पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योग आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवला

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

आमदार मनोज घोरपडे; उंब्रज येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

कराड/प्रतिनिधी : –

भारतातील योग पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण जगभर पोहवचला. योगामुळे निरोगी आयुष्य जगता येते. अनेक आजारांवर मात करता येते. त्यामुळे भारतीयांबरोबरच संपूर्ण जगाचे आरोग्य चांगले राहवे, या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण जगात योग दिन साजरा होत आहे. चांगल्या आरोग्यासाठी सर्वानी नियमित योगसने करावीत, असे प्रतिपादन आमदार मनोज घोरपडे यांनी केले.

विद्यार्थ्यांसमवेत योग साधना : आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून उंब्रज (ता. कराड) येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालयात आमदार मनोजदादा घोरपडे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांसमवेत योग दिन साजरा केला. सुमारे तासभर योगासनांची प्रात्यक्षिकात सहभाग घेतला. याप्रसंगी आमदार मनोज घोरपडे यांनी योग दिनाचे महत्त्व सांगितले.

योग प्रात्यक्षिक : योग गुरु चंद्रशेखर सरकाळे, डी.आर. बर्गे, कुमारी भोसले यांनी योग प्रात्यक्षिक, योगप्रकार, त्याचे महत्त्व याविषयी माहिती सांगितली. यावेळी जयवंत जाधव, योगिराज सरकाळे, विनायक जाधव, ग्रामपंचायत सदस्य विजय जाधव, दिगंबर भिसे, संदीप घाडगे, प्रवीण नलवडे, तसेच शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

शरीर आणि मनाच्या संतुलनासाठी योग महत्त्वाचा : शरीर आणि मनाच्या संतुलनासाठी योग अंत्यत महत्त्वाचा असल्याचे सांगत आमदार मनोज घोरपडे म्हणाले, विद्यार्थी दशेपासून जीवनात योग आणल्यास सर्वांगीण स्वास्थ्य विकसित होईल. पुर्वी योग दिन फक्त भारतात साजरा केला जात होता. परंतु, आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून योगदिन आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा होवू लागला असून जगाला योगाचे महत्त्व समजू लागले आहे.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!