कराडचे रहिवासी शशिकांत दत्तात्रय खराडे यांची तळबीड पोलीस ठाणे येथे पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर पदोन्नती झाल्याबद्दल ग्राहक पंचायत महाराष्ट्र, कराड शाखेतर्फे (शुक्रवार पेठ) त्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती : या कार्यक्रमास अध्यक्ष नितीन शाह, सचिव हिरालाल खंडेलवाल, उपाध्यक्ष कैलास थोरवडे, संतोष पालकर, दत्ताजी खुडे, अॅड. श्रीकांत दिवटे, डॉ. धनंजय खैर, अॅड. आदित्य घाटे, निलेश भोपते, सौ. कांचन कालेकर, सौ. शालिनी शाह, सौ. डॉ. व्हावळ, सौ. अॅड. वर्षा पाटील, सौ. दिपाली चक्के, सौ. कल्पना कदम आणि सौ. नलवडे, राहुल खंडेलवाल, दिलीप व संतोष वास्के, यश व लोकेश खंडेलवाल, निशांत व स्वप्निल शाह, गोपीचंद ओसवाल आणि पोलीस कर्मचारी विलास जाधव आदींनी त्यांचे अभिनंदन केले.