आरोग्य - Jan Swarashtra https://janswarashtra.com Latest News | Top News | Breaking News Sun, 27 Jul 2025 12:25:31 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8.2 https://janswarashtra.com/wp-content/uploads/2024/08/cropped-Add-a-heading-5-32x32.png आरोग्य - Jan Swarashtra https://janswarashtra.com 32 32 बेलवडे बुद्रुकमध्ये घंटागाडीचे लोकार्पण https://janswarashtra.com/archives/6502 https://janswarashtra.com/archives/6502#respond Sun, 27 Jul 2025 12:25:31 +0000 https://janswarashtra.com/?p=6502 घनकचरा व्यवस्थापनासाठी ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग कराड/प्रतिनिधी : – स्वच्छ भारत अभियानाला साथ देत बेलवडे बुद्रुक (ता. कराड) येथील ग्रामपंचायतीने गावाच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. नुकतेच गावात नव्याने खरेदी करण्यात आलेल्या घंटागाडीचे लोकार्पण सरपंच डॉ. सुशांत मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण : या उपक्रमामुळे गावातील स्वच्छता उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवता येणार ... Read more

The post बेलवडे बुद्रुकमध्ये घंटागाडीचे लोकार्पण first appeared on Jan Swarashtra.

]]>
घनकचरा व्यवस्थापनासाठी ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

कराड/प्रतिनिधी : –

स्वच्छ भारत अभियानाला साथ देत बेलवडे बुद्रुक (ता. कराड) येथील ग्रामपंचायतीने गावाच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. नुकतेच गावात नव्याने खरेदी करण्यात आलेल्या घंटागाडीचे लोकार्पण सरपंच डॉ. सुशांत मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले.

ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण : या उपक्रमामुळे गावातील स्वच्छता उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवता येणार असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

मान्यवरांची उपस्थिती : या लोकार्पण कार्यक्रमात सरपंच डॉ. सुशांत मोहिते, उपसरपंच जयवंत कुंभार, ग्रामपंचायत सदस्य मारुती मोहिते, रुपेश मोहिते, स्वाती मोहिते, माजी सदस्य महेश मोहिते, ज्येष्ठ नागरिक राजाराम मोहिते, नामदेव मोहिते, जगन्नाथ मोहिते, गणेश मोहिते, गोरखा कुंभार, जाफर पटेल, इम्रान मुल्ला, ग्रामसेवक श्री. खांडके, पंचायत समितीच्या पाटील मॅडम, तसेच विविध विभागांचे अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन : “गावाचा सर्वांगीण विकास करताना स्वच्छता ही एक मूलभूत गरज असल्याचे सांगत सरपंच डॉ. सुशांत मोहिते म्हणाले, गावातील कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी ही घंटागाडी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. यामुळे केवळ स्वच्छता नाही, तर आरोग्याच्या दृष्टीनेही सकारात्मक परिणाम दिसून येतील.”

विनामूल्य जमिनी उपलब्ध : या प्रकल्पासाठी गावातील ज्येष्ठ नागरिक राजाराम मोहिते यांनी आपली जमीन विनामूल्य उपलब्ध करून दिली. त्यांच्या या समाजहिताच्या योगदानाचे उपस्थित मान्यवरांनी भरभरून कौतुक केले.

सहकार्य : अशोक लेलँड कंपनीचे व्यवस्थापक योगेश मोहिते यांनी या प्रकल्पासाठी आवश्यक तांत्रिक आणि आर्थिक सहकार्य केल्याबद्दल त्यांचेही आभार मानण्यात आले.

ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण : “घंटागाडीच्या माध्यमातून दररोज घरोघरी जाऊन कचरा संकलन करण्यात येणार असून ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण करून त्याची योग्य विल्हेवाट लावली जाईल.”, असे ग्रामसेवक अण्णासाहेब खांडके यांनी सांगितले.

स्वच्छतेच्या दिशेने भक्कम पाऊल : कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामसेवक श्री. खांडके यांनी, तर उपसरपंच जयवंत कुंभार यांनी आभार मानले. हा उपक्रम ग्रामपंचायतीच्या लोकसहभागातून साकारलेल्या योजनांचे एक यशस्वी उदाहरण असून, गावाने स्वच्छतेच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले आहे.

आवाहन : या प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी ग्रामस्थांनीही सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले.

The post बेलवडे बुद्रुकमध्ये घंटागाडीचे लोकार्पण first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/6502/feed 0
‘विठ्ठल वारी’ https://janswarashtra.com/archives/6249 https://janswarashtra.com/archives/6249#respond Fri, 04 Jul 2025 11:43:39 +0000 https://janswarashtra.com/?p=6249 आषाढ शुध्द एकादशी भूवैकुंठ पंढरपुरास लक्षावधी भाविक एकत्र येतात. चंद्रभागेत स्नान करून पांडुरंगाचे दर्शन घेतले जाते. पांडुरंगाच्या आरतीचा अवर्णनीय सोहळा पाहून भाविकांचे मन प्रसन्न होते. ‘वारी’ हा एक ‘अध्यात्मिक प्रवास’ असून, ही वारीची परंपरा तेराव्या शतकात सुरु झाली. विठ्ठलवारी ही भक्ती आणि शांतीचा प्रवास, मंदिरापर्यंत पोहोचविणारा प्रवास नसून माणसा-माणसामधील श्रध्देचा ‘आंतरिक’ शांती मिळणारा, सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा आहे. संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वरांच्या ... Read more

The post ‘विठ्ठल वारी’ first appeared on Jan Swarashtra.

]]>
आषाढ शुध्द एकादशी भूवैकुंठ पंढरपुरास लक्षावधी भाविक एकत्र येतात. चंद्रभागेत स्नान करून पांडुरंगाचे दर्शन घेतले जाते. पांडुरंगाच्या आरतीचा अवर्णनीय सोहळा पाहून भाविकांचे मन प्रसन्न होते.

‘वारी’ हा एक ‘अध्यात्मिक प्रवास’ असून, ही वारीची परंपरा तेराव्या शतकात सुरु झाली. विठ्ठलवारी ही भक्ती आणि शांतीचा प्रवास, मंदिरापर्यंत पोहोचविणारा प्रवास नसून माणसा-माणसामधील श्रध्देचा ‘आंतरिक’ शांती मिळणारा, सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा आहे. संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वरांच्या पादुका ज्येष्ठामध्ये पंढरपुरात नेल्या जातात. देहू तसेच आळंदीपासून साधारणपणे २५० कि.मी. प्रवास पायी केला जातो. या वर्षी ही वारी अठरा दिवसांची आहे. (अलीकडे वारी हा ट्रॅन्ड झालेला दिसत आहे, पण तरीही एक आध्यात्मिक गोष्ट ट्रेन्ड झालेली चांगलीच, इतर वाईट गोष्टी ट्रेन्डमध्ये असण्यापेक्षा) दरवर्षी जून महिना आला की, मला वेध लागतात ते वारीमध्ये एक दिवसतरी जावून येण्याचे. कारण माझे वडील एक वारकरी संप्रदायातील होते. पेटी, तबला सोबत भजनाच्या आवाजाने घर अगदी भक्तीमय व्हायचे. त्यांची सेवानिवृत्ती झाल्यावर वारीमध्ये जाण्याची त्यांची इच्छा अपूर्ण राहिली. यावर्षी ठरविले की, आईला घेवून जायचेच आणि आम्ही दोघे आईला फलटणला वारीच्या भेटीला घेवून गेलो.

यावर्षी कराड अर्बन बँकेचे कुटुंबप्रमुख मा. सुभाषराव जोशी, चेअरमन मा. डॉ. सुभाषराव एरम तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव (पती) या सर्वांनी वारकऱ्यांसाठी काही भेटवस्तू देण्याचे ठरविले. त्यामध्ये बिस्कीट पुडे, अॅक्वागार्ड पाण्याच्या बाटल्या तसेच २५००० हरिपाठाची पुस्तके देण्याचे नियोजन केले. पालखी मार्गावर असणाऱ्या बँकेच्या शाखा वारकऱ्यांच्या कृपाशीर्वादाने उत्तम चालतात म्हणूनच हरीपाठाची पुस्तके देण्याचा मानस केला. भगवद्‌गीता महान ग्रंथाचे सोप्या शब्दात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि त्यांनीच त्यातील मध्यवर्ती ज्ञान देणारे देवाचे स्मरण करण्यासाठी हरीचे स्मरण करणारा ‘हरिपाठ’ लिहिला. असा हरिपाठ वेगळ्या ढंगात ज्यामध्ये संतांची मांदियाळी, संत महात्म्य थोडक्यात छापले, पसायदान आणि हरिपाठ अशी अद्वितीय निर्मिती वारकऱ्यांच्या हाती वारीच्या निमित्ताने सुपूर्त करण्यात आली.

आता वरील सर्व साहित्य, कराड अर्बन बँकेच्या समोर आम्ही दोघे, आई, फलटण शाखेचा सेवक, संदीप दादा आणि त्यांची पत्नी कविता हे साहित्य देण्यासाठी थांबलो. आम्ही फक्त माध्यम म्हणून होतो. आम्ही वारकऱ्यांची सेवा केली याचा अर्थ ही सेवा विठूमाऊलींच्या चरणी अर्पण आहे. यादरम्यान छोटे आणि वेगळे अनुभव मला आले. कोणाची पोटाची भूक मोठी होती, तर कोणाची भक्तीची मोठी होती, तर कोणाची भावनांची भूक मोठी होती. खूप वारकरी माऊली आले. त्यामधील एक माऊली म्हणाल्या, अजून एक बिस्कीट पुडा पाहिजे. तो दिला, आणखी एक मागितला, तोही दिला. मी कविताला म्हटले, खूप दे त्यांना. दिल्यानंतरही त्या परत आणखी आल्या, तेव्हा मात्र सेवकाने तो देण्यास नकार दिला. पण मी अजूनही त्यांना द्यायला सांगितले. कारण एका नऊवारीतील, गळ्यात एक काळा दोरा घातलेली माऊली स्वतःची फक्त भूक भागवित नसणार, तर इतरांना देत असणार किंवा जास्तीत जास्त पुढील दोन दिवसांची साठवणूक करीत असणार. अजून काय? काही माऊलींना आमच्या साहेबांनी हरिपाठ पुस्तकावर काय लिहिले आहे ते विचारले. त्यांना वाचता आले नाही म्हणून त्या माऊलींना वाटले एवढे चांगले देवाधर्माचं पुस्तक मिळणार नाही, म्हणून त्या म्हणाल्या आमची नातवंडं वाचत्याल. काही माऊली पुस्तकं वाचत पुढे निघाले आणि परत आले पुस्तक एवढं चांगलं आहे आम्हांला अजून दोन-चार पाहिजेत. कारण या छोट्या पुस्तकात संतांची माहिती, पसायदान आणि हरीपाठ हे सर्वच आहे. काही माऊली परभणी पासून आले, म्हणाले आम्हांला बिस्कीटपाणी काही नको, ज्या हरिपाठासाठी आम्ही आलो तो येथे मिळाला. आम्ही धन्य झालो आणि त्यांनी हे पुस्तक आपल्या माथी लावलं. काही लहान मुलेही मला भेटली. शाळा बुडवून तुम्ही वारीत आलात का? असे मी विचारले. कारण शिक्षणाची वारी ही पहिली वारी पूर्ण करायला पाहिजे. खूप असे वारकरी नव्वदटक्के असे आढळतात संत तुकारामांनी लिहिलेल्या अभंगाप्रमाणे –

|| ‘ठेविले अनंते तैसेचि राहावे चित्ती असूद्यावे समाधान’ ||

त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य, तृप्ततेचा भाव, भक्ती भाव कारण “Smile is a spiritual perfume, you spray on others.”

एक अंध वारकऱ्यास साहेब म्हणाले, हा हरीपाठ ब्रेल लिपीमध्ये नाही. कसा वाचणार? त्याने सांगीतले, मी घेईन वाचून कोणाकडून तरी, शब्दतरी कानावर पडतील. म्हणून संत ज्ञानेश्वरांच्या मते ‘माझ्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, परिस्थिती यावर माझे नियंत्रण नसते.’ मात्र यावेळी सकारात्मक विचार अन् योग्य वर्तन नक्कीच माझ्या हाती आहे.

असाच सकारात्मक विचार या वारकऱ्यांमध्ये मला दिसला. सर्वांना आवडलेला अनुभव म्हणजे विठ्ठल ज्यांच्या घरी आहे, असे पंढरपुरचे वारकरी आम्हांला भेटले. त्यांनी हा हरिपाठ खूपच आवडल्याचे सांगितले. पंढरपुरावरून इकडे येण्याचे मी कारण विचारले, कारण त्यांना आळंदीपासून पायी वारी करावयाची होती.

|| ‘देव देवाऱ्यात नाही, देव नाही देवालयी देव चोरून नेईल अशी कोणाची पुण्याई’ ||

असा पंढरपुरच्या मंदिरातील वारकरी माणसातील देव अनुभवावयास आला आहे. प्रवास कोणताही असो जीवनाचा किंवा वारीचा कोठे पोहोचणार किंवा मार्ग महत्वाचा नाही तर, कोणते लोक आपल्या सोबत आहेत हे महत्वाचे असते. कारण या वारीत प्रत्येक वारकरी एकमेकांना माऊली संबोधत असतात. एकमेकांना नमस्कार, भजन, कीर्तन, हरिपाठ यामध्ये तल्लीन होतात. म्हणूनच संत तुकाराम सांगतात ‘देव पाहावयास गेलो, देव होवूनी आलो’, कारण देव मानवाच्या अंतरंगात आहे. सीए. असल्यामुळे मी यांना नेहमी म्हणते की, मंदिरांवर खूप खर्च होतो, पण शाळांवर एवढा होत नाही. त्यावर त्यांचे उत्तर असते, मंदिरामुळे करोडो लोकांचा पोटापाण्याचा प्रश्न मिटतो, कोटींची उलाढाल होते. यामुळे कोणत्याही मंदिरात दान करताना आपण विचार करत नाही. त्याच देवस्थानांकडून हॉस्पीटलला मदत केली जाते आणि शेकडो अन्नछत्रही चालवले जातात. अशा प्रकारे अर्थकारण असते आणि मंदिर आणि शाळा हे दानधर्मासाठी अती उच्च अशी ठिकाणे आहेत.

शेवटी एवढेच,

|| ‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा.’ ||

राम कृष्ण हरी .. राम कृष्ण हरी ..

– सौ. जयश्री दिलीप गुरव (उपाध्यक्षा, कै. द.शि. एरम मूकबधिर विद्यालय व उपाध्यक्षा कराड अर्बन बझार, कराड) 

The post ‘विठ्ठल वारी’ first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/6249/feed 0
विठुरायाच्या दारी आदर्शच्या चिमुकल्यांची भक्तीमय वारी https://janswarashtra.com/archives/6245 https://janswarashtra.com/archives/6245#respond Fri, 04 Jul 2025 11:40:22 +0000 https://janswarashtra.com/?p=6245 आगाशिवनगर येथे आदर्श शाळेचा दिंडी सोहळा उत्साहात कराड/प्रतिनिधी : – श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या आदर्श शिशुविहार व आदर्श प्राथमिक विद्यालय,  आगाशिवनगर यांच्यावतीने पारंपरिक दिंडी सोहळ्याचे आयोजन मोठ्या भक्तिभावात व उत्साहात करण्यात आले. पालकांच्या हस्ते विठ्ठल-माऊलीच्या प्रतिमेची पूजा : शुक्रवार, दि. ४ रोजी विद्यालयाच्या प्रांगणातून श्री दत्त मंदिर, आगाशिवनगरपर्यंत दिंडी काढण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात पालकांच्या हस्ते विठ्ठल-माऊलीच्या ... Read more

The post विठुरायाच्या दारी आदर्शच्या चिमुकल्यांची भक्तीमय वारी first appeared on Jan Swarashtra.

]]>
आगाशिवनगर येथे आदर्श शाळेचा दिंडी सोहळा उत्साहात

कराड/प्रतिनिधी : –

श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या आदर्श शिशुविहार व आदर्श प्राथमिक विद्यालय,  आगाशिवनगर यांच्यावतीने पारंपरिक दिंडी सोहळ्याचे आयोजन मोठ्या भक्तिभावात व उत्साहात करण्यात आले.

पालकांच्या हस्ते विठ्ठल-माऊलीच्या प्रतिमेची पूजा : शुक्रवार, दि. ४ रोजी विद्यालयाच्या प्रांगणातून श्री दत्त मंदिर, आगाशिवनगरपर्यंत दिंडी काढण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात पालकांच्या हस्ते विठ्ठल-माऊलीच्या प्रतिमेची पूजा व श्रीफळ वाढवून झाली. “विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल” च्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने न्हालून निघाला होता.

चिमुकल्याचा विठुरायाच्या चरणी भक्तिभाव : चिमुकल्या वारकऱ्यांनी टाळ, मृदुंगाच्या गजरात सहभाग घेत विठुरायाच्या चरणी भक्तिभाव व्यक्त केला. पावसाची तमा न बाळगता विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग उल्लेखनीय होता.

“माऊली माऊली” गीतावर नृत्याविष्कार : विविध संतांचे पोशाख, अभंग, ओव्या, भजन सादर करत विद्यार्थ्यांनी संत परंपरेचे दर्शन घडवले. “माऊली माऊली” या गीतावर रंगवलेला नृत्याविष्कार प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून गेला.

उद्देश : या उपक्रमाविषयी माहिती देताना शाळेचे मुख्याध्यापक सचिन शिंदे म्हणाले, “विद्यार्थ्यांना सण-उत्सव, परंपरा, संस्कृती यांची ओळख व्हावी, सामाजिक ऐक्य वाढावे व राष्ट्रीय मूल्यांची रुजवणूक व्हावी, यासाठी शाळेमार्फत असे उपक्रम राबवले जातात.”

शिक्षक, कर्मचाऱ्यांचे मेहनत : कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. प्राजक्ता पाटील, सौ. सायराबानू नदाफ यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना गोड शिरा देण्यात आला.

उपक्रमाचे कौतुक : या उपक्रमाचे संस्थेचे सचिव शेतीमित्र मा. अशोकराव थोरात, अध्यक्ष पांडूरंग पाटील, उपाध्यक्ष भास्करराव पाटील, खजिनदार तुळशीराम शिर्के, संचालक वसंतराव चव्हाण, सौ. स्वाती थोरात, संजय थोरात यांनी विशेष कौतुक केले.

The post विठुरायाच्या दारी आदर्शच्या चिमुकल्यांची भक्तीमय वारी first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/6245/feed 0
सह्याद्रि हॉस्पिटल, कराड येथे शॉर्टसर्किटमुळे किरकोळ आग https://janswarashtra.com/archives/6240 https://janswarashtra.com/archives/6240#respond Thu, 03 Jul 2025 08:24:05 +0000 https://janswarashtra.com/?p=6240 कोणतीही जीवितहानी नाही; हॉस्पिटल प्रशासनाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली माहिती कराड/प्रतिनिधी : – सह्याद्रि हॉस्पिटल, कराड येथील एका बंदिस्त विभागात बुधवार (दि. २) जुलै रोजी संध्याकाळच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे किरकोळ आग लागल्याची घटना घडली. ही आग हॉस्पिटलच्या दक्ष कर्मचाऱ्यांनी तत्काळ आपत्कालीन यंत्रणा राबवत नियंत्रणात आणली असून सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. ... Read more

The post सह्याद्रि हॉस्पिटल, कराड येथे शॉर्टसर्किटमुळे किरकोळ आग first appeared on Jan Swarashtra.

]]>
कोणतीही जीवितहानी नाही; हॉस्पिटल प्रशासनाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली माहिती

कराड/प्रतिनिधी : –

सह्याद्रि हॉस्पिटल, कराड येथील एका बंदिस्त विभागात बुधवार (दि. २) जुलै रोजी संध्याकाळच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे किरकोळ आग लागल्याची घटना घडली. ही आग हॉस्पिटलच्या दक्ष कर्मचाऱ्यांनी तत्काळ आपत्कालीन यंत्रणा राबवत नियंत्रणात आणली असून सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

तातडीने अग्निशमन उपकरणांचा वापर : बुधवारी संध्याकाळी अचानक झालेल्या शॉर्टसर्किटमुळे एका विभागात आगीचे लहानसे लोळ उठले. प्रसंगावधान राखत कर्मचाऱ्यांनी तातडीने अग्निशमन उपकरणांचा वापर करत आग विझवण्यास सुरुवात केली.

१५ मिनिटांत आग नियंत्रणात : केवळ १५ मिनिटांत आग पूर्णतः नियंत्रणात आणण्यात आली. यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन संपूर्ण विभागाची तपासणी केली. या तपासणीत आग पूर्णपणे विझवली गेली असून आत कुठेही उर्वरित धोका नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

सूचनांचे शिस्तबद्धपणे पालन : घटनेच्या वेळी हॉस्पिटल प्रशासनाने तत्काळ आपत्कालीन सूचना जाहीर करत लिफ्टचा वापर टाळण्याचे निर्देश सर्व रुग्ण, नातेवाईक व कर्मचाऱ्यांना दिले होते. ही सूचना शिस्तबद्धपणे पाळण्यात आली. संपूर्ण इमारतीतून रुग्ण व उपस्थित व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.

सर्व सेवा पूर्ववत सुरू : या घटनेमुळे काही काळ हॉस्पिटलचे नियमित कामकाज थांबवण्यात आले होते. मात्र, आता सर्व सेवा पूर्ववत सुरू करण्यात आल्या आहेत. हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या रुग्णांची स्थिती पूर्णपणे स्थिर असून उपचार सुरळीतपणे सुरू आहेत.

अफवांवर विश्वास ठेवू नका : “या काळात रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांनी दाखवलेले संयम व सहकार्य आमच्यासाठी खूप महत्त्वाचे ठरले. आम्ही त्याबद्दल मनापासून आभार मानतो. कृपया कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका किंवा त्या पसरवू नका.

रुग्णांची सुरक्षितता आणि काळजी सर्वोच्च प्राधान्य : रुग्णांची सुरक्षितता आणि काळजी हेच आमचं सर्वोच्च प्राधान्य आहे.” या घटनेमुळे हॉस्पिटलमध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे आणि योग्य मार्गदर्शनामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला.

पोलीस आणि अग्निशमनकडून पुढील तपास : घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन विभागाचे अधिकारी देखील उपस्थित राहून पुढील तपास करत असल्याचे या पत्रकात म्हटले आहे.

The post सह्याद्रि हॉस्पिटल, कराड येथे शॉर्टसर्किटमुळे किरकोळ आग first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/6240/feed 0
ड्रेनेज ओव्हरफ्लोमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका https://janswarashtra.com/archives/6207 https://janswarashtra.com/archives/6207#respond Mon, 30 Jun 2025 10:20:59 +0000 https://janswarashtra.com/?p=6207 अशोक चौकातील प्रकार; आठवडाभरात उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा कराड/प्रतिनिधी : – शहरातील शनिवार पेठ, अशोक चौक परिसरातील नागरिक गेल्या अनेक महिन्यांपासून ड्रेनेज ओव्हरफ्लोच्या समस्येला कंटाळले असून आता त्यांचा संयम सुटू लागला आहे. वारंवार घाण पाणी रस्त्यांवर आणि घरांमध्ये शिरत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. नगरपालिकेकडून तात्पुरते उपाय करून ही समस्या वर्षभरापासून ... Read more

The post ड्रेनेज ओव्हरफ्लोमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका first appeared on Jan Swarashtra.

]]>
अशोक चौकातील प्रकार; आठवडाभरात उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

कराड/प्रतिनिधी : –

शहरातील शनिवार पेठ, अशोक चौक परिसरातील नागरिक गेल्या अनेक महिन्यांपासून ड्रेनेज ओव्हरफ्लोच्या समस्येला कंटाळले असून आता त्यांचा संयम सुटू लागला आहे. वारंवार घाण पाणी रस्त्यांवर आणि घरांमध्ये शिरत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. नगरपालिकेकडून तात्पुरते उपाय करून ही समस्या वर्षभरापासून दुर्लक्षित केली जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

निवेदन : या संदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) वाहतूक आघाडीचे कराड तालुकाध्यक्ष नागेश कुर्ले यांच्या नेतृत्वाखाली कराड नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना सोमवार (दि. ३०) रोजी सदर प्रश्नी लेखी निवेदन देण्यात आले आहे.

सांडपाणी थेट घरांमध्ये : बुरुड गल्ली ते अशोक चौक आणि पटेल बिल्डिंगपर्यंतच्या भागात ड्रेनेज लाईन सतत ओव्हरफ्लो होत आहे. या भागात बैठी घरे अधिक असल्यामुळे सांडपाणी थेट घरांमध्ये शिरते. परिणामी घरातील वयोवृद्ध, महिला आणि लहान मुले यांचे आजाराचे प्रमाण वाढले आहे.

…तर, पालिकेविरोधात तीव्र आंदोलन : “प्रशासन वेळोवेळी तात्पुरते उपाय करत आहे, पण मूळ समस्या कायमची सोडवली जात नाही. गेल्या वर्षभरात अनेक वेळा हा प्रश्न उग्र स्वरूपात समोर आला आहे. यांमुळे नागरिक आता पुरते हैराण झाले आहे. आता जर आठवडाभरात या प्रश्नावर कायमस्वरूपी ठोस उपाययोजना झाली नाही तर, कराड नगरपालिकेविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा स्पष्ट इशाराही नागरिकांनी या निवेदनाद्वारे दिला आहे.

आमदार व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाची प्रत सादर : या निवेदनाची प्रत माहितीसाठी आमदार अतुलबाबा भोसले आणि जिल्हाधिकारी, सातारा यांना देण्यात आली आहे.

पालिकेचे अद्याप प्रतिक्रिया नाही : या गंभीर तक्रारीनंतर पालिकेने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, नागरिकांमध्ये वाढत चाललेला असंतोष लक्षात घेता, प्रशासनाने वेळीच पावले उचलणे गरजेचे ठरणार आहे.

निवेदनावरील नावे व सह्या : या निवेदनावर रिपाइ (आठवले गट) वाहतूक आघाडीचे कराड तालुकाध्यक्ष नागेश कुर्ले यांच्यासह जुनेद इनामदार, महेश पाडळकर, निसार मुल्ला, स्वप्नील काटवटे, गणेश शिंदे, जुनेद शिकलगार, नितीन शहा, मंगेश महाडिक, राजेंद्र पवार आदींची नावे व सह्या आहेत.

The post ड्रेनेज ओव्हरफ्लोमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/6207/feed 0
देवदास मुळे यांना शासनाचा स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार https://janswarashtra.com/archives/6159 https://janswarashtra.com/archives/6159#respond Tue, 24 Jun 2025 15:45:20 +0000 https://janswarashtra.com/?p=6159 कराड/प्रतिनिधी : –  महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागातर्फे उत्कृष्ट पत्रकारितेसाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा मंगळवारी झाली यात 2021 सालचा राज्यस्तर स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार दैनिक तरुण भारत संवादचे कराड कार्यालय प्रमुख देवदास प्रल्हाद मुळे यांना जाहीर झाला आहे. पुरस्काराचे स्वरूप : रोख 51 हजार रुपये, प्रशस्तीपत्र व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. स्वच्छ महाराष्ट्र ... Read more

The post देवदास मुळे यांना शासनाचा स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार first appeared on Jan Swarashtra.

]]>
कराड/प्रतिनिधी : – 

महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागातर्फे उत्कृष्ट पत्रकारितेसाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा मंगळवारी झाली यात 2021 सालचा राज्यस्तर स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार दैनिक तरुण भारत संवादचे कराड कार्यालय प्रमुख देवदास प्रल्हाद मुळे यांना जाहीर झाला आहे.

पुरस्काराचे स्वरूप : रोख 51 हजार रुपये, प्रशस्तीपत्र व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार हा राज्यस्तरीय आहे. या पुरस्कारासाठी मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू या भाषेतून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींचे एका वर्षातील लिखाणाचे प्रस्ताव मागवण्यात येतात. या प्रस्तावांमधून एका प्रस्तावाची निवड करण्यात येते.

कोरोना काळातील स्वच्छताविषयक लिखाणाची दखल : २०२१ या वर्षात कोरोना महामारीचे संकट होते. त्यावेळी स्वच्छता मोहिमेसही महत्व होते. त्या वर्षात स्वच्छता विषयक केलेल्या लिखाणाची दखल या पुरस्काराच्या माध्यमातून घेण्यात आली आहे.

जनजागृती करण्यासाठी योगदान : देवदास मुळे यांनी २०१८ सालापासून कराड नगरपरिषदेच्या स्वच्छ सर्वेक्षणातील उपक्रमांना प्रसिद्धी देऊन कराडकर नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी योगदान दिले आहे. कराड नगरपालिकेच्या अभ्यास दौऱ्यातून देशातील प्रथम क्रमांकाचे स्वच्छ शहर इंदूर (मध्य प्रदेश), अंबिकापूर (छत्तीसगड) लोणावळा आदी शहरांना भेटी देऊन त्याविषयी लिखाण केले आहे. कराड नगरपालिकेच्या स्वच्छता विषयक उपक्रमांच्या यशस्वीतेसाठी पालिका प्रशासनाला मदत केली आहे.

मार्गदर्शन : कराड नगरपालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी यशवंत डांगे, रमाकांत डाके, तत्कालीन आरोग्य समिती सभापती विजय वाटेगावकर, तत्कालीन नगर अभियंता एम. एच. पाटील, ए. आर. पवार, रफिक भालदार यांचे मार्गदर्शन लाभले.

सहकार्य : तरुण भारतचे सातारा आवृत्ती प्रमूख दीपक प्रभावळकर, जाहिरात विभाग प्रमुख संजय जाधव, डेस्क इन्चार्ज राजेंद्र वारागडे, सुरेश दळवी, सागर कोठावळे, उपसंपादक प्रदीप कुंभार, मिलिंद पवार, ज्येष्ठ पत्रकार प्रा. अशोक चव्हाण, गोरख तावरे, शशिकांत पाटील, सतीश मोरे, सचिन शिंदे, प्रमोद सुकरे, सचिन देशमुख, हेमंत पवार, सुरेश डुबल यांचेही सहकार्य लाभले.

The post देवदास मुळे यांना शासनाचा स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/6159/feed 0
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योग आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवला https://janswarashtra.com/archives/6138 https://janswarashtra.com/archives/6138#respond Sat, 21 Jun 2025 16:54:31 +0000 https://janswarashtra.com/?p=6138 आमदार मनोज घोरपडे; उंब्रज येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा कराड/प्रतिनिधी : – भारतातील योग पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण जगभर पोहवचला. योगामुळे निरोगी आयुष्य जगता येते. अनेक आजारांवर मात करता येते. त्यामुळे भारतीयांबरोबरच संपूर्ण जगाचे आरोग्य चांगले राहवे, या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण जगात योग दिन साजरा होत आहे. चांगल्या आरोग्यासाठी सर्वानी नियमित ... Read more

The post पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योग आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवला first appeared on Jan Swarashtra.

]]>

आमदार मनोज घोरपडे; उंब्रज येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

कराड/प्रतिनिधी : –

भारतातील योग पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण जगभर पोहवचला. योगामुळे निरोगी आयुष्य जगता येते. अनेक आजारांवर मात करता येते. त्यामुळे भारतीयांबरोबरच संपूर्ण जगाचे आरोग्य चांगले राहवे, या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण जगात योग दिन साजरा होत आहे. चांगल्या आरोग्यासाठी सर्वानी नियमित योगसने करावीत, असे प्रतिपादन आमदार मनोज घोरपडे यांनी केले.

विद्यार्थ्यांसमवेत योग साधना : आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून उंब्रज (ता. कराड) येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालयात आमदार मनोजदादा घोरपडे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांसमवेत योग दिन साजरा केला. सुमारे तासभर योगासनांची प्रात्यक्षिकात सहभाग घेतला. याप्रसंगी आमदार मनोज घोरपडे यांनी योग दिनाचे महत्त्व सांगितले.

योग प्रात्यक्षिक : योग गुरु चंद्रशेखर सरकाळे, डी.आर. बर्गे, कुमारी भोसले यांनी योग प्रात्यक्षिक, योगप्रकार, त्याचे महत्त्व याविषयी माहिती सांगितली. यावेळी जयवंत जाधव, योगिराज सरकाळे, विनायक जाधव, ग्रामपंचायत सदस्य विजय जाधव, दिगंबर भिसे, संदीप घाडगे, प्रवीण नलवडे, तसेच शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

शरीर आणि मनाच्या संतुलनासाठी योग महत्त्वाचा : शरीर आणि मनाच्या संतुलनासाठी योग अंत्यत महत्त्वाचा असल्याचे सांगत आमदार मनोज घोरपडे म्हणाले, विद्यार्थी दशेपासून जीवनात योग आणल्यास सर्वांगीण स्वास्थ्य विकसित होईल. पुर्वी योग दिन फक्त भारतात साजरा केला जात होता. परंतु, आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून योगदिन आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा होवू लागला असून जगाला योगाचे महत्त्व समजू लागले आहे.

The post पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योग आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवला first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/6138/feed 0
रक्तदान केवळ श्रेष्ठ दान नसून जीवनदान https://janswarashtra.com/archives/6043 https://janswarashtra.com/archives/6043#respond Fri, 13 Jun 2025 14:35:42 +0000 https://janswarashtra.com/?p=6043 डाक अधीक्षिका स्वाती दळवी; कराड डाक विभागात रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद कराड/प्रतिनिधी : –  “रक्तदान हे केवळ श्रेष्ठ दान नसून ते जीवनदान आहे. आजच्या काळात रक्ताची गरज ही केवळ अपघातग्रस्तांसाठी नव्हे; तर अनेक गंभीर आजारांसाठीही महत्त्वाची आहे. त्यामुळे प्रत्येकाने या कार्यात सहभागी होणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन कराड विभागाच्या डाक अधीक्षिका स्वाती दळवी यांनी केले. ... Read more

The post रक्तदान केवळ श्रेष्ठ दान नसून जीवनदान first appeared on Jan Swarashtra.

]]>
डाक अधीक्षिका स्वाती दळवी; कराड डाक विभागात रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

कराड/प्रतिनिधी : – 

“रक्तदान हे केवळ श्रेष्ठ दान नसून ते जीवनदान आहे. आजच्या काळात रक्ताची गरज ही केवळ अपघातग्रस्तांसाठी नव्हे; तर अनेक गंभीर आजारांसाठीही महत्त्वाची आहे. त्यामुळे प्रत्येकाने या कार्यात सहभागी होणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन कराड विभागाच्या डाक अधीक्षिका स्वाती दळवी यांनी केले.

जागतिक रक्तदाता दिनानिमित्त रक्तदान शिबिर : १४ जून या जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधून भारत सरकारच्या डाक विभागामार्फत कराड प्रधान डाकघर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

प्रेरणादायी उदाहरण : या शिबिराचे उद्घाटन डाक अधीक्षिका स्वाती दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. विशेष म्हणजे अधीक्षिका स्वाती दळवी यांनी स्वतः रक्तदान करून उपस्थितांसमोर एक प्रेरणादायी उदाहरण ठेवले.

मान्यवरांची उपस्थिती : शिबिराच्या आयोजनावेळी डाक अधिकारी अमृत कुमटकर, अमित देशमुख, पोस्टमास्तर रामलिंग राजमाने, तसेच वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. राजवर्धन पाटील, सुनिता कुंभार, कुमुदिनी दळवी, नागनाथ केंद्रे, मंगेश पाटोळे आदी मान्यवर उपस्थित होते.

अधिकारी-कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद : रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाच्या सहकार्याने रक्त संकलनाचे नियोजन सुरळीतपणे पार पाडण्यात आले. या उपक्रमास डाक विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

रक्तदानाचे कर्तव्य निभावले : चंद्रकांत पवार, महेश लोहारे, सखाराम देवकाते, जी. के. पाटील, शंकर सुतार, श्रीराम शिंदे, सतीश आलमवाड, उमेश मोहिते, नितीन पाटील, अभिजीत जाधव, पांडुरंग निळे, शाहीर सानप यांसह कराड विभागातील अनेक डाक कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. त्यांच्या या सहभागामुळे रक्तदान शिबिर अधिक यशस्वी झाले असून या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

सामाजिक आणि वैद्यकीय महत्त्व अधोरेखित : कार्यक्रमात डॉ. यशवर्धन पाटील, डाक अधिकारी अमित देशमुख आणि उमेश मोहिते यांनी आपले मनोगत व्यक्त करत रक्तदानाचे सामाजिक आणि वैद्यकीय महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परमेश्वर केंद्रे यांनी केले.

रक्तदात्यांचा प्रमाणपत्राने सन्मान : या उपक्रमानिमित्ताने रक्तदात्यांना वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड यांच्यावतीने प्रमाणपत्र वितरित करून सन्मानित करण्यात आले. या उपक्रमामुळे कराड डाक विभागाने सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले आहे.

The post रक्तदान केवळ श्रेष्ठ दान नसून जीवनदान first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/6043/feed 0
कृष्णा विश्व विद्यापीठातर्फे तातडीक वैद्यकीय सेवांची प्रात्यक्षिके https://janswarashtra.com/archives/6029 https://janswarashtra.com/archives/6029#respond Fri, 13 Jun 2025 03:09:39 +0000 https://janswarashtra.com/?p=6029 जागतिक तातडीक वैद्यकीय दिनाचे औचित्य; आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ उपचार करण्याबाबतची दिली माहिती कराड/प्रतिनिधी : – जागतिक तातडीक वैद्यकीय दिनाचे औचित्य साधून येथील कृष्णा विश्व विद्यापीठ आणि कृष्णा हॉस्पिटलच्यावतीने कराड तालुक्यात ठिकठिकाणी तातडीक वैद्यकीय सेवांची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. यावेळी आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तत्काळ उपचार कसे करावेत, याबाबतची माहिती उपस्थितांना देण्यात आली. जागतिक तातडीक वैद्यकीय दिनानिमित्त आयोजन ... Read more

The post कृष्णा विश्व विद्यापीठातर्फे तातडीक वैद्यकीय सेवांची प्रात्यक्षिके first appeared on Jan Swarashtra.

]]>
जागतिक तातडीक वैद्यकीय दिनाचे औचित्य; आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ उपचार करण्याबाबतची दिली माहिती

कराड/प्रतिनिधी : –

जागतिक तातडीक वैद्यकीय दिनाचे औचित्य साधून येथील कृष्णा विश्व विद्यापीठ आणि कृष्णा हॉस्पिटलच्यावतीने कराड तालुक्यात ठिकठिकाणी तातडीक वैद्यकीय सेवांची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. यावेळी आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तत्काळ उपचार कसे करावेत, याबाबतची माहिती उपस्थितांना देण्यात आली.

जागतिक तातडीक वैद्यकीय दिनानिमित्त आयोजन : कृष्णा विश्व विद्यापीठातील तातडीक वैद्यकीय विभागाच्यावतीने जागतिक तातडीक वैद्यकीय दिनानिमित्त रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना, कराड शहर पोलिस स्टेशन आणि मध्यवर्ती बसस्थानक परिसरात तातडीक वैद्यकीय सेवांची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली.

जागृती : यावेळी नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ उपचार कसे करावेत, याबाबत जागृती करण्यात आली. तसेच गंभीर जखमी रुग्णांवरील प्रथमोपचार, हृदयविकाराचा झटका, सर्पदंश, लकवा, गुदमरणे, श्वसननलिकेत अडथळा आणि हृदयक्रिया थांबल्यास दिले जाणारे सी.पी.आर. अशा विविध आपत्कालीन स्थितींची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. ही प्रात्यक्षिके पाहण्यासाठी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

मान्यवरांची उपस्थिती : कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमात विभागप्रमुख डॉ. शंतनु कुलकर्णी, डॉ. रवींद्र पाटील, डॉ. मारिओ, डॉ. राहुल, डॉ. दीपक, डॉ. यश, डॉ. पार्वती, तसेच नर्सिंग स्टाफ आकाश तवटे, देवदास फाळके, अजित पवार, मारुती पवार, सचिन बांबुरे, राजशेखर बन्नूर, प्राजक्ता चोपडे, सुमन जाधव व पुनम झुंजार आदींचा सहभाग होता.

The post कृष्णा विश्व विद्यापीठातर्फे तातडीक वैद्यकीय सेवांची प्रात्यक्षिके first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/6029/feed 0
आगाशिव डोंगराच्या पायथ्याशी विविध देशी झाडांची लागवड https://janswarashtra.com/archives/6013 https://janswarashtra.com/archives/6013#respond Mon, 09 Jun 2025 10:00:12 +0000 https://janswarashtra.com/?p=6013 निसर्ग ग्रुप, कराडचा वृक्षसंवर्धनाचा संकल्प; वृक्षारोपणाच्या स्तुत्य उपक्रमाचे पर्यावरणप्रेमींकडून कौतुक कराड/प्रतिनिधी : – जखिणवाडी-मलकापूर (ता. कराड) परिसरातील आगाशिव डोंगराच्या पायथ्याशी वनविभागाच्या वतीने पक्षीतीर्थ स्थापन करण्यात आले असून, याच परिसरात रविवारी ‘निसर्ग ग्रुप, कराड’ तर्फे विविध देशी वृक्षप्रजातींच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. देशी व बहुउपयुक्त झाडांचे रोपण : वृक्षारोपण उपक्रमाअंतर्गत ... Read more

The post आगाशिव डोंगराच्या पायथ्याशी विविध देशी झाडांची लागवड first appeared on Jan Swarashtra.

]]>
निसर्ग ग्रुप, कराडचा वृक्षसंवर्धनाचा संकल्प; वृक्षारोपणाच्या स्तुत्य उपक्रमाचे पर्यावरणप्रेमींकडून कौतुक

कराड/प्रतिनिधी : –

जखिणवाडी-मलकापूर (ता. कराड) परिसरातील आगाशिव डोंगराच्या पायथ्याशी वनविभागाच्या वतीने पक्षीतीर्थ स्थापन करण्यात आले असून, याच परिसरात रविवारी ‘निसर्ग ग्रुप, कराड’ तर्फे विविध देशी वृक्षप्रजातींच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

देशी व बहुउपयुक्त झाडांचे रोपण : वृक्षारोपण उपक्रमाअंतर्गत उंबर, करंज, फणस, पिंपळ आणि चिंच या देशी व बहुउपयुक्त झाडांचे रोपण करण्यात आले. निसर्ग ग्रुपकडून याआधी लावण्यात आलेल्या झाडांच्या संगोपनासाठी आळी करून त्यांना अधिक पाणी मिळण्याची योग्य व्यवस्था करण्यात आली.

मातीतील सेंद्रिय घटक वाढवण्याचा प्रयत्न : यावेळी सर्व झाडांना जीवामृत मिश्रित पाणी टाकण्यात आले. जेणेकरून झाडांची वाढ सशक्त होईल व मातीतील सेंद्रिय घटक वाढून पर्यावरणाचा समतोल राखला जाईल, या उद्देशाने झाडांसाठी जीवामृत मिश्रित पाण्याचा वापर करण्यात आला.

पक्षीतीर्थात स्वच्छ पाणीसाठा : सध्या आगाशिव डोंगर परिसरात समाधानकारक पाऊस झाल्याने संपूर्ण परिसरात हिरवळ पसरली आहे. वनविभागाने तयार केलेल्या पक्षीतीर्थात आता स्वच्छ पाणीसाठा तयार झाला असून, या नैसर्गिक वारशाचा लाभ स्थानिक जैवविविधतेला होतो आहे. परिसरात पर्यावरणपूरक बदल : निसर्ग ग्रुपकडून यापूर्वी लावण्यात आलेल्या झाडांची वाढही समाधानकारक असून परिसरात पर्यावरणपूरक बदल दिसून येत आहेत. याबद्धल सर्व उपस्थित निसर्गसेवकांनी समाधान व्यक्त केले.

यावर्षीचा निर्धार : या उपक्रमानिमित्त निसर्ग ग्रुपच्या सदस्यांनी २०२५ या वर्षात आणखी किमान ५० झाडे लावण्याचा निर्धार केला. आतापर्यंत या संकल्पात चाफा, उंबर, बहावा, काटेसावर, पिंपळ, आवळा, बेल, करंज, फणस, चिंच आदी प्रजातींच्या झाडांचे एकूण १७ रोपे लावण्यात आली असून, पुढील काळात उपलब्ध असलेल्या इतर स्थानिक प्रजातींचेही वृक्षारोपण करण्यात येणार आहे.

निसर्गसेवकांचा सहभाग : या हरित उपक्रमात सौ. शशिकला शिर्के, विक्रम झरेकर, सुरेश शिर्के, विजय वाडेकर, संग्राम कुंभार, मनोहर पवार, योगेश पाटील, दिपक रायबागी आदी निसर्ग सेवकांनी सहभाग घेतला.

निसर्गाच्या सान्निध्यात अल्पोपहाराचा आनंद : वृक्षारोपणानंतर सर्व सदस्यांनी निसर्गाच्या सान्निध्यात एकत्रितपणे अल्पोपहाराचा आनंद घेत परस्परांमध्ये पर्यावरणविषयक चर्चा केली.

नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता : निसर्ग ग्रुपचा हा उपक्रम सामाजिक भान आणि पर्यावरणप्रेमाचे उत्तम उदाहरण असून, स्थानिक नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्यास मदत करणारा ठरतो आहे. त्याबद्धल निसर्ग ग्रुप, कराडच्या वृक्षारोपण या स्तुत्य उपक्रमाचे पर्यावरणप्रेमींकडून कौतुक होत आहे.

 

The post आगाशिव डोंगराच्या पायथ्याशी विविध देशी झाडांची लागवड first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/6013/feed 0