भाजपा मजबूत, महायुतीही बळकट करण्याचा प्रयत्न 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

आमदार डॉ. अतुल भोसले; इंद्रजीत गुजर, स्मिता हुलवान, आप्पा माने, संजय कांबळे यांच्यासह अनेकांचा पक्षप्रवेश

कराड/प्रतिनिधी : –

कराड नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शहराचा विकास व्हावा आणि अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्नांना महायुती सरकारच्या माध्यमातून बळ मिळावे, यासाठी कराड शहरातील नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्याने पक्ष मजबूत झाला आहे. येत्या काळात काठावर असलेल्या असंख्य लोकांना सामावून घेत महायुती आणखी मजबूत करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे मत भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले यांनी केले.

पक्षप्रवेश : मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण व सातारा जिल्हाध्यक्ष आ.डॉ. अतुल भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी कराडचे काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष राजेंद्र (आप्पा) माने, माजी नगरसेवक इंद्रजीत गुजर, माजी विरोधी पक्षनेत्या स्मिता हुलवान, संजय कांबळे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.

मान्यवरांची उपस्थिती : यावेळी भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर उपस्थित होते.

व्ह्युवरचना तयार : याप्रसंगी बोलताना आ. भोसले म्हणाले, इंद्रजीत गुजर यांनी अनेक वर्षांपासून सामाजिक, राजकीय क्षेत्रांत काम केले आहे. नगरपालिकेतही त्यांनी प्रतिनिधित्व केले असून, त्यांच्या शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातूनही त्यांनी चांगले काम केले आहे. याचा त्यांचा वॉर्ड, तसेच इतर ठिकाणच्या त्यांच्या संबंधाचा पक्षासाठी कसा फायदा होईल, यासाठीची आम्ही व्ह्युवरचना आखली असल्याचे त्यांनी सांगितले.

मलाही सहकार्य करण्याची भूमिका : आप्पा माने यांनी मंगळवार पेठ व परिसराचे प्रतिनिधित्व केले असून, अनेक वर्षांपासून त्यांनी मलाही सहकार्य करण्याची भूमिका घेतली होती. परंतु आज त्यांनी अधिकृतपणे पक्षप्रवेश केल्याने फायदा होईल.

तरुणांचे संघटन : संजय कांबळे यांनी तरुणांचे संघटन करून, ज्येष्ठ नागरिक आणि माता भगिनींचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

महिला संघटन मजबूत : अनेक वर्षांपासून कराडमध्ये महिला संघटिका, नगरपालिकेत महिला व बालकल्याण सभापती म्हणून काम पाहणाऱ्या स्मिता हुलवान यांनीही पक्षप्रवेश केला आहे. या सर्वांना सोबत घेऊन कसे पुढे जाता येईल, याचा प्रयत्न राहील.

भविष्यातील धोरणावर चर्चा : येत्या काळात सर्वांसोबत चर्चा करून पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने कसा तोडगा काढता येईल, यासंदर्भात आम्ही प्रयत्नशील आहोत. या सर्वांच्या पक्ष प्रवेशामुळे शहराला चांगली दिशा देणारे लोक भाजपला मिळाले आहेत. विक्रम पावसकर यांचा पालिकेच्या दृष्टीने सर्वांना पक्षाकडे कसे आकर्षित करता येईल, यासाठीचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. आम्ही सर्वांनी मिळून भविष्यासाठी कसे धोरण असावे, यासाठीचीही चर्चा केली असल्याचे त्यांनी सांगितले.

महायुतीमध्ये सामील व्हा : यावेळी ज्या ज्या लोकांना महायुती सरकारकडून कामे करून घ्यायची आहेत, विकासकामांच्या माध्यमातून या शहराचा चेहरा मोहरा बदलायचा आहे, त्या सर्वांनी महायुतीमध्ये सामील व्हावे, असे आवाहन करत भारतीय जनता पक्ष सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याच्या बाबतीत प्रयत्नशील असल्याचे आमदार अतुल भोसले यांनी सांगितले.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

आणखी वाचा

Buzz4 Ai
error: Content is protected !!