‘चढता सुरज धीरे धीरे’ चे होणार सादरीकरण
कराड/प्रतिनिधी : –
मुहंमद रफी म्युझिक अॅकॅडमी, कराडच्या वर्धापन दिनानिमित्त ‘आशिकी ‘ हिट्स या सदाबहार हिंदी गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन रविवार दि. 20 ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे. सायंकाळी 6.30 वाजता यशवंतराव चव्हाण स्मृती सदन (टाऊन हॉल) येथे हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात आशिकी चित्रपटातील सर्व बहारदार गीतांबरोबर नव्वदच्या दशकातील सुपरहीट चित्रपटातील गीते तसेच खास लोकाग्रहास्तव अजीज नाजा यांची अजरामर कव्वाली ‘चढता सुरज धीरे धीरे..’ हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण आहे.
मुहंमद रफी म्युझिक अॅकॅडमीच्या वतीने प्रतिवर्षी हा कार्यक्रम होत असतो. अॅकॅडमीचे प्रमुख महागुरू असिफ बागवान यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम साकारला आहे. कराडकरांसाठी हा कार्यक्रम म्हणजे एक संगीतमय पर्वणीच असते. यावर्षी आशिकी या सुपरहीट चित्रपटांतील गीतांबरोबर मैने प्यार किया, बाजीगर, दिल, प्रेम कैदी, सपने साजन के, रोजा, साजन, हन्ड्रेड डेज, कुछ कुछ होत है..कभी हा कभी ना.. अशा सुपरहीट चित्रपटातील गीते सादर होणार आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.