सातारा/प्रतिनिधी : –
भारतीय सैन्य दलाचे मनोबल वाढवण्यासाठी रविवार (दि. ११) मे रोजी सातारा शहर, तसेच जिल्ह्यातील तालुकास्तरावर तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. परंतु, सीमावर्ती भागातील ताज्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही रॅली रद्द करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.
सैन्य दलाचे मनोबल वाढवण्यासाठी आयोजन : भारतीय सैन्य दलाचे मनोबल वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासन, सातारा व पालकमंत्री, सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार (दि. ११) मे २०२५ रोजी सकाळी ९ वाजता गांधी मैदान, सातारा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, पोवई नाका या मार्गावर नियोजित “तिरंगा रॅली” आयोजित करण्यात आली होती. तसेच तालुकास्तरावर देखील तिरंगा रॅली आयोजित करण्याबाबत निर्देश देण्यात आले होते.
रॅली रद्दचा निर्णय : मात्र, भारत-पाकिस्तान सीमावर्ती परिस्थितीत निर्माण झालेल्या ताज्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सदर जिल्हा स्तरावरील तसेच तालुकास्तरावरील रॅली रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
सूचना : सदर निर्णय हा सुरक्षितता व राष्ट्रीय हित लक्षात घेऊन तातडीने घेतलेला असून, नागरिकांनी व सहभागी संस्था/अधिकाऱ्यांनी याची कृपया नोंद घ्यावी. तसेच स्थानिक पदाधिकारी यांना देखील अवगत करावे. प्रशासनामार्फत पुढील सूचना वेळोवेळी कळविण्यात येतील, असे सूचित करण्यात आले आहे.