पालेभाजी स्पर्धेत कपिलची ‘मेथी’, वजरोशीची ‘चाकवत’ अव्वल
कराड/प्रतिनिधी : –
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनात मंगळवारी झालेल्या फळभाजी व पालेभाजी स्पर्धेत आळसुंदचा ‘टोमॅटो’ आणि कराड तालुक्यातील तांबव्याची ‘वांगी’ यांनी प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेसाठी सातारा व सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता.
प्रथम तीन क्रमांक : फळभाजी गटात आळसुंद (ता. खानापूर) येथील पल्लवी अशोक जाधव यांच्या ‘टोमॅटो’ला आणि तांबवे (ता. कराड) येथील आदर्श पंढरीनाथ पाटील यांच्या ‘वांगी’ला विभागून प्रथम क्रमांक मिळाला. कार्वे (ता. कराड) येथील प्रत्येक श्रीकांत जानुगडे यांच्या ‘मिरची’ला आणि दिवशी बुद्रुक (ता. पाटण) येथील अर्चना अशोक नांगरे यांच्या ‘पावटा’ला तृतीय क्रमांक देण्यात आला. तसेच लवणमाची (ता. वाळवा) येथील विकास सर्जेराव माळी यांच्या ‘फ्लॉवर’ व गोंदी (ता. कराड) येथील लालासाहेब आनंदराव पवार यांच्या ‘चेरी टोमॅटो’ला विभागून तृतीय क्रमांक मिळाला.











