माजी खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
कराड/प्रतिनिधी : –
पुणे-कागल राष्ट्रीय महामार्गावरील महत्त्वाचे ठिकाण असलेल्या उंब्रज (ता. कराड) येथे पारदर्शक उड्डाणपूल उभारण्यासाठी केंद्र सरकारने तब्बल १३३.४५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबतचे पत्र माजी खासदार श्रीनिवास पाटील यांना पाठवून मंजुरीची माहिती दिली आहे.
मागणी : उंब्रज शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गामुळे वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणावर वाढला असून, अपघातांचे प्रमाणही चिंताजनक झाले आहे. या पार्श्वभूमीवर उंब्रज येथे अनेक अंडरपाससह पारदर्शक उड्डाणपूल उभारावा, अशी मागणी माजी खासदार श्रीनिवास पाटील यांनी सातत्याने केंद्र सरकारकडे लावून धरली होती. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अखेर या कामासाठी निधी मंजूर झाला असून, लवकरच प्रत्यक्ष कामाचा मार्ग मोकळा होणार आहे.












