महाराष्ट्र परीट सेवा मंडळाचा जिल्हा पदाधिकारी मेळावा उत्साहात

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

कराड/प्रतिनिधी : –

महाराष्ट्र परीट (धोबी) सेवा मंडळाचा सातारा जिल्हा पदाधिकारी नियुक्ती मेळावा कराड येथे उत्साहात पार पडला. समाजाच्या एकीचा संदेश देत झालेल्या या मेळाव्यात नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.

मान्यवरांची उपस्थिती : या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र परीट (धोबी) सेवा मंडळाचे प्रदेशाध्यक्ष खंडेराव आनंदा कडगल होते. अध्यक्षस्थानी कृष्ण कारखान्याचे संचालक बबनराव उर्फ वसंतराव बाबुराव शिंदे, तर महाराष्ट्र परीट सेवा मंडळाचे प्रदेश सचिव सुनील जनार्दन फंड होते.

निवड : या मेळाव्यात जिल्हाध्यक्ष महेश गणपत सुळे (कराड), जिल्हा कार्यकारी अध्यक्ष कैलास ठोंबरे (खंडाळा), जिल्हा उत्तर उपाध्यक्ष अमर वनारसे (वाई), जिल्हा दक्षिण उपाध्यक्ष नानासो पवार (पाटण), लॉन्ड्री संघटना जिल्हाध्यक्ष चंद्रकांत शेंडगे (फलटण), लॉन्ड्री संघटना कार्यकारी अध्यक्ष नंदकुमार गायकवाड (कार्वे), जिल्हा मीडिया सेल अध्यक्ष सुनील परीट (सर), कराड तालुकाध्यक्ष गणेश जाधव (कराड) यांची निवड करण्यात आली.

उपस्थिती : कार्यक्रमास महिला प्रदेशाध्यक्ष श्रीमती सुवर्णा विष्णु सावर्डे (पुणे), वरिष्ठ उपाध्यक्ष अनिल धोंडीराम साळुंखे (विटा), प्रदेश उपाध्यक्ष भरत लोखंडे (कोल्हापूर), प्रकाश ज्ञानू जाधव (कराड), तसेच सांगली जिल्हा अध्यक्ष संजय साळुंखे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी संत गाडगे महाराज सेवा संस्था, सातारचे अध्यक्ष दिलीप काटकर आणि सहसचिव श्री. उत्तम राऊत यांची विशेष उपस्थिती लाभली.

संघटनात्मक बळकटीचा संकल्प : या मेळाव्यास सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून समाजबांधव, महिला आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. समाजातील ऐक्य, प्रगती आणि संघटनात्मक बळकटीचा संकल्प व्यक्त करत मेळाव्याला उत्साहपूर्ण वातावरण लाभले.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

error: Content is protected !!