कराड/प्रतिनिधी : –
येथील आर्ट ऑफ लिविंग यांनी यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन या ठिकाणी सोमवार (दि. ७) एप्रिल रोजी सकाळी ९ वा. सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
शिवलिंगाचे दर्शन : सकाळी ९ ते ११ या वेळेमध्ये भाविक, भक्त व नागरिकांसाठी शिवलिंगाचे दर्शन खुले करण्यात येणार आहे.
शिवलिंगाची १००० वर्ष पूजा : सोमनाथ मंदिरावरती १००० वर्षांपूर्वी प्रहार करुन येथील शिवलिंग तोडले होते. त्यावेळी त्याचे काही अवशेष अग्निहोत्री संत यांनी जपून ठेवून त्याला शिवलिंगाचा आकार देऊन १००० वर्ष पूजा केली. त्यावेळी कांचीचे परमाचार्य यांनी सांगितले की, हे १००० वर्षे बाहेर काढू नका.
महाशिवरात्रीला रुद्राभिषेक : १००० वर्षांनंतर श्री श्री रविशंकरजींनी यावर्षी महाशिवरात्रीला त्यावरती रुद्राभिषेक केला आणि आता गुरुदेव जिथे जात आहेत, तिथे रुद्राभिषेक होत आहे.
दुर्मिळ संधीचा लाभ घ्या : तेच सोमनाथ शिवलिंग कराडमध्ये येत आहे. आज सोमवार (दि. ७) एप्रिल रोजी सकाळी ९ वा. यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन या ठिकाणी हे सोमनाथ शिवलिंग दर्शनासाठी ठेवण्यात येणार असून या दुर्मिळ संधीचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
