कृष्णा कारखान्यात फिल्ड स्टाफ आपल्या दारी उपक्रमाचा प्रारंभ

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

कराड/प्रतिनिधी : –

कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळ सातत्याने शेतकरी सभासदांच्या हितासाठी नवनवीन उपक्रम राबवित असते. आता कृष्णा कारखान्यात सभासद शेतकऱ्यांच्या उत्पादनवाढीसाठी आणि मार्गदर्शनासाठी ‘फिल्ड स्टाफ आपल्या दारी’ हा उपक्रम राबविला जाणार आहे. या उपक्रमाचा प्रारंभ कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगदीश जगताप यांच्या हस्ते करण्यात आला.

मान्यवरांची उपस्थिती : यावेळी संचालक लिंबाजी पाटील, दयानंद पाटील, जितेंद्र पाटील, धोंडीराम जाधव, निवासराव थोरात, संजय पाटील, बाबासो शिंदे, शिवाजी पाटील, सयाजी यादव, जे. डी. मोरे, विलास भंडारे, वसंतराव शिंदे, अविनाश खरात, श्रीरंग देसाई, मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार, मनोज पाटील, कृष्णा कृषी परिषदेचे अध्यक्ष गजेंद्र पाटील, प्राचार्य डॉ.अशोक फरांदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

विविध उपक्रम : कृष्णा कारखाना सभासद शेतकर्‍यांचे उत्पादन वाढीसाठी जयवंत आदर्श कृषि योजना, शेतकरी संवाद मेळावे, अल्प दरात द्रवरूप जिवाणू खते, सेंद्रीय खते, माती परिक्षण, मोफत घरपोच साखर, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने ऊसनोंदी, पारदर्शक तोडणी यंत्रणा यासारखे उपक्रम कारखाना राबवित आहे. याबरोबरच आता ‘फिल्ड स्टाफ आपल्या दारी’ हा उपक्रम राबविला जाणार आहे. सर्वसामान्य ऊस उत्पादक शेतकरी, सभासद बंधूं-भगिनींना ऊस लागवडीपासून ते खोडवा संगोपणापर्यंतचे ऊस पिकाचे सर्व मार्गदर्शन त्यांना त्यांच्या बांधावर मिळावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

कृती आराखड्यामध्ये या बाबींचा समावेश : कार्यक्षेत्रातील सभासद शेतकऱ्यांना, ऊस उत्पादकांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या समस्यांचे जागेवरच निराकरण व्हावे, उसाचे एकरी उत्पादन वाढविणेसाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे, व कारखान्याच्या जयवंत आदर्श कृषी योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे,  AI कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, ठिबक सिंचनाचे महत्त्व, दर पंधरा दिवसातून गट ऑफिसला सभासद, अधिकारी व पदाधिकारी यांच्या भेटीतून चर्चा घडवून आणणे इत्यादी बाबींचा या कृती आराखड्यामध्ये समावेश असल्याची माहिती मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार यांनी दिली.

प्रात्यक्षिक व ट्रेनिंग : सदर उपक्रमाचे प्रात्यक्षिक व ट्रेनिंग कारखान्याच्या सर्व शेती खात्यातील कर्मचाऱ्यांना जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालय येथे देण्यात आले. यावेळी कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार,जनरल मॅनेजर केन दादासाहेब शेळके, ऊस विकास अधिकारी पंकज पाटील व शेती खात्यातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

कारखान्याकडून विशेष सत्कार

कारखान्यातील शेतकी विभागाचे गटाधिकारी मोहन पाटील यांचे प्रामाणिकपणाबद्दल, तसेच प्राचार्य डॉ. अशोक फरांदे यांची पुणे येथे माती परीक्षण आणि पाण्याचा वापर या राज्यस्तरीवर कमिटीवर ज्युरी म्हणून नेमणूक झाल्याबद्दल, तसेच राज्यस्तरीय हस्ताक्षर स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल सॅनिटेशन विभागातील कर्मचारी मनोज हातेकर यांचा कारखान्याचे व्हा.चेअरमन जगदीश जगताप व कारखान्याचे सर्व संचालक मंडळातर्फे सत्कार करण्यात आला.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!