परीट समाज सेवा मंडळातर्फे संत गाडगेबाबांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

वधू-वर पालक मेळाव्याला उदंड प्रतिसाद; समाजातील गुणवंतांचा सन्मान

कराड/प्रतिनिधी : –

कराड तालुका परीट समाज सेवा मंडळाच्या वतीने संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक बबनराव शिंदे होते.

मान्यवरांची उपस्थिती : यावेळी बेळगावचे किरण बांदेकर, अनिल साळुंखे, प्रकाश जाधव, महेश सुळे, उत्तमराव राऊत, गणेश जाधव, नानासाहेब पवार, अमर बनारसे आदी मान्यवर उपस्थित होते.

अभिवादन : कार्यक्रमानिमित्त आयोजित वधू-वर पालक मेळाव्याला परीट समाज बांधवांचा उत्स्फूर्त आणि उदंड प्रतिसाद लाभला. प्रारंभी, मान्यवरांच्या हस्ते संत गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले.

वसा आणि वारसा पुढे नेण्याचे आवाहन : यावेळी अध्यक्षीय भाषणात बबनराव शिंदे यांनी, संत गाडगेबाबांच्या विचारांचा वसा आणि वारसा पुढे नेण्यासाठी समाज बांधवांनी संघटितपणे प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

सन्मान : समाजातील नवनियुक्त सदस्यांचा, तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा यावेळी सन्मान करण्यात आला. मलकापूर नगरपालिका निवडणुकीत बिनविरोध निवड झाल्याबद्दल ज्योत्स्ना अभिजीत शिंदे, तसेच आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल मीनाक्षी प्रसन्न रसाळ यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

मनोगते : कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. मंडळाच्या सर्व सदस्यांनी मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सुनील परिट यांनी केले, तर तानाजी पवार यांनी आभार मानले.

उपस्थिती : या कार्यक्रमास कराड शहर व तालुक्यातील परीट समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाळासाहेब यादव, संजय गायकवाड, दिलीपराव नलवडे, अण्णा वाघ, चंद्रकांत गायकवाड, नंदकुमार गायकवाड, प्रवीण राक्षे, संदीप पारवे, अजिंक्य राऊत, केदार रसाळ, दिगंबर यादव, श्रीरंग रोकडे, अमोल कोकाटे, सचिन साळुंखे, सागर राऊत, निवास काटकर यांच्यासह सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

error: Content is protected !!