कृष्णा विश्व विद्यापीठातर्फे तातडीक वैद्यकीय सेवांची प्रात्यक्षिके

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

जागतिक तातडीक वैद्यकीय दिनाचे औचित्य; आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ उपचार करण्याबाबतची दिली माहिती

कराड/प्रतिनिधी : –

जागतिक तातडीक वैद्यकीय दिनाचे औचित्य साधून येथील कृष्णा विश्व विद्यापीठ आणि कृष्णा हॉस्पिटलच्यावतीने कराड तालुक्यात ठिकठिकाणी तातडीक वैद्यकीय सेवांची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. यावेळी आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तत्काळ उपचार कसे करावेत, याबाबतची माहिती उपस्थितांना देण्यात आली.

जागतिक तातडीक वैद्यकीय दिनानिमित्त आयोजन : कृष्णा विश्व विद्यापीठातील तातडीक वैद्यकीय विभागाच्यावतीने जागतिक तातडीक वैद्यकीय दिनानिमित्त रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना, कराड शहर पोलिस स्टेशन आणि मध्यवर्ती बसस्थानक परिसरात तातडीक वैद्यकीय सेवांची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली.

जागृती : यावेळी नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ उपचार कसे करावेत, याबाबत जागृती करण्यात आली. तसेच गंभीर जखमी रुग्णांवरील प्रथमोपचार, हृदयविकाराचा झटका, सर्पदंश, लकवा, गुदमरणे, श्वसननलिकेत अडथळा आणि हृदयक्रिया थांबल्यास दिले जाणारे सी.पी.आर. अशा विविध आपत्कालीन स्थितींची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. ही प्रात्यक्षिके पाहण्यासाठी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

मान्यवरांची उपस्थिती : कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमात विभागप्रमुख डॉ. शंतनु कुलकर्णी, डॉ. रवींद्र पाटील, डॉ. मारिओ, डॉ. राहुल, डॉ. दीपक, डॉ. यश, डॉ. पार्वती, तसेच नर्सिंग स्टाफ आकाश तवटे, देवदास फाळके, अजित पवार, मारुती पवार, सचिन बांबुरे, राजशेखर बन्नूर, प्राजक्ता चोपडे, सुमन जाधव व पुनम झुंजार आदींचा सहभाग होता.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!