आमदार मनोज घोरपडे यांना शुभेच्छा देण्यासाठी उसळला जनसागर

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

वाढदिवसानिमित्त उंब्रज येथे विविध कार्यक्रम; राजकीय, सामाजिक व अन्य क्षेत्रातील मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा 

कराड/प्रतिनिधी : –

कराड उत्तरचे आमदार भारतीय जनता पार्टीचे नेते मनोजदादा घोरपडे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कराड उत्तरमधील हजारो कार्यकर्ते, महिला, उंब्रजमध्ये दाखल झाले होते. अत्यंत हर्षोल्हासात आमदार मनोजदादा घोरपडे यांचा वाढदिवसास साजरा करण्यात आला.

ग्रामदैवत दर्शन, वही तुला व साहित्य वाटप : सकाळी कुटुंबाकडून औक्षण करून गावचे ग्रामदैवत मारुतीचे दर्शन घेऊन हरपळवाडी ग्रामस्थांच्या वतीने वही तुला कार्यक्रम झाला. पाल खंडोबा देवाला महाभिषेक करून योगेश्वर सामाजिक संस्था पाली यांच्यावतीने बांधकाम कामगारांना साहित्याचे वाटप करण्यात आले. तळबीड येथील सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या समाधीस्थळी दर्शन घेऊन महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कै. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी दर्शन घेत उंब्रज येथील रुक्मिणी लॉन्स येथे कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपस्थित होते. सकाळपासूनच कराड उत्तरमधील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आ. मनोजदादा घोरपडे यांना शुभेच्छा दिल्या.

मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून दिल्या शुभेच्छा : यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिहराजे भोसले, पालकमंत्री शंभूराज देसाई, भाजप जिल्हाध्यक्ष आ. अतुलबाबा भोसले, आ. महेश शिंदे, माजी आ. प्रभाकर घार्गे, सुनील काटकर, महेश बाबा जाधव, वसंतराव जगदाळे,संभाजीराव इंगवले, मोहनराव माने, चित्रलेखा माने-कदम, वासुदेव माने, निलेश माने, तात्या साबळे, राहुल गायकवाड, राजू घाडगे, माधवराव गुरव, संजय घोरपडे, प्रदीप पाटील, राजू भोसले, फिरोज पठाण,सुरेश पाटील, बाळासाहेब साळुंखे, मोहनराव माने, योगीराज सरकाळे, निखिल साळुंखे, दादासाहेब यादव, राजेंद्र शेळके, चंदन भाऊ शिंदे, शहाजी मोहिते, जयवंत जाधव, संपत भाऊ जाधव, योगीराज जाधव, एडवोकेट विशाल शेजवळ, राजू मोहिते, प्रमोद गायकवाड, उमेश साळुंखे, सुनील पाटील, राजू पाटील, प्रशांत कदम, पवन निकम, सागर जगदाळे ओमकार जगदाळे नंदकुमार जगदाळे, जयवंत जगदाळे दिनकरराव पाटील, कुलदीप क्षीरसागर, राजू कदम, बाबुराव धोकटे, संतोष वेताळ यशवंत डुबल, प्रकाश पवार, महेश चव्हाण अमोल पवार, संभाजीराव पिसाळ, शैलेश चव्हाण, विकास राऊत, महेश घार्गे, सुनीता मगर, श्रीकांत पिसाळ, तुकाराम नलवडे, विकास कारंडे, सागर शिवदास, राजू सूर्यवंशी, निलेश डुबल, बाळू कंबीरे, राजन पाटील, राहुल पार्लेकर, बाळासो कंबीरे, गणेश जाधव, प्रकाश पाटील, संभाजी थोरात, राजू कदम, अप्पा माने, उमेश शिंदे, संतोष पाटील, शंकर शेजवळ, महेश चंदूगडे, अनिल माने, बाळासो शिंदे, नंदू नलवडे, विष्णू पाटील, सागर ढाणे, समृद्धी जाधव, आनंद जाधव, सुधीर जाधव, शिवाजी डांगे, श्रीरंग गोरे, धनजी जाधव, विकास गायकवाड, रणजीत पाटील, रणजीत जाधव, शैलेश आवळे, अण्णासाहेब निकम, राजू मोरे, सुनील काटे, जालिंदर आवळे, सुधीर शेळके, प्रशांत कणसे, अधिक घाडगे, बबन माने, जियदीप शिंदे, नंदू माने, दिगंबर भिसे-पाटील, तुषार जाधव, सचिन बेलागडे, साहेबराव पवार, तुकाराम नलवडे, सचिन देशमुख, बाजीरांग जाधव आदी हजारो कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष भेटून त्यांना शुभेच्छा दिल्या.

मान्यवरांनी फोनवरून केले अभिष्टचिंतन : केंद्रीय मंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, खा. उदयनराजे भोसले, खा. नितीन पाटील, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री भरत गोगावले, आ. मकरंद पाटील, आ. सचिन पाटील, सुरभीताई भोसले आदींनी त्यांना फोनवरून शुभेच्छा दिल्या.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

आणखी वाचा

Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!