5324/feed 0
कराडमध्ये सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन सोहळा https://janswarashtra.com/archives/5047 https://janswarashtra.com/archives/5047#respond Sun, 06 Apr 2025 16:32:02 +0000 https://janswarashtra.com/?p=5047 कराड/प्रतिनिधी : – येथील आर्ट ऑफ लिविंग यांनी यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन या ठिकाणी सोमवार (दि. ७) एप्रिल रोजी सकाळी ९ वा. सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शिवलिंगाचे दर्शन : सकाळी ९ ते ११ या वेळेमध्ये भाविक, भक्त व नागरिकांसाठी शिवलिंगाचे दर्शन खुले करण्यात येणार आहे. शिवलिंगाची १००० वर्ष पूजा : सोमनाथ मंदिरावरती १००० ... Read more

The post कराडमध्ये सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन सोहळा first appeared on Jan Swarashtra.

]]>
कराड/प्रतिनिधी : –

येथील आर्ट ऑफ लिविंग यांनी यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन या ठिकाणी सोमवार (दि. ७) एप्रिल रोजी सकाळी ९ वा. सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

शिवलिंगाचे दर्शन : सकाळी ९ ते ११ या वेळेमध्ये भाविक, भक्त व नागरिकांसाठी शिवलिंगाचे दर्शन खुले करण्यात येणार आहे.

शिवलिंगाची १००० वर्ष पूजा : सोमनाथ मंदिरावरती १००० वर्षांपूर्वी प्रहार करुन येथील शिवलिंग तोडले होते. त्यावेळी त्याचे काही अवशेष अग्निहोत्री संत यांनी जपून ठेवून त्याला शिवलिंगाचा आकार देऊन १००० वर्ष पूजा केली. त्यावेळी कांचीचे परमाचार्य यांनी सांगितले की, हे १००० वर्षे बाहेर काढू नका.

महाशिवरात्रीला रुद्राभिषेक : १००० वर्षांनंतर श्री श्री रविशंकरजींनी यावर्षी महाशिवरात्रीला त्यावरती रुद्राभिषेक केला आणि आता गुरुदेव जिथे जात आहेत, तिथे रुद्राभिषेक होत आहे.

दुर्मिळ संधीचा लाभ घ्या : तेच सोमनाथ शिवलिंग कराडमध्ये येत आहे. आज सोमवार (दि. ७) एप्रिल रोजी सकाळी ९ वा. यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन या ठिकाणी हे सोमनाथ शिवलिंग दर्शनासाठी ठेवण्यात येणार असून या दुर्मिळ संधीचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

The post कराडमध्ये सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन सोहळा first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/5047/feed 0
महाराष्ट्रातील अराजकतेला मुख्यमंत्री जबाबदार https://janswarashtra.com/archives/4896 https://janswarashtra.com/archives/4896#respond Tue, 01 Apr 2025 04:07:16 +0000 https://janswarashtra.com/?p=4896 पृथ्वीराज चव्हाण; ट्रम्प सरकारपुढे केंद्र सरकारचे लोटांगण कराड/प्रतिनिधी : – देशात किंबहुना महाराष्ट्रात सध्या अस्थिर परिस्थिती आहे. महाराष्ट्रामध्ये निवडणुकीत दिलेली आश्वासनपूर्ती झाली नाही, राज्याला जीएसटीचा परतावा मिळाला नाही, शेतकऱ्यांना कर्जमाफी नाकारली, लाडकी बहीण योजनेचे हप्ते द्यायला यांच्याकडे पैसे नाहीत. याउलट राज्यात जातीय दंगली घडवून अराजकता माजवण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे सगळे केंद्र सरकारच्या आश्रयाने चालले ... Read more

The post महाराष्ट्रातील अराजकतेला मुख्यमंत्री जबाबदार first appeared on Jan Swarashtra.

]]>
पृथ्वीराज चव्हाण; ट्रम्प सरकारपुढे केंद्र सरकारचे लोटांगण

कराड/प्रतिनिधी : –

देशात किंबहुना महाराष्ट्रात सध्या अस्थिर परिस्थिती आहे. महाराष्ट्रामध्ये निवडणुकीत दिलेली आश्वासनपूर्ती झाली नाही, राज्याला जीएसटीचा परतावा मिळाला नाही, शेतकऱ्यांना कर्जमाफी नाकारली, लाडकी बहीण योजनेचे हप्ते द्यायला यांच्याकडे पैसे नाहीत. याउलट राज्यात जातीय दंगली घडवून अराजकता माजवण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे सगळे केंद्र सरकारच्या आश्रयाने चालले असून या सर्व परिस्थितीला मुख्यमंत्री जबाबदार असल्याचा आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला.

महायुतीने घोर निराशा केली : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप आणि महायुतीने दिलेल्या आश्वासनांची पूर्ती होईल, अशी नागरिकांना अपेक्षा होती. मात्र, त्यांची घोर निराशा झाली, असे सांगत श्री. चव्हाण म्हणाले, अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नसल्याचे सांगत दोन दिवसात (३१ मार्चपर्यंत) सर्व कर्ज भरावे, असे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी याला जोरात दिला.

…तर कर्जमाफीची गरजच नव्हती : जर सरकारने कापूस आणि सोयाबीनला समर्थन किंमत दिली असती, तर शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज नव्हती, असे सांगत श्री. चव्हाण म्हणाले, इतर कोणत्याही गोष्टींच्या किमतीने न वाढवता सरकार शेतकऱ्यांवरच अन्याय करत आहे. राज्य सरकारही केंद्र सरकारच्या पावलावर पाऊल टाकत आहे, या गोष्टीचा काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांनी जाहीर निषेध नोंदवला.

आश्वासनपूर्तीला हरताळ : शेतकऱ्यांना केंद्र व राज्य सरकारर्माफत मिळणारा किसान सन्मान निधी एक हजारावरून दीड हजार करण्याचे भाजपने सांगितले, हे झाले नाही. शेतमालाला किमान हमीभाव मिळाला नाही. लाडकी बहीण योजनेच्या पंधराशेवरून एकवीसशे रुपयांच्या आश्वासनपूर्तीला हरताळ फासला असल्याचे श्री. चव्हाण यांनी सांगितले.

फसवणूक करणाऱ्यांचा जनताच विचार करेल : राज्यावर चाळीस हजार कोटींचे कर्ज असल्याचे महायुतीचे मंत्री शंभूराज देसाई सांगतात. मग योजना जाहीर करताना हे माहीत नव्हते का? असा सवाल उपस्थित करत श्री. चव्हाण यांनी सरकारने लोकांना फसवले, आता जनताच त्यांचा विचार करेल, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

केंद्र सरकार दबावाला बळी पडले : ट्रम्प सरकारच्या दबावाला केंद्र सरकार बळी पडल्याचे सांगताना श्री. चव्हाण म्हणाले, अमेरिकेमध्ये अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या ६० लाख लोकांना त्यांनी परत पाठवले. त्यांचा सन्मान राखला नाही. याबाबतच्या धोरणावेळी केंद्र सरकारने त्यांच्यासमोर लोटांगण घातले.

ताठर भूमिका घ्यायला हवी : आता दोन एप्रिल रोजी ट्रम्प सरकार अमेरिकेचे आयात-निर्यात धोरण ठरवणार आहे. यावेळी केंद्र सरकारने ताठर भूमिका घ्यायला हवी. जर यावेळीही केंद्राने त्यांच्यासमोर लोटांगण घातले, तर शेतकऱ्यांची प्रचंड अनास्था होईल. याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल. अमेरिकेने व्यापार युद्ध सुरू केल्यास त्याचा महाराष्ट्र सरकारवर मोठा परिणाम होणार असल्याचे श्री. चव्हाण यांनी सांगितले.

लोकशाही व न्यायव्यवस्थेला काळीमा फासला : मोदींवर निशाणा साधताना श्री. चव्हाण म्हणाले, एका न्यायाधीशाच्या घरात कोट्यावधींची रक्कम सापडते. मात्र, याबाबतची माहिती का लपवली जाते? सामान्य जनतेला एक कायदा आणि न्यायाधीशाला दुसरा असे का? सीबीआयचे अध्यक्ष मोदी आहेत, तर त्यांनी न्यायाधीशांना अटक करण्यापासून का थांबवले? असे सांगून ही लोकशाही आणि न्यायव्यवस्थेला काळीमा फासणारी घटना असल्याचे श्री. चव्हाण यांनी सांगितले.

 

The post महाराष्ट्रातील अराजकतेला मुख्यमंत्री जबाबदार first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/4896/feed 0
ज्येष्ठ पत्रकारांना मासिक २० हजारांच्या सन्मान निधीचा मार्ग सुलभ https://janswarashtra.com/archives/4692 https://janswarashtra.com/archives/4692#respond Thu, 06 Mar 2025 03:44:38 +0000 https://janswarashtra.com/?p=4692 रविंद्र बेडकिहाळ यांनी शासनाचे मानले आभार; फरकासह निधी देण्याबाबत सकारात्मक विचार करण्याची मागणी   कराड/प्रतिनिधी : – आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेअंतर्गत राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांना यापूर्वीच जाहीर करण्यात आलेले मासिक २० हजार अर्थसहाय्य मिळण्याचा मार्ग सुलभ केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व एकनाथ शिंदे यांना राज्यातील पत्रकारांच्यावतीने महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे संस्थापक ... Read more

The post ज्येष्ठ पत्रकारांना मासिक २० हजारांच्या सन्मान निधीचा मार्ग सुलभ first appeared on Jan Swarashtra.

]]>
रविंद्र बेडकिहाळ यांनी शासनाचे मानले आभार; फरकासह निधी देण्याबाबत सकारात्मक विचार करण्याची मागणी  

कराड/प्रतिनिधी : –

आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेअंतर्गत राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांना यापूर्वीच जाहीर करण्यात आलेले मासिक २० हजार अर्थसहाय्य मिळण्याचा मार्ग सुलभ केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व एकनाथ शिंदे यांना राज्यातील पत्रकारांच्यावतीने महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांनी विशेष धन्यवाद दिले आहेत.

प्रसिद्धीपत्रक : याबाबत दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात रविंद्र बेडकिहाळ यांनी नमूद केले आहे की, ‘‘राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेअंतर्गत दिले जाणार्‍या रुपये ११ हजाराच्या अर्थसहाय्यात वाढ करुन ते रुपये २० हजार करण्याचा शासन निर्णय गतवर्षी दि. १४ मार्च २०२४ रोजी झाला होता. मात्र हे अधिकचे अर्थसहाय्य ज्येष्ठ पत्रकारांना अद्याप दिले जात नव्हते.

शासनाचे वेधले लक्ष : याबाबत महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीने वारंवार शासनाचे लक्ष वेधले होते. ही योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी शासनाने पत्रकारांच्या कल्याणार्थ स्थापन केलेल्या शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीच्या स्थायी निधीमध्ये वाढ होणे आवश्यक असल्याचेही आम्ही शासनास निदर्शनास आणून दिले होते.

ठेव रक्कम 100 कोटींवर  : आमच्या या मागणीनुसार आता ही अडचण दूर करण्यासाठी शासनाने शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीच्या ठेव रक्कमेत ५० कोटींची वाढ करुन या निधीची एकूण ठेव रक्कम आता १०० कोटी केली आहे.

मासिक २० हजार अर्थसहाय्य : या मुदत ठेव स्वरुपात गुंतवण्यात आलेल्या निधीच्या व्याजातून आता ज्येष्ठ पत्रकारांना मासिक २० हजार आर्थिक सहाय्य मिळण्याचा मार्ग सुलभ झाला आहे. या दोन्ही निर्णयाबाबतचे स्वतंत्र शासन निर्णय काल शासनाकडून निर्गमीत करण्यात आले आहेत’’, असेही बेडकिहाळ यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.

फरकासह रक्कम द्यावी : दरम्यान, ‘‘सदर ज्येष्ठ पत्रकार सन्माननिधीतील ही ९ हजार रुपयांची वाढ देताना ती याबाबतचा शासन निर्णय झाल्यापासून म्हणजेच दि. १४ मार्च २०२४ पासूनच्या फरकासह येत्या दि. १ एप्रिल पासून देण्यात यावी, अशी मागणी आम्ही यापूर्वीच शासनाकडे केली आहे. या मागणीचा शासनाने सकारात्मक विचार करावा’’, असेही आवाहन रविंद्र बेडकिहाळ यांनी या पत्रकाद्वारे केले आहे. 

 

The post ज्येष्ठ पत्रकारांना मासिक २० हजारांच्या सन्मान निधीचा मार्ग सुलभ first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/4692/feed 0
पत्रकारितेतील सत्व आणि तत्व टिकवून ठेवा  https://janswarashtra.com/archives/3823 https://janswarashtra.com/archives/3823#respond Mon, 06 Jan 2025 11:58:39 +0000 https://janswarashtra.com/?p=3823 बाळासाहेब पाटील; शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात पत्रकार सन्मान सोहळा उत्साहात  कराड/प्रतिनिधी : –  आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या काळातील पत्रकारिता आणि सध्याची पत्रकारिता यामध्ये काळानुरूप अमुलाग्र बदल झाला आहे. आता सोशल माध्यमांबरोबरच कृत्रिम बुद्धिमत्ता हेही पत्रकारिता क्षेत्रासमोरील मोठे आव्हान आहे. त्यामुळे बदलत्या समाजानुसार पत्रकारांकडून लोकांच्या अपेक्षाही वाढत असून पत्रकारांनीही पत्रकारिता करताना पत्रकारितेतील सत्व आणि तत्व टिकवून ... Read more

The post पत्रकारितेतील सत्व आणि तत्व टिकवून ठेवा  first appeared on Jan Swarashtra.

]]>

बाळासाहेब पाटील; शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात पत्रकार सन्मान सोहळा उत्साहात 

कराड/प्रतिनिधी : – 

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या काळातील पत्रकारिता आणि सध्याची पत्रकारिता यामध्ये काळानुरूप अमुलाग्र बदल झाला आहे. आता सोशल माध्यमांबरोबरच कृत्रिम बुद्धिमत्ता हेही पत्रकारिता क्षेत्रासमोरील मोठे आव्हान आहे. त्यामुळे बदलत्या समाजानुसार पत्रकारांकडून लोकांच्या अपेक्षाही वाढत असून पत्रकारांनीही पत्रकारिता करताना पत्रकारितेतील सत्व आणि तत्व टिकवून ठेवले पाहिजे, असे प्रतिपादन माजी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.

पत्रकार सन्मान सोहळा : येथील शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात सोमवारी (दि. 6) रोजी मराठी पत्रकार दिनानिमित्त पत्रकार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.

मान्यवरांची उपस्थिती : कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश घाडगे होते. यावेळी पत्रकारिता विभागप्रमुख प्रा. सौ. स्नेहलता शेवाळे-पाटील, प्रा. संभाजी पाटील, प्रा. जीवन आंबुडारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पत्रकारिता क्षेत्रात मोठी स्पर्धा : सध्या वृत्तवाहिनीसह सोशल माध्यमांमुळे पत्रकारिता क्षेत्रात मोठी स्पर्धा निर्माण झाली झाली असल्याचे सांगताना माजी मंत्री श्री पाटील म्हणाले, एखादी बातमी तात्काळ प्रसिद्ध करण्याच्या गडबडीत चुकीची माहिती जाण्याची शक्यता असते. अशावेळी बातमीची खातरजमा केल्याशिवाय ती समाजासमोर जाता कामा नये, याची काळजी पत्रकारांनी घ्यावी. असे सांगताना त्यांनी चुकीच्या वक्तव्यामुळे आणि पत्रकारांच्या साडेतोड लेखणीमुळे राज्याच्या राजकारणात आणि सत्ताकारणात झालेल्या उलथापलाथीची काही उदाहरणेही त्यांनी यावेळी दिली.

आरोग्याचीही काळजी घ्या : पत्रकारांनी शोध पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाच्या व्यथा, समस्या मांडाव्यात. यासोबत स्पर्धेच्या, धकाधकीच्या युगात काम करताना आपल्या आरोग्याची काळजीही घ्यावी, असेही श्री पाटील यांनी सांगितले.

वेगळा ठसा उमटवतील : शिवाजी विद्यापीठानंतर फक्त कराडमधील शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात पत्रकारितेचं शिक्षण दिले जात असून या महाविद्यालयात तयार झालेले पत्रकार राज्य आणि देश पातळीवर आपला वेगळा ठसा उमटवतील, असे मतही श्री पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.

लेखणी आणि चारित्र्य एकत्र यावे : अध्यक्षस्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य सतीश घाडगे म्हणाले, पत्रकारांच्या लेखणीचा कस लागतो, अशा शोध पत्रकारितेने मोठी उलथापालत होते. बाहेर घडणाऱ्या घटनांचे प्रतिबिंब समाजात उमटते आणि समाजाचे प्रतिबिंब पत्रकारांच्या लेखणीतून वृत्तपत्रांत उमटते. त्यामुळे लेखणी आणि चरित्र एकत्र आल्यास पत्रकारांकडून समाजाला योग्य दिशा देण्याचे काम होते. अशा पत्रकारितेची आज समाजाला खऱ्या अर्थाने गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

पत्रकारिता विभागाचा चढता आलेख : प्रास्ताविकात पत्रकारिता विभागप्रमुख प्रा. सौ. स्नेहलता शेवाळे-पाटील यांनी महाविद्यालयाच्या पत्रकारिता विभागाचा चढता लेख सर्वांसमोर मांडला. तसेच या महाविद्यालयात शिक्षण घेतलेले अनेक पत्रकार आज चांगल्या हुद्यावर कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रा. संभाजी पाटील यांनी आभार मानले. सूत्रसंचालन प्रा. गायकवाड व प्रा. वाघमारे यांनी केले. 

सन्मान : प्रारंभी, डॉ. बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमेचे पूजन व उपस्थित सर्व पत्रकारांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला कराड व तालुक्यातील बहुसंख्य पत्रकार, महाविद्यालयाच्या पत्रकारिता विभागातील प्रशिक्षणार्थी पत्रकार विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.

योग्य काळाची आणि संधीची वाट पहा 

कोणत्याही क्षेत्रात काम करताना यश, अपयश येत राहते. परंतु, अपयशाने खचून जाऊ नका. काळाच्या उत्तरात अनेक गुपिते दडलेली असतात. त्यामुळे येणाऱ्या काळाची आणि योग्य संधीची वाट पहा, असे सूचक विधानही बाळासाहेब पाटील यांनी यावेळी केले.

The post पत्रकारितेतील सत्व आणि तत्व टिकवून ठेवा  first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/3823/feed 0