आस्मा इनामदार ठरल्या मिसेस कराडच्या मानकरी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

रूग्वेदिका यादव व जिजाई महिला मंचच्या महिला महामहोत्सवास महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

कराड/प्रतिनिधी : – 

यशवंत विकास आघाडीचे नेते राजेंद्रसिंह यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सौ. रूग्वेदिका राजेंद्रसिंह यादव आणि जिजाई महिला मंच व उद्योग समूह यांच्यावतीने घेण्यात आलेल्या महिला महामहोत्सवाला महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमासाठी हजारो महिलांनी उपस्थिती लावली. यावेळी घेण्यात आलेल्या मिसेस कराड स्पर्धेत आस्मा कागदी-इनामदार यांनी प्रथम क्रमांक मिळवून सोन्याचा हार पटकावला. महोत्सवातील अलोट गर्दीने अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर व बिग बॉस फेम धनंजय पोवार (डीपी) भारावून गेले.

मान्यवरांची उपस्थिती : कार्यक्रमास राजेंद्रसिंह यादव, माजी नगराध्यक्षा सौ. संगिता देसाई, विजयसिंह यादव, स्मिता हुलवान, माजी नगरसेवक विजय वाटेगावकर, हणमंतराव पवार, अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर, बिग बॉस उपविजेता धनंजय पोवार, रिल स्टार रवी दाजी, अभिनेते वासू पाटील, नगरसेवक गजेंद्र कांबळे निशांत ढेकळे, विनोद भोसले, किरण पाटील, प्रीतम यादव, बाळासाहेब यादव, ओंकार मुळे यांची उपस्थिती होती. यांची प्रमुख उपस्थिती होती.

महिलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी महामहोत्सव : राजेंंद्रसिंह यादव म्हणाले, विविध क्षेत्रात महिला कार्यरत आहेत. महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून कराडमध्ये या महिला महामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांचा या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला असून महोत्सवाचा महिलांना निश्चित लाभ होईल.

महिलांच्या कौशल्य विकसात महोत्सव प्रभावी ठरेल : स्मिता हुलवान म्हणाल्या, कराडमध्ये आयोजित केलेल्या या महिला महामहोत्सवाला अभूतपूर्व असा महिलांनी प्रतिसाद दिला आहे. महोत्सवाच्या माध्यमातून महिलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाबरोबर त्यांच्यातील कौशल्य विकसित करण्यासाठी महोत्सव प्रभावी ठरेल.

विविध स्पर्धा उत्साहात : या कार्यक्रमात पाककला स्पर्धा, मिसेस कराड, होम मिनिस्टर, लाईव्ह ऑर्केस्ट्रा दांडिया, नारी सन्मान सोहळा, महिला बचत गटाच्या वस्तू प्रदर्शन व विक्री या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नारी शक्ती सन्मान अंतरंग अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा वर्कर यांचा सन्मान करण्यात आला. उपस्थित सर्व महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या.

मान्यवरांच्या हस्ते बक्षिसाचे वितरण : मिसेस कराड स्पर्धेत द्वितीय क्रमांक विजेत्या प्रतिज्ञा देसाई ठरल्या. त्यांना मिक्सर बक्षिस देण्यात आले. मिसेस कराड स्पर्धेचे परिक्षण स्मिता बेंद्रे यांनी केले. पाककला स्पर्धेत सिया पवार (मिक्सर), द्वितीय क्रमांक स्वाती जाधव (शेगडी), तृतीय क्रमांक निर्मल कुंभार (पार्टीवेअर ड्रेस), उत्तेजनार्थ गौतमी कांबळे (गिफ्ट हॅम्पर), पूनम गोसावी (इस्त्री) पाककलेचे परिक्षण प्रो. डॉ. ईला जोशी यांनी केले. यावेळी काढण्यात आलेल्या महा लकी ड्रॉमध्ये लता माने (मलकापूर) यांना प्रथम क्रमांक मिळाला. त्यांना वॉशिंग मशिन मिळाले. द्वितीय क्रमांक मंगल सावंत (आंधळी पलुस) यांना फ्रिज तर तृतीय क्रमांक रेश्मा लादे यांना बजाज फॅन बक्षीस देण्यात आले. अशा प्रकारे 23 लकी ड्रॉ काढण्यात आले. तसेच उपस्थित महिलांना गिफ्ट देण्यात आले.

मोलाचे योगदान : जिजाई महिला मंचच्या ज्योती पवार, उषा साळुंखे, रुपाली मुंढेकर, दिपाली मुंढेकर, मेघा कोरडे, पूजा मुंढेकर, सायली मुंढेकर, तेजश्री दुर्गावडे, अश्विनी पवार, सुनीता माने, गीता देशमाने, अश्विनी धनवडे, साधना राजमाने, सुचित्रा सोनावले यांनी परिश्रम घेतले.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

आणखी वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!