मनोरंजन - Jan Swarashtra https://janswarashtra.com Latest News | Top News | Breaking News Sat, 31 May 2025 14:40:22 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8.2 https://janswarashtra.com/wp-content/uploads/2024/08/cropped-Add-a-heading-5-32x32.png मनोरंजन - Jan Swarashtra https://janswarashtra.com 32 32 ‘सुरों का उत्सव’ संगीत रजनीत सुरेल स्वरांची बहार https://janswarashtra.com/archives/5867 https://janswarashtra.com/archives/5867#respond Sat, 31 May 2025 14:40:22 +0000 https://janswarashtra.com/?p=5867 कराड/प्रतिनिधी : – कृष्णा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा डॉ. सुरेश भोसले यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त मलकापूर (कराड) येथे आयोजित ‘सुरों का उत्सव’ या भव्य संगीत रजनीस रसिक श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे गायक आणि गायिकांनी आपल्या सुरेल सादरीकरणातून उपस्थितांची मने जिंकली. सदाबहार गीतांचे सादरीकरण : संगीत रजनीची सुरुवात सागर केंदूरकर यांच्या ‘श्री ... Read more

The post ‘सुरों का उत्सव’ संगीत रजनीत सुरेल स्वरांची बहार first appeared on Jan Swarashtra.

]]>
कराड/प्रतिनिधी : –

कृष्णा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा डॉ. सुरेश भोसले यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त मलकापूर (कराड) येथे आयोजित ‘सुरों का उत्सव’ या भव्य संगीत रजनीस रसिक श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे गायक आणि गायिकांनी आपल्या सुरेल सादरीकरणातून उपस्थितांची मने जिंकली.

सदाबहार गीतांचे सादरीकरण : संगीत रजनीची सुरुवात सागर केंदूरकर यांच्या ‘श्री गणेश नमन’ सादरीकरणाने झाली. त्यानंतर त्यांच्या ‘दिल से रे’ या उर्जादायी गाण्याने वातावरण भारावून गेले. प्रसिद्ध गायिका कोमल कृष्णा यांनी ‘मेरे ढोलना’ आणि लता मंगेशकर यांची सदाबहार गीते सादर करून रसिकांना जुन्या आठवणींत रमवले. ऋषिकेश रानडे यांनी ‘कधी तू रिमझिम’ आणि ‘मेरा रंग दे बसंती चोला’ यांसारख्या गीतांनी भावनिक तरंग निर्माण केले. तर संपदा गोस्वामी यांनी ‘कभी श्याम ढले’ आणि ‘आता गं बया’ सारख्या गीतांनी श्रोत्यांना भावविभोर केले.

रसिकांचा भरभरून प्रतिसाद : गायक-गायिकांच्या युगल गीतांनाही रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. ऋषिकेश रानडे व संपदा गोस्वामी यांच्या ‘बहरला हा मधुमास नवा’, कोमल कृष्णा व सागर केंदूरकर यांचे ‘जाने जा’, तर सागर व संपदा यांचे ‘शौकियों में घोला जाए’ या सादरीकरणांनी मैफलीला रंगत आणली. अमेय दाते यांनी सादर केलेली भक्तिगीते ‘आई भवानी’, ‘देवा श्री गणेशा’ आणि ‘अबीर गुलाल’ यांना विशेष दाद मिळाली. कार्यक्रमाची सांगता सर्व कलाकारांनी एकत्रितपणे ‘जय हो’, ‘सुनो गौर से दुनिया वालो’ आणि ‘माँ तुझे सलाम’ या देशभक्तिपर गीतांनी केली. त्यामुळे संपूर्ण सभागृहात देशप्रेमाचे वातावरण निर्माण झाले.

मान्यवरांची उपस्थिती : कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन सिक्कीमचे माजी राज्यपाल, माजी खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी मंत्री दिलीपराव देशमुख, आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, सौ. उत्तरा भोसले, सौ. सुवर्णादेवी देशमुख, श्री. विनायक भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

विनोदी शैलीत प्रेक्षकांशी संवाद : संगीत संयोजन मंदार राजपूत यांचे होते. कार्यक्रमाचे निवेदन आर. जे. गौरव यांनी केले. त्यांनी आपल्या विनोदी शैलीत प्रेक्षकांशी संवाद साधत, सिनेमातील किस्से आणि मनोरंजक माहिती सादर करत वातावरण हलकेफुलके ठेवले.

कलाकारांचा सत्कार : कार्यक्रमातील सर्व कलाकारांचा सत्कार आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला. या कार्यक्रमाला कृष्णा परिवारातील सर्व संस्थांचे पदाधिकारी, कराड-मलकापूर नगरपालिकेचे माजी पदाधिकारी, भाजपाचे कार्यकर्ते आणि शेकडो संगीतप्रेमी श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

The post ‘सुरों का उत्सव’ संगीत रजनीत सुरेल स्वरांची बहार first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/5867/feed 0
‘कृष्णा’चा माहितीपट राष्ट्रीय आरोग्य चित्रपट महोत्सवात तृतीय https://janswarashtra.com/archives/3792 https://janswarashtra.com/archives/3792#respond Sat, 04 Jan 2025 11:01:56 +0000 https://janswarashtra.com/?p=3792 कराड/प्रतिनिधी : – पुणे येथे नुकत्याच झालेल्या 13 व्या राष्ट्रीय आरोग्य चित्रपट महोत्सवात कृष्णा विश्व विद्यापीठाची प्रस्तुती असलेल्या ‘राईट टू क्लिन एन्व्हायर्मेन्ट’ या माहितीपटाला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. सुप्रसिद्ध अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर यांच्या हस्ते विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे संचालक तथा या माहितीपटाचे दिग्दर्शक डॉ. बाळकृष्ण दामले यांनी हा पुरस्कार स्वीकारला. राष्ट्रीय आरोग्य चित्रपट ... Read more

The post ‘कृष्णा’चा माहितीपट राष्ट्रीय आरोग्य चित्रपट महोत्सवात तृतीय first appeared on Jan Swarashtra.

]]>
कराड/प्रतिनिधी : –

पुणे येथे नुकत्याच झालेल्या 13 व्या राष्ट्रीय आरोग्य चित्रपट महोत्सवात कृष्णा विश्व विद्यापीठाची प्रस्तुती असलेल्या ‘राईट टू क्लिन एन्व्हायर्मेन्ट’ या माहितीपटाला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. सुप्रसिद्ध अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर यांच्या हस्ते विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे संचालक तथा या माहितीपटाचे दिग्दर्शक डॉ. बाळकृष्ण दामले यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

राष्ट्रीय आरोग्य चित्रपट महोत्सव : आरोग्य जागृतीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या पुणे येथील पी. एम. शाह फाऊंडेशनच्यावतीने दरवर्षी आरोग्य समस्यांवरील चित्रपटांच्या राष्ट्रीय महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदाच्या 13 व्या राष्ट्रीय आरोग्य चित्रपट महोत्सवासाठी विविध भारतीय भाषांमधून अनेक विषयांवरचे सुमारे ३४ लघुपट व माहितीपट फाऊंडेशनकडे प्राप्त झाले होते. यामध्ये कृष्णा विश्व विद्यापीठाने तयार केलेल्या ३ लघुपटांचा व एका माहितीपटाचा समावेश होता. 

‘राईट टू क्लिन एन्व्हायर्न्मेंट’ या माहितीपट तृतीय : महोत्सवात कृष्णा विश्व विद्यापीठ प्रस्तुत आणि डॉ. बाळकृष्ण दामले दिग्दर्शित ‘राईट टू क्लिन एन्व्हायर्न्मेंट’ या माहितीपटाला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. आरोग्यदायी जीवनासाठी स्वच्छ पर्यावरण हा प्रत्येकाचा हक्क आहे, याबाबतची जागृती या माहितीपटाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. महोत्सवाच्या समारोप सत्रात सुप्रसिद्ध अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर यांच्या हस्ते माहितीपटाचे दिग्दर्शक डॉ. बाळकृष्ण दामले यांना सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी महोत्सवाचे आयोजक ॲड. चेतन गांधी यांची प्रमुख उपस्थिती होती. 

डिप्रेशन/एन्झायटी सांगण्याची फॅशन : यावेळी बोलताना सौ. प्रभुलकर म्हणाल्या, आरोग्य हा अत्यंत गंभीर विषय असून, आरोग्यावर आधारित चित्रपट व माहितीपट निर्माण होणे महत्त्वाचे आहे. एखादा संदेश द्यायचा असल्यास ती गोष्टीच्या माध्यमातून चिरकाल मनात राहते. मानसिक आरोग्य हा कळीचा मुद्दा झाला आहे. ‘डिप्रेशन’ आणि ‘एन्झायटी’ हे शब्द माझ्या पिढीला माहितीही नव्हते. मात्र, आज हे ‘मला डिप्रेशन किंवा एन्झायटी आहे’ हे सांगण्याची जणू फॅशनच आहे. हे सारे गंभीर असून, यामागील कारणे शोधणे गरजेचे आहे. समाजमाध्यमे ही मानसिक आरोग्य बिघडण्याचे सर्वांत मोठे कारण आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

कलाकार व तंत्रज्ञांचे आभार : या यशाबद्दल माहितीपटाच्या निर्मितीप्रक्रियेत सहभागी झालेल्या कलाकार व तंत्रज्ञांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. या यशाबद्दल कृष्णा विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले, कुलपतींचे प्रधान सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा, शैक्षणिक व मानांकन विभागाचे प्रधान सल्लागार डॉ. प्रवीण शिंगारे, कुलगुरु डॉ. नीलम मिश्रा आणि कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे यांनी लघुपटाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आहे.

The post ‘कृष्णा’चा माहितीपट राष्ट्रीय आरोग्य चित्रपट महोत्सवात तृतीय first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/3792/feed 0
“सौ बार जनम लेंगे..”! https://janswarashtra.com/archives/3498 https://janswarashtra.com/archives/3498#respond Fri, 20 Dec 2024 12:35:22 +0000 https://janswarashtra.com/?p=3498 महंमद रफी जन्मशताब्दीनिमित्त मंगळवारी कराडमध्ये बहारदार गीतांचा कार्यक्रम कराड/प्रतिनिधी : –  महान गायक महंमद रफी यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त त्यांच्या अजरामर गीतांना उजाळा देण्यासाठी मंगळवार, दि. 24 डिसेंबर रोजी कराड येथे सुनही शाम रफी के नाम अंतर्गत सौ बार जनम लेंगे.. हा बहारदार गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रम : महंमद रफी म्युझिक अ‍ॅकॅडमीच्या वतीने ... Read more

The post “सौ बार जनम लेंगे..”! first appeared on Jan Swarashtra.

]]>
महंमद रफी जन्मशताब्दीनिमित्त मंगळवारी कराडमध्ये बहारदार गीतांचा कार्यक्रम

कराड/प्रतिनिधी : – 

महान गायक महंमद रफी यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त त्यांच्या अजरामर गीतांना उजाळा देण्यासाठी मंगळवार, दि. 24 डिसेंबर रोजी कराड येथे सुनही शाम रफी के नाम अंतर्गत सौ बार जनम लेंगे.. हा बहारदार गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रम : महंमद रफी म्युझिक अ‍ॅकॅडमीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून येथील यशवंतराव चव्हाण स्मृतीसदन टाऊन हॉल येथे रात्री 9 वाजता हा कार्यक्रम होत आहे. कार्यक्रमाची संकल्पना महागुरू असिफ बागवान व मोहंमद अनिस यांची आहे.

आवाहन : कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून रसिक प्रेक्षकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

The post “सौ बार जनम लेंगे..”! first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/3498/feed 0
यशवंत विचारांना अनुसरून सुसंस्कृत राजकारण करणार  https://janswarashtra.com/archives/2824 https://janswarashtra.com/archives/2824#respond Mon, 25 Nov 2024 18:02:59 +0000 https://janswarashtra.com/?p=2824 आमदार डॉ. अतुल भोसले; यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी केले अभिवादन  कराड/प्रतिनिधी : – कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाला स्व. यशवंतराव चव्हाण यांचा वारसा लाभला असून त्यांनी राज्याला सुसंस्कृत राजकारणाचा विचार दिला. त्याच यशवंत विचारांना अनुसरून यापुढे काम करणार असून सर्वसामान्य जनतेच्या फायद्याच्या दृष्टीने चांगले, सुसंस्कृत राजकारण करण्यासाठी आपण सज्ज झालो असल्याचे आमदार डॉ. अतुल भोसले यांनी ... Read more

The post यशवंत विचारांना अनुसरून सुसंस्कृत राजकारण करणार  first appeared on Jan Swarashtra.

]]>

आमदार डॉ. अतुल भोसले; यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी केले अभिवादन 

कराड/प्रतिनिधी : –

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाला स्व. यशवंतराव चव्हाण यांचा वारसा लाभला असून त्यांनी राज्याला सुसंस्कृत राजकारणाचा विचार दिला. त्याच यशवंत विचारांना अनुसरून यापुढे काम करणार असून सर्वसामान्य जनतेच्या फायद्याच्या दृष्टीने चांगले, सुसंस्कृत राजकारण करण्यासाठी आपण सज्ज झालो असल्याचे आमदार डॉ. अतुल भोसले यांनी दिली.

अभिवादन : स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या समाधीस्थळी सोमवारी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे नवनियुक्त आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.

जनतेने स्वीकारल्याचा आनंद : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील जनतेने मला स्वीकारले, याचा मला जास्ती आनंद झाला असल्याचे सांगत डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, माझ्यावरील जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडणार असून जनतेने मला दिलेल्या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न राहील. कराड दक्षिण मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी जे लागेल ते आपण करणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला ग्वाही दिली आहे. या मतदारसंघातील जनतेच्या सर्व मागण्या, अडीअडचणी सोडवण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करणार आहे.

सर्वांना विश्वासात घेऊ : कराड दक्षिणमधून आपला विजय झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तुम्हाला शुभेच्छा दिल्या. त्यामुळे तुम्ही त्यांची भेट घेणार का? या प्रश्नावर ते म्हणाले, कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाला स्व. यशवंतराव चव्हाण यांचा वारसा आहे.  सुसंस्कृत राजकारणाचा त्यांचा विचार आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत. यामुळे निश्चित चांगले, प्रगतीचे काम करत असताना विरोधकांशी चर्चा करण्याच्या बाबतीतचा प्रयत्न भविष्यकाळात निश्चित राहील. तसेच सगळ्यांना विश्वासात घेऊन त्याबद्ददलची भूमिका घेऊ, असेही त्यांनी सांगितले.

मान्यवरांची उपस्थिती : यावेळी माजी आमदार आनंदराव पाटील, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, श्री. विनायक भोसले, कृष्णा कारखान्याचे संचालक धोंडिराम जाधव, श्रीरंग देसाई, दत्तात्रय देसाई, वसंतराव शिंदे, विनायक पावसकर, भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्या सौ. स्वाती पिसाळ, तालुकाध्यक्ष पै. धनंजय पाटील, शहराध्यक्ष एकनाथ बागडी, कराडचे माजी उपनगराध्यक्ष सुभाष डुबल, माजी नगरसेवक सुहास जगताप, हणमंतराव पवार, अतुल शिंदे, महादेव पवार, मलकापूरचे माजी नगराध्यक्ष आबासाहेब गावडे, माजी सभापती राजेंद्र यादव, माजी नगरसेवक दिनेश रैनाक, हणमंतराव जाधव, राजू मुल्ला, पैलवान आनंदराव मोहिते, सूरज शेवाळे, अजय पावसकर, प्रमोद शिंदे, दाजी जमाले, रमेश लवटे, माजी जि. प. सदस्या सौ. शामबाला घोडके, सौ. सारिका गावडे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

The post यशवंत विचारांना अनुसरून सुसंस्कृत राजकारण करणार  first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/2824/feed 0
सावत्र भाऊ आणि बहिणींना जागा दाखवा  https://janswarashtra.com/archives/2342 https://janswarashtra.com/archives/2342#respond Sun, 10 Nov 2024 09:46:01 +0000 https://janswarashtra.com/?p=2342 चित्राताई वाघ यांची टीका; ओंड येथे महायुतीचा महिला मेळावा उत्साहात  कराड/प्रतिनिधी : –  राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या भावांनी ‘लाडकी बहीण’सारखी कल्याणकारी योजना राबवली. परंतु, ही योजना बंद पाडण्यासाठी त्याच बहिणींचे सावत्र भाऊ कोर्टात गेले. तसेच सावत्र बहिणींनीही या योजनेसाठी सरकारी तिजोरीत पैसा नसल्याचे धादांत खोटे ... Read more

The post सावत्र भाऊ आणि बहिणींना जागा दाखवा  first appeared on Jan Swarashtra.

]]>

चित्राताई वाघ यांची टीका; ओंड येथे महायुतीचा महिला मेळावा उत्साहात 

कराड/प्रतिनिधी : – 

राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या भावांनी ‘लाडकी बहीण’सारखी कल्याणकारी योजना राबवली. परंतु, ही योजना बंद पाडण्यासाठी त्याच बहिणींचे सावत्र भाऊ कोर्टात गेले. तसेच सावत्र बहिणींनीही या योजनेसाठी सरकारी तिजोरीत पैसा नसल्याचे धादांत खोटे सांगत महिलांना पैशांची लाच देऊ नका, अशी भाषा वापरली. आया – बहिणींचा आधार काढून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या अशा सावत्र भाऊ आणि बहिणींना या निवडणुकीत जागा दाखवा, अशी टीका भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, तसेच सुप्रियाताई सुळे आणि प्रणितीताई शिंदे यांच्यावर केली.

ओंड : डॉ. अतुल भोसले यांच्या प्रचारार्थ आयोजित महिला मेळाव्यात बोलताना चित्राताई वाघ.

भव्य महिला मेळावा : ओंड (ता. कराड) येथे महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रचारार्थ आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. विचारमंचावर उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले, कृष्णा महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या संस्थापिका सौ. उत्तराताई भोसले (आईसाहेब), भाजप सातारा जिल्हा महिला अध्यक्षा सुरभीताई भोसले, गौरवीताई भोसले, कराडच्या माजी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, कविता कचरे, सारिका गावडे यांच्यासह महिला पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

सूर्य – चंद्र असेपर्यंत संविधान हटणार  नाही : महाविकास आघाडीचे नेते खोटे पण रेटून बोलणारे चोर आणि लुटेरे आहेत. त्यांनी संविधान हटवण्यात येणार असल्याची आवई उठवल्याचे सांगत चित्राताई वाघ म्हणाल्या, गोरगरीब, आदिवासींचे आरक्षण काढून घेण्यात येणार असल्याची भीती घातली. मात्र, मातृशक्तीला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केलेल्या बाबासाहेबांचे संविधान सूर्य – चंद्र असेपर्यंत कोणीही हटवू शकणार नाही. देशात 70 वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसने महिलांसाठी काय केले? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. तसेच मोदींनी सार्वजनिक शौचालय, उज्वला योजना, जनधन योजना, मोफत धान्य, महिलांना 50 टक्के सवलतीत एसटी प्रवास, लखपती दीदी योजना, आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री आवास योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण अशा अनेक कल्याणकारी योजना राबवल्या असल्याचे सांगितले. 

अतुलबाबांना कोणीही हरवू शकणार नाही : करोना कालावधीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकवर लाईव्ह येत जनतेला केवळ सल्ले देण्याचे काम केल्याचे सांगत वाघ म्हणाल्या, कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातही याहून काही वेगळी परिस्थिती नव्हती. येथील लोकप्रतिनिधी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जनतेसाठी काय केले, हे पहा. याउलट डॉ. अतुलबाबा भोसले हे करोना कालावधीत लाडक्या बहिणींच्या पाठीशी भावासारखे उभे राहिले. त्यांना आधार दिला, जनतेची सेवा केली. या मतदारसंघातील दीड लाख बहिणी जर अतुलबाबांच्या पाठीशी उभ्या राहिल्या; तर त्यांना कोणीही हरवू शकणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

भाषणबाजी करणाऱ्यांनी महिलांसाठी काय केले ? : 2014 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिलांच्या कल्याणासाठी अनेक योजना आणल्याचे सांगत डॉ. अतुल भोसले म्हणाले, अडीच वर्षांत महाविकास आघाडीने महिलांसाठी एकही चांगली योजना आणली नाही. याउलट महायुतीने महिलांना सन्मान देण्याचे काम केले. लाडकी बहीण योजनेला येथील लोकप्रतिनिधी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणुकीचा जुमला असल्याचे म्हटले. तसेच या योजनेसाठी सरकारी तिजोरीत पैसा नसल्याचे अधिवेशनात सांगत दुसरीकडे ही योजना आमची असल्याचाही दावाही त्यांनी केला. मग ते मुख्यमंत्री असताना पावणेचार वर्षांत महिलांच्या खात्यावर एकही पैसा आला का? अशा योजनांबाबत कधी ब्र शब्दही काढला का? असा सवाल उपस्थित करत भाषणबाजी करणाऱ्यांनी महिलांसाठी काय केले, अशी टीकाही त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर केली. 

अतुलबाबांना भाऊबीजेची भेट देऊया : डॉ. अतुलबाबा भोसले यांनी लाडक्या बहिणींना, तसेच बांधकाम कामगारांना मोठा लाभ मिळवून दिला आहे. त्यामुळे अतुलबाबांना आपण भाऊबीजेची भेट म्हणून विधानसभेत पाठवूया, असे आवाहन रोहिणी शिंदे यांनी उपस्थित महिलांना केले.

ओंड : महिला मेळाव्यास झालेली अलोट गर्दी.

अतुलबाबंना साथ देण्याची वेळ : करोना कालावधीत कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉ. सुरेश भोसले आणि डॉ. अतुलबाबा भोसले यांनी माता – भगिनी, तसेच गोरगरीब जनतेची सेवा केली आहे, त्यांना मोलाची मदत केली. कराडला पूर परिस्थिती निर्माण झाल्यावर, तसेच पाण्याची कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाल्यावर डॉ. अतुलबाबा भोसले जनतेसाठी धावून आले. बांधकाम कामगार आणि लाडक्या बहिणींना मोठा लाभ मिळवून दिला. आता आपण त्यांना साथ देण्याची वेळ आली असल्याचे सुरभीताई भोसले यांनी सांगितले. 

“खा कुणाचं बी मटण; दाबा कमळाचं बटन” 

या निवडणुकीत विरोधकांकडून अनेक अमिषे दाखवली जातील. मात्र, त्याला कोणीही भुलू नका. लाडक्या बहिणी आणि बांधकाम कामगारांचे फॉर्म भरून घेत त्यांना लाभ मिळवून देण्यापर्यंत अतुलबाबांनी मोठे परिश्रम घेतले आहे. त्यामुळे आपल्या या भावाच्या कष्टाचे चीज करण्यासाठी गृहलक्ष्मींनी आपल्या पतींवर लक्ष ठेवून “खा कुणाचं बी मटण; पण दाबा कमळाचं बटन” असा कानमंत्र द्यावा, अशी मिश्किल टिपण्णी चित्राताई वाघ यांनी करताच महिलांसह उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला. 

महिलांच्या हाताला घरबसल्या काम देणार 

कराडच्या एमआयडीसीला फाईव्ह स्टारचा दर्जा देण्याची मागणी मी अमितभाई शहा यांच्याकडे केली आहे. त्याला त्यांनी होकार दिला असून या ठिकाणी आता मोठे उद्योग येतील. यातून अनेक युवक, नागरिकांना रोजगार मिळणार आहे. त्याचबरोबर या माध्यमातून कराड दक्षिणसह तालुक्यातील अनेक महिलांच्या हाताला घरबसल्या रोजगार मिळवून देण्याचे कामही आपण करणार असल्याची ग्वाही डॉ. अतुल भोसले यांनी यावेळी महिलांना दिली. तसेच आपला लाडका भाऊ, मुलगा म्हणून आपण मला मतरुपी आशीर्वाद द्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी उपस्थित माता – भगिनींना केले. 

The post सावत्र भाऊ आणि बहिणींना जागा दाखवा  first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/2342/feed 0
आस्मा इनामदार ठरल्या मिसेस कराडच्या मानकरी https://janswarashtra.com/archives/1776 https://janswarashtra.com/archives/1776#respond Wed, 16 Oct 2024 12:39:17 +0000 https://janswarashtra.com/?p=1776 रूग्वेदिका यादव व जिजाई महिला मंचच्या महिला महामहोत्सवास महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद कराड/प्रतिनिधी : –  यशवंत विकास आघाडीचे नेते राजेंद्रसिंह यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सौ. रूग्वेदिका राजेंद्रसिंह यादव आणि जिजाई महिला मंच व उद्योग समूह यांच्यावतीने घेण्यात आलेल्या महिला महामहोत्सवाला महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमासाठी हजारो महिलांनी उपस्थिती लावली. यावेळी घेण्यात आलेल्या मिसेस कराड स्पर्धेत आस्मा कागदी-इनामदार ... Read more

The post आस्मा इनामदार ठरल्या मिसेस कराडच्या मानकरी first appeared on Jan Swarashtra.

]]>
रूग्वेदिका यादव व जिजाई महिला मंचच्या महिला महामहोत्सवास महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

कराड/प्रतिनिधी : – 

यशवंत विकास आघाडीचे नेते राजेंद्रसिंह यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सौ. रूग्वेदिका राजेंद्रसिंह यादव आणि जिजाई महिला मंच व उद्योग समूह यांच्यावतीने घेण्यात आलेल्या महिला महामहोत्सवाला महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमासाठी हजारो महिलांनी उपस्थिती लावली. यावेळी घेण्यात आलेल्या मिसेस कराड स्पर्धेत आस्मा कागदी-इनामदार यांनी प्रथम क्रमांक मिळवून सोन्याचा हार पटकावला. महोत्सवातील अलोट गर्दीने अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर व बिग बॉस फेम धनंजय पोवार (डीपी) भारावून गेले.

मान्यवरांची उपस्थिती : कार्यक्रमास राजेंद्रसिंह यादव, माजी नगराध्यक्षा सौ. संगिता देसाई, विजयसिंह यादव, स्मिता हुलवान, माजी नगरसेवक विजय वाटेगावकर, हणमंतराव पवार, अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर, बिग बॉस उपविजेता धनंजय पोवार, रिल स्टार रवी दाजी, अभिनेते वासू पाटील, नगरसेवक गजेंद्र कांबळे निशांत ढेकळे, विनोद भोसले, किरण पाटील, प्रीतम यादव, बाळासाहेब यादव, ओंकार मुळे यांची उपस्थिती होती. यांची प्रमुख उपस्थिती होती.

महिलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी महामहोत्सव : राजेंंद्रसिंह यादव म्हणाले, विविध क्षेत्रात महिला कार्यरत आहेत. महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून कराडमध्ये या महिला महामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांचा या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला असून महोत्सवाचा महिलांना निश्चित लाभ होईल.

महिलांच्या कौशल्य विकसात महोत्सव प्रभावी ठरेल : स्मिता हुलवान म्हणाल्या, कराडमध्ये आयोजित केलेल्या या महिला महामहोत्सवाला अभूतपूर्व असा महिलांनी प्रतिसाद दिला आहे. महोत्सवाच्या माध्यमातून महिलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाबरोबर त्यांच्यातील कौशल्य विकसित करण्यासाठी महोत्सव प्रभावी ठरेल.

विविध स्पर्धा उत्साहात : या कार्यक्रमात पाककला स्पर्धा, मिसेस कराड, होम मिनिस्टर, लाईव्ह ऑर्केस्ट्रा दांडिया, नारी सन्मान सोहळा, महिला बचत गटाच्या वस्तू प्रदर्शन व विक्री या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नारी शक्ती सन्मान अंतरंग अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा वर्कर यांचा सन्मान करण्यात आला. उपस्थित सर्व महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या.

मान्यवरांच्या हस्ते बक्षिसाचे वितरण : मिसेस कराड स्पर्धेत द्वितीय क्रमांक विजेत्या प्रतिज्ञा देसाई ठरल्या. त्यांना मिक्सर बक्षिस देण्यात आले. मिसेस कराड स्पर्धेचे परिक्षण स्मिता बेंद्रे यांनी केले. पाककला स्पर्धेत सिया पवार (मिक्सर), द्वितीय क्रमांक स्वाती जाधव (शेगडी), तृतीय क्रमांक निर्मल कुंभार (पार्टीवेअर ड्रेस), उत्तेजनार्थ गौतमी कांबळे (गिफ्ट हॅम्पर), पूनम गोसावी (इस्त्री) पाककलेचे परिक्षण प्रो. डॉ. ईला जोशी यांनी केले. यावेळी काढण्यात आलेल्या महा लकी ड्रॉमध्ये लता माने (मलकापूर) यांना प्रथम क्रमांक मिळाला. त्यांना वॉशिंग मशिन मिळाले. द्वितीय क्रमांक मंगल सावंत (आंधळी पलुस) यांना फ्रिज तर तृतीय क्रमांक रेश्मा लादे यांना बजाज फॅन बक्षीस देण्यात आले. अशा प्रकारे 23 लकी ड्रॉ काढण्यात आले. तसेच उपस्थित महिलांना गिफ्ट देण्यात आले.

मोलाचे योगदान : जिजाई महिला मंचच्या ज्योती पवार, उषा साळुंखे, रुपाली मुंढेकर, दिपाली मुंढेकर, मेघा कोरडे, पूजा मुंढेकर, सायली मुंढेकर, तेजश्री दुर्गावडे, अश्विनी पवार, सुनीता माने, गीता देशमाने, अश्विनी धनवडे, साधना राजमाने, सुचित्रा सोनावले यांनी परिश्रम घेतले.

The post आस्मा इनामदार ठरल्या मिसेस कराडच्या मानकरी first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/1776/feed 0
“आशिकी” हिट्सचे रविवारी कराडमध्ये आयोजन https://janswarashtra.com/archives/1767 https://janswarashtra.com/archives/1767#respond Wed, 16 Oct 2024 10:02:26 +0000 https://janswarashtra.com/?p=1767 ‘चढता सुरज धीरे धीरे’ चे होणार सादरीकरण कराड/प्रतिनिधी : –  मुहंमद रफी म्युझिक अ‍ॅकॅडमी, कराडच्या वर्धापन दिनानिमित्त ‘आशिकी ‘ हिट्स या सदाबहार हिंदी गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन रविवार दि. 20 ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे. सायंकाळी 6.30 वाजता यशवंतराव चव्हाण स्मृती सदन (टाऊन हॉल) येथे हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात आशिकी चित्रपटातील सर्व बहारदार गीतांबरोबर ... Read more

The post “आशिकी” हिट्सचे रविवारी कराडमध्ये आयोजन first appeared on Jan Swarashtra.

]]>
‘चढता सुरज धीरे धीरे’ चे होणार सादरीकरण

कराड/प्रतिनिधी : – 

मुहंमद रफी म्युझिक अ‍ॅकॅडमी, कराडच्या वर्धापन दिनानिमित्त ‘आशिकी ‘ हिट्स या सदाबहार हिंदी गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन रविवार दि. 20 ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे. सायंकाळी 6.30 वाजता यशवंतराव चव्हाण स्मृती सदन (टाऊन हॉल) येथे हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात आशिकी चित्रपटातील सर्व बहारदार गीतांबरोबर नव्वदच्या दशकातील सुपरहीट चित्रपटातील गीते तसेच खास लोकाग्रहास्तव अजीज नाजा यांची अजरामर कव्वाली ‘चढता सुरज धीरे धीरे..’ हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण आहे.

मुहंमद रफी म्युझिक अ‍ॅकॅडमीच्या वतीने प्रतिवर्षी हा कार्यक्रम होत असतो. अ‍ॅकॅडमीचे प्रमुख महागुरू असिफ बागवान यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम साकारला आहे. कराडकरांसाठी हा कार्यक्रम म्हणजे एक संगीतमय पर्वणीच असते. यावर्षी आशिकी या सुपरहीट चित्रपटांतील गीतांबरोबर मैने प्यार किया, बाजीगर, दिल, प्रेम कैदी, सपने साजन के, रोजा, साजन, हन्ड्रेड डेज, कुछ कुछ होत है..कभी हा कभी ना.. अशा सुपरहीट चित्रपटातील गीते सादर होणार आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

 

The post “आशिकी” हिट्सचे रविवारी कराडमध्ये आयोजन first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/1767/feed 0
माणसाचे व्यक्तिमत्व त्याच्या आवाजावर अवलंबून असते  https://janswarashtra.com/archives/1679 https://janswarashtra.com/archives/1679#respond Sat, 12 Oct 2024 12:23:08 +0000 https://janswarashtra.com/?p=1679 प्रा. दीपक देशपांडे; शारदीय व्याख्यानमाला पुष्प नववे, कराडकर रसिकश्रोते हास्यकल्लोळात बुडाले  कराड/प्रतिनिधी : –  हास्य हे माणसाच्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक असून हास्यामुळे माणसाचे आयुष्यही वाढते. जशी मैला मैलावर भाषा बदलते, तसेच हास्याचे प्रकारे बदलतात. त्याचबरोबर प्रत्येक भाषा आणि त्यातील उच्चारातूनही  अनेक गमती-जमती घडत राहतात, असे सांगून प्रत्येक माणसाचे व्यक्तिमत्व हे त्याच्या आवाजावर अवलंबून असते, ... Read more

The post माणसाचे व्यक्तिमत्व त्याच्या आवाजावर अवलंबून असते  first appeared on Jan Swarashtra.

]]>

प्रा. दीपक देशपांडे; शारदीय व्याख्यानमाला पुष्प नववे, कराडकर रसिकश्रोते हास्यकल्लोळात बुडाले 

कराड/प्रतिनिधी : – 

हास्य हे माणसाच्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक असून हास्यामुळे माणसाचे आयुष्यही वाढते. जशी मैला मैलावर भाषा बदलते, तसेच हास्याचे प्रकारे बदलतात. त्याचबरोबर प्रत्येक भाषा आणि त्यातील उच्चारातूनही  अनेक गमती-जमती घडत राहतात, असे सांगून प्रत्येक माणसाचे व्यक्तिमत्व हे त्याच्या आवाजावर अवलंबून असते, असे मत झी मराठी वृत्तवाहिनीचे पहिले हास्यसम्राट प्रा. दीपक देशपांडे यांनी व्यक्त केले.

येथील नगरपरिषद आणि नगरवाचनालयातर्फे आयोजित 92 व्या शारदीय व्याख्यानमालेत शुक्रवार, दि. 10 रोजी शेवटचे नववे पुष्प गुंफताना ‘हास्यकल्लोळ’ या विषयावर त्यांनी एकपात्री प्रयोग सादर केला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, माजी नगरसेवक सौरभ पाटील, प्रा. बी. एस. खोत, प्रशांत लाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

बसस्थानकावरील अनाउन्सरला श्रोत्यांची दाद :

या एकपात्री प्रयोगात सुरुवातीला त्यांनी डॉक्टर आणि रुग्णांतील संवाद, तसेच पोलिसांमधील आवाजातील गमतीजमती सादर केल्या. तसेच बस स्थानकावरील अनाउन्सरच्या सादर केलेल्या विशिष्ट पट्टीतील हुबेहूब आवाजाला रसिक श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्तपणे दाद दिली. त्याचबरोबर विमानतळावर विविध देशांतील स्थानिक भाषेत होणारी अनाउन्समेंट सादर करून श्रोत्यांची दाद मिळवली. आकाशवाणीवरील निवेदन, विविध कार्यक्रम, फोनवरील गमतीशीर संभाषण आणि रॉंग नंबरचा मजेदार काल्पनिक किस्साही त्यांनी रसिकांसमोर सादर केला. त्यालाही चांगली दाद मिळाली. 

सोलापुरी माणसांचा फोनवरील गमतीशीर संवाद : सोलापुरी आवाजामुळे घडणाऱ्या गमती सांगत प्रा. देशपांडे यांनी सोलापुरी माणसांचा फोनवरील गमतीशीर संवाद, शहरी आणि ग्रामीण भागातील काही शब्दांचा उच्चार, वारंवार उच्चारले जाणारे शब्द आणि त्यातून होणारे विनोद सादर केले.

श्रीराम लागू आणि निळूभाऊंवर टाळ्यांचा कडकडाट :

तेलगू आणि कानडी भाषा, त्याचबरोबर मराठी आणि इंग्रजी भाषेतील शब्दांच्या उच्चारांमुळे होणाऱ्या गमती व पुणेरी माणसांचे मजेशीर संवाद प्रा. देशपांडे यांनी सादर केले. तसेच जुन्या मराठी चित्रपटांमधील गाण्यांमध्ये तार स्वरूपात असलेले नायक आणि नायिकांचे आवाज, दिग्गज अभिनेते दिवंगत डॉ. श्रीराम लागू, तसेच जगभरात मराठी चित्रपटातील खलनायक म्हणून ओळख निर्माण केलेले निळूभाऊ फुले यांचे आवाज सादर केले. यावेळी रसिक श्रोत्यांनी टाळांच्या कडकडाटात उस्फूर्तपणे दाद दिली. तसेच कानडी चित्रपटातील आवाजाच्या गमतीजमतीही त्यांनी सादर केल्या. 

सांग सांग भोलानाथ’ला इटालियन साज : तेलगू चित्रपटातील देवदास आणि पारो यांच्यातील आवाजामुळे गमतीशीर ठरणारा प्रेमसंवाद, दक्षिणात्य व हिंदी चित्रपटातील फायटिंगच्या गमती, शोले चित्रपटातील धर्मेंद्र आणि हेमामालिनी यांच्या संवादाच्या गमती, मिथुन चक्रवर्ती यांच्या सिनेमातील फायटिंगच्या भन्नाट कल्पना त्यांनी सादर केल्या. तसेच इंग्रजी सिनेमांतील गाण्यांच्या आवाजातील विशिष्ट टोन, ‘सांग सांग भोलानाथ’ हे गाणे सर इटालियन गायकांनी गायले असते, तर त्यातून निर्माण होणार विनोद, तसेच पॉप सिंगरने जर काही मराठी गाणी गायली, तर त्यातून कशा गमतीजमती निर्माण होतील, त्याचबरोबर जात्यांवरील बायकांच्या गाण्यांचेही त्यांनी यावेळी मजेशीर सादरीकरण केले. त्यालाही रसिकांनी टाळ्यांच्या स्वरूपात उत्स्फूर्तपणे दाद दिली.

बडबड गीते आणि बालगीते : ऑर्केस्ट्रामधील एकच कलाकार स्त्री आणि पुरुषाचा काढत असलेला आवाज, ‘नाच रे मोरा’ हे गाणे जर पोवाडा स्वरूपात गायले, तर काय गंमत येईल, याचे उत्कृष्ट सादरीकरण त्यांनी केले. लहान मुलांनी बोबड्या बोलीत गायलेली बडबड गीते, बालगीते सादर करत टीव्हीवर लागणाऱ्या काही जाहिरातींमधील गमती जमती त्यांनी सांगितल्या आणि दक्षिण भारतातील शास्त्रीय संगीतकार पंडित हृदयनाथ व पंडित कुमार गंधर्व यांच्या आवाजात सध्याची काही चित्रपटांमधील गाणीही वेगळ्या पद्धतीने त्यांनी सादर केली. 

राजकीय दिग्गज नेत्यांची मिमिक्री : अनेक राजकीय दिग्गज नेत्यांचा हुबेहूब आवाज त्यांनी सादर केले. यामध्ये एखादे सुरू असलेले भाषण हे कोणत्या राजकीय पक्षाचे आहे; हे कसे ओळखायचे, हेही त्यांनी आवाजावरील चढउतारावरून सांगितले. तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीकुमार शिंदे, विलासराव देशमुख यांचे हुबेहूब खूप आवाज सादर केले. याला श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. तसेच माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी सचिन तेंडुलकरचे शतक झाल्यावर प्रतिक्रिया कशी दिली असती, याचे गमतीशीर सादरीकरण केले. वृत्तवाहिन्यांवरील महाचर्चांमध्ये बोलत असताना किरीट सोमय्या, सभागृहातील देवेंद्र फडणवीस यांचे भाषण, अण्णा हजारे यांच्या आवाजातील हिंदी आणि मराठी भाषेतील संवादाच्या गमती, तसेच महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचा हुबेहूब आवाज सादर केला. तसेच सचिन तेंडुलकर यांचे महाशतक झाल्यावर पवार साहेबांनी त्यांच्या आवाजात व भाषाशैलीत कशी प्रतिक्रिया दिली असती, याचे गमतीशीर सादर करून भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांनी पुणे येथील भाषणात प्रभू श्री राम यांच्यावर बोलतानाचा संवाद त्यांनी सादर करून उपस्थितांची मनी जिंकली. त्यांच्या या कलाकारीला उपस्थित रसिक श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. एकंदरीत प्रा. देशपांडे यांनी सादर केलेल्या या एकपात्री विनोदी प्रयोगात कराडकर रसिक श्रोते आकंठ बुडालाचे दिसून आले. 

हास्यसम्राटने एकपात्री कलाकारांना व्यासपीठ दिले 

झी मराठी या वृत्तवाहिनीवरील हास्यसम्राट कार्यक्रमाने अनेक एकपात्री कलाकारांना वेगळी ओळख निर्माण करून दिली. या कार्यक्रमात महाराष्ट्राचा पहिला हास्यसम्राट होण्याचा बहुमान मला मिळाला. हास्यसम्राटने एकपात्री कलाकारांना एक व्यासपीठ निर्माण करून दिले. आज मी जगभरात जवळपास सव्वातीन हजारांपेक्षा जास्त एकपात्री प्रयोग केले असून यातून रसिक श्रोत्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवत हल्लीच्या धकाधकीच्या जीवनातून त्यांना विरंगुळा दिल्याचे समाधान मिळते, असे मत प्रा. देशपांडे यांनी व्यक्त केले.

कराडच्या भूमीत मोठे कर्तृत्व

कराडची पावन भूमी सर्वार्थाने समृद्ध आहे. या भूमीने महाराष्ट्राला अनेक संत, साहित्यिक, समाजकारणी, राजकारणी आणि दर्जेदार कलाकार दिलेत. यशवंतराव चव्हाण हेही एक साहित्यिक आणि थोर राजकारणी होते. त्यामुळे कराडच्या भूमीत मोठे कर्तुत्व आहे, असे गौरवोद्गार काढत यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने असलेल्या या राज्यातील मोठ्या व्यासपीठावर, तसेच तब्बल 92 वर्ष अविरतपणे सुरू असलेल्या या ज्ञानयज्ञात कराडकर रसिक श्रोत्यांसमोर माझी कला सादर करण्याचा दुसऱ्यांदा संधी दिली, त्याबद्दल त्यांनी आयोजक व संयोजकांचे आभारही मानले.

 

The post माणसाचे व्यक्तिमत्व त्याच्या आवाजावर अवलंबून असते  first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/1679/feed 0
भजन स्पर्धेत ‘कृष्णा’च्या कामगार संघाचा गवगवा https://janswarashtra.com/archives/1507 https://janswarashtra.com/archives/1507#respond Sun, 06 Oct 2024 06:09:09 +0000 https://janswarashtra.com/?p=1507 सांघिक व वैयक्तिक स्तरावर कामगारांनी पटकाविली 3 पारितोषिके कराड/प्रतिनिधी : –  महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या गट कार्यालय, सांगली यांच्यावतीने आयोजित गटस्तरीय कामगार पुरुष भजन स्पर्धेत य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या कामगार संघाने घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेत कृष्णा कारखान्याच्या कामगार संघाने सांघिक तृतीय क्रमांक आणि उत्कृष्ट तालसंचलनासाठी प्रथम क्रमांक पटकावला. तसेच वैयक्तिक स्तरावर ... Read more

The post भजन स्पर्धेत ‘कृष्णा’च्या कामगार संघाचा गवगवा first appeared on Jan Swarashtra.

]]>

सांघिक व वैयक्तिक स्तरावर कामगारांनी पटकाविली 3 पारितोषिके

कराड/प्रतिनिधी : – 

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या गट कार्यालय, सांगली यांच्यावतीने आयोजित गटस्तरीय कामगार पुरुष भजन स्पर्धेत य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या कामगार संघाने घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेत कृष्णा कारखान्याच्या कामगार संघाने सांघिक तृतीय क्रमांक आणि उत्कृष्ट तालसंचलनासाठी प्रथम क्रमांक पटकावला. तसेच वैयक्तिक स्तरावर पखवाजवादनाचे प्रथम पारितोषिक पटकावले.

विजेत्यांचा गौरव : विजेत्यांना समारंभाचे अध्यक्ष य. मो. कृष्णा कारखान्याचे व्यवस्थापक एच आर संदिप भोसले, प्रमुख पाहुणे महावितरणचे आस्थापना अधिकारी प्रकाश शिंदे, व सह्याद्री स्टार्चचे व्यवस्थापक एच आर विश्वास पाटील यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.

कृष्णाला अध्यक्षस्थानाचा बहुमान : सांगली येथील वसंतदादा औद्योगिक वसाहतमधील ललित कला भवन येथे झालेल्या या पारितोषिक वितरण कार्यक्रमास महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या सांगली गट कार्यालयाचे प्र.कामगार कल्याण अधिकारी संभाजी पवार, कराड केंद्र संचालक रूपेश मोरे, एम. के. कापूरकर, बाळासाहेब पाटील उपस्थित होते. यावर्षी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविण्याचा बहुमान य. मो कृष्णा सहकारी कारखान्याचे एच आर मॅनेजर संदीप भोसले यांना मिळाला.

कल्याणकारी योजनांचा कर्मचाऱ्यांनी लाभ घ्यावा : कार्यक्रमाचे अध्यक्ष संदीप भोसले म्हणाले, महाराष्ट्र कामगार मंडळाच्या वतीने कामगारांच्या सुख-समृद्धीसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. या योजनांचा सर्व कर्मचाऱ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा. तसेच सर्व संस्थांनी वर्षभरात किमान दोन कार्यक्रम आपापले आस्थापनांमध्ये घेऊन मंडळाचे विविध उपक्रम आपले कर्मचाऱ्यांपर्यंत पोहचवावेत व बल्क सभासद नोंदणीबाबत सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले.

मंडळाने समूह विमा योजना राबवण्यासाठी पुढाकार घ्यावा : संदीप भोसले यांनी कामगार व त्यांचे कुटुंबियांसाठी समूह विमा योजना राबविणेसाठी मंडळाने पुढाकार घ्यावा, असा प्रस्ताव मांडला. स्पर्धेतील सर्व विजेत्यांना आणि सहभागी संघांना शुभेच्छा देत पुढील गटस्तरीय भजन स्पर्धा कारखाना साईटवर आयोजित करण्याची मागणीही केली. मंडळाने याचा स्वीकार करत या स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी द्यावी, अशी विनंती त्यांनी कृष्णा कारखाना व्यवस्थापनाच्यावतीने केली.

कामगार संघाचे केले कौतुक : या यशाबद्दल कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, उपाध्यक्ष जगदीश जगताप, संचालक मंडळ, एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर सी. एन. देशपांडे, कार्यकारी संचालक महावीर घोडके यांनी संपूर्ण संघाचे अभिनंदन केले आहे.

सांघिक व वैयक्तिक बक्षिसांची खैरात : या भजन स्पर्धेत कृष्णा कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी सांघिकसह वैयक्तिक बक्षिसेही मिळवली. उत्कृष्ट पखवाजवादक म्हणून योगेश जवारे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. संघात हणमंत काशीद, जयवंत सुतार, सुरेश कदम, दिलीप जवारे, योगेश जवारे, मल्हारी जवारे, शशिकांत साळुंखे, तानाजी चव्हाण, आनंदराव माने, दीपक काशीद, अतुल कुलकर्णी, मोहन माने या कामगारांचा सहभाग होता.

मोहन कदम यांनी विशेष परिश्रम घेत संघाचा नियोजनबद्ध सराव करून घेतला. कामगार कल्याण अधिकारी संभाजी पवार यांनी प्रास्ताविक केले. कराड केंद्र संचालक रूपेश मोरे यांनी आभार मानले.

The post भजन स्पर्धेत ‘कृष्णा’च्या कामगार संघाचा गवगवा first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/1507/feed 0
नवरात्रोत्सवानिमित्त रंगणार सामुदायिक भोंदल्याची धमाल https://janswarashtra.com/archives/1489 https://janswarashtra.com/archives/1489#respond Fri, 04 Oct 2024 13:51:23 +0000 https://janswarashtra.com/?p=1489 कराडमध्ये शनिवारी गोरक्षण संस्थेच्या वतीने आयोजन  कराड/प्रतिनिधी : – येथील गोरक्षण संस्थेच्या वतीने सांस्कृतिक परंपरा जोपासत प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही नवरात्रोत्सवानिमित्त शनिवार, दि. 5 रोजी महिलांसाठी सामुदायिक भोंदल्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती गोरक्षण बचाव समिती, अध्यक्ष श्री. सुनील अनंत पावसकर यांनी दिली. भाजी-मंडईतील गोरक्षण संस्थेत रंगणार कार्यक्रम : हा कार्यक्रम शनिवारी सायंकाळी 4.30 ते 7 या वेळेत ... Read more

The post नवरात्रोत्सवानिमित्त रंगणार सामुदायिक भोंदल्याची धमाल first appeared on Jan Swarashtra.

]]>

कराडमध्ये शनिवारी गोरक्षण संस्थेच्या वतीने आयोजन 

कराड/प्रतिनिधी : –

येथील गोरक्षण संस्थेच्या वतीने सांस्कृतिक परंपरा जोपासत प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही नवरात्रोत्सवानिमित्त शनिवार, दि. 5 रोजी महिलांसाठी सामुदायिक भोंदल्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती गोरक्षण बचाव समिती, अध्यक्ष श्री. सुनील अनंत पावसकर यांनी दिली.

भाजी-मंडईतील गोरक्षण संस्थेत रंगणार कार्यक्रम : हा कार्यक्रम शनिवारी सायंकाळी 4.30 ते 7 या वेळेत कराड भाजी-मंडई येथील गोरक्षण संस्थेमध्ये आयोजित करण्यात आला आहे.

सहभागी महिलांना आकर्षक भेटवस्तू : या कार्यक्रमात सहभागी महिलांना विविध सांस्कृतिक कार्यक्रम, उखाणे व लकी ड्रॉ स्पर्धेद्वारे आकर्षक भेट वस्तू देण्यात येणार आहे.

धार्मिक परंपरा जोपासण्यासाठी आयोजन : महाराष्ट्रीयन धार्मिक परंपरा नवीन पिढीला अवगत होवून त्या जोपासल्या जाव्यात या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या भोंदला कार्यक्रमास परिसरातील सर्व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन गोरक्षण संस्थेच्यावतीने सौ. संगीता पवार, सौ. ज्योती दंडवते, श्रीमती गीता सूर्यवंशी यांनी केले आहे.

The post नवरात्रोत्सवानिमित्त रंगणार सामुदायिक भोंदल्याची धमाल first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/1489/feed 0