आ. मनोजदादा घोरपडे यांच्या  वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

कराड/प्रतिनिधी : –

कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार (दि. २६) मे रोजी विविध सामाजिक, धार्मिक व जनसंपर्कात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

जनतेशी नाळ घट्ट ठेवण्याचा प्रयत्न : दिवसभर चालणाऱ्या या कार्यक्रमांमधून जनतेशी नाळ घट्ट ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार असून, अनेक ठिकाणी प्रत्यक्ष भेटी घेऊन आमदार मनोजदादा घोरपडे जनतेच्या साक्षीने वाढदिवस साजरा करणार आहेत.

ग्रामदैवत दर्शन व वहीतुला : सोमवारी वाढदिवसादिवशी सकाळी ८ वाजता कराड तालुक्यातील ग्रामदैवत हनुमान मंदिर येथे दर्शन घेऊन कार्यक्रमांची सुरुवात होणार आहे. त्यानंतर सकाळी ९ वाजता हरपळवाडी (ता. कराड) येथे वहीतुला कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

महाअभिषेक : सकाळी ९:३० वाजता श्री क्षेत्र पाल (ता. कराड) खंडोबा येथे महाअभिषेक होणार असून, श्रद्धाभावाने उपस्थित राहणाऱ्या भाविकांसोबत आमदार घोरपडे धार्मिक विधींमध्ये सहभागी होणार आहेत. सकाळी १० वाजता पाल (ता. कराड) येथे कामगार कल्याणासाठी एक सकारात्मक उपक्रम राबवण्यात येणार असून, बांधकाम कामगारांना आवश्यक साहित्याचे वाटप केले जाईल.

सरसेनापतींचे घेणार दर्शन : सकाळी ११ वाजता तळबीड (ता. कराड) येथील हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या समाधीस्थळी दर्शन घेण्यात येणार आहे.

प्रीतिसंमावर अभिवादन : सकाळी ११:३० वाजता कराड येथे प्रीतिसंगमावरील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या समाधीस्थळी अभिवादन करून आमदार मनोजदादा घोरपडे त्यांना आदरांजली अर्पण करणार आहेत.

नागरिकांशी साधणार संवाद : दुपारनंतरचा वेळ हा नागरिकांशी प्रत्यक्ष संवादासाठी राखून ठेवण्यात आला आहे. दुपारी १२:३० वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत रुक्मिणी मंगल कार्यालय, उंब्रज येथे आमदार मनोजदादा घोरपडे शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपस्थित राहणार असून, विविध क्षेत्रांतील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक त्यांच्याशी भेटीसाठी उपस्थित राहणार आहेत.

निष्ठेचा आदर्श : या सर्व कार्यक्रमांचे आयोजन भारतीय जनता पार्टी, कराड उत्तर व आमदार मनोजदादा घोरपडे युवा मंच, कराड उत्तर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. या निमित्ताने कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात सामाजिक बांधिलकी आणि जनतेशी निष्ठेचा एक सकारात्मक आदर्श साकारण्यात येणार आहे.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!