श्री कालिकादेवी पतसंस्था सातारा शाखेत जागतिक महिला दिन उत्साहात

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

कराड/प्रतिनिधी : – 

श्री कालिकादेवी नागरी सहकारी पतसंस्था मर्या., कराड यांच्या सातारा शाखेत जागतिक महिला दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी शाखेच्या महिला सभासद व ग्राहकांचा संस्थेच्यावतीने तुळशीचे रोप देऊन सन्मान करण्यात आला.

महिलांना मार्गदर्शन : कार्यक्रमात सातारा येथील कासार समाजातील सौ. आशाताई अशोक कुंदप, एलआयसीमधील एमडीआरटी प्रतिनिधी सौ. नंदिनी भामरे, तसेच जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील कार्यालय अधीक्षक (श्रेणी-२) सौ. प्रिया कांबळे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.

बचतीची सवय लावावी : कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. आशा कुंदप यांनी आपल्या मनोगतात, महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घेण्याबरोबरच नियमित व्यायाम करण्याचे महत्त्व सांगितले. तसेच महिलांनी पतसंस्थेच्या विविध ठेव योजनांची माहिती घेऊन बचतीची सवय लावावी, यामुळे भविष्यात मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक आधार निर्माण होऊ शकतो, असे त्यांनी नमूद केले.

शिक्षणामुळे स्त्री सशक्त : आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे महत्त्व स्पष्ट करताना सौ. प्रिया कांबळे यांनी, भारतीय संस्कृतीत प्रत्येक दिवस हा महिलांचा असतो, असे सांगितले. घरातील व्यवस्थापन, कुटुंबाची जबाबदारी, तसेच नोकरी सांभाळताना महिला अनेक आघाड्यांवर यशस्वीपणे कार्य करत असतात. शिक्षणामुळे स्त्री सशक्त होते आणि ‘एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब शिक्षित होते’ हा महात्मा ज्योतिबा फुले यांचा विचार आजही तितकाच महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. घरातील नियोजन व बचतीची सवय रुजवण्यात महिलांची भूमिका मोलाची असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

जाहिरात

ठेव पावत्यांचे वितरण : यावेळी संस्थेचे चेअरमन राजन वेळापुरे, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक वेळापुरे आणि सातारा शाखेचे सल्लागार औदुंबर कासार यांच्या हस्ते महिला सभासदांना ठेव पावत्यांचे वितरण करण्यात आले.

विविध सेवा उपलब्ध : संस्थेच्या ठेवींचा आकडा सध्या १५१ कोटी रुपयांवर पोहोचला असून, ३१ मार्च २०२६ अखेर १६० कोटी रुपयांच्या ठेवींचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा संकल्प संस्थेने केला आहे. सातारा शाखेत स्वमालकीच्या इमारतीतून नेट बँकिंगद्वारे विविध ट्रेझरी चलन स्वीकारणे, स्टॅम्प ड्युटी व नोंदणी शुल्क भरणे, जीएसटी, आयकर, टीडीएस, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, प्रोफेशनल टॅक्स, लाईट बिल ऑनलाइन भरणे, तसेच मेलद्वारे चलन पाठविण्याची सुविधा अशा विविध सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

परिश्रम : कार्यक्रमाच्या नियोजनासाठी शाखेतील महिला कर्मचारी अश्विनी शिवगण, पूजा टंकसाळे, सायली भोकरे, पूजा खोत यांच्यासह गजानन अवसरे, हेमंत टोकसिया आणि निलेश धुमाळ यांनी परिश्रम घेतले.

मान्यवरांची उपस्थिती : कार्यक्रमास स्नेहा भांडवले, अनिता सरवैय्या, मनीषा झूटिंग, मेघना झूटिंग, पौर्णिमा कुंदप, मंदाकिनी कासार, मंगल धनावडे, प्राजक्ता साळवी, नीलम भोसले, योगिता टंकसाळे, कल्याणी शिवगण, आशा सुपेकर, स्वाती शिवगण, नीलम देशमुख, ज्योती मांजरकर, लक्ष्मी सावजी, हिराबाई खोत, प्रीती चक्के, रोहिणी कुंदप, सीमा भोकरे यांच्यासह बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

error: Content is protected !!