कराडकरांसमोर उलगडणार बाबासाहेबांचे आधुनिक भारताच्या जडणघडणीतील योगदान

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विशेष व्याख्यान; रा. स्व. संघ आणि लोककल्याण मंडळ ट्रस्टच्यावतीने आयोजन 

कराड/प्रतिनिधी : – 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भवानी शाखा
आणि लोककल्याण मंडळ ट्रस्ट यांच्यावतीने सोमवार (दि. १४) एप्रिल रोजी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संघाच्या कराड शहर प्रचार विभागाचे सुयोग किरपेकर यांनी दिली.

संकल्पना : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताच्या इतिहासातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना काही वैचारिक कार्यक्रम करावा, अशी संकल्पना रा. स्व. संघाच्या भवानी शाखेच्या स्वयंसेवकांनी मांडली. यातूनच डॉ. बाबासाहेबांना अभिवादन म्हणून या व्याख्यानाचे आयोजन लोककल्याण मंडळाच्या सहकार्याने संघाच्या भवानी शाखेच्या स्वयंसेवकांनी केले आहे.

वेळ व ठिकाण : सोमवार (दि. १४)  एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वाजता कै. अण्णा भोई स्मृती भवन, पंतांचा कोट, कराड येथे हे व्याख्यान होणार आहे.

उद्देश : आपल्या देशाच्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या या महापुरुषांचे कर्तृत्व आणि योगदान आपल्या भावी पिढीला व समाजातील सर्व घटकांना समजावे, हा या व्याख्यानाचा उद्देश आहे.

ज्येष्ठ विचारवंत आणि अभ्यासू वक्ते करणार मार्गदर्शन : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आधुनिक भारताच्या जडणघडणीतील योगदान या विषयावर सांगली येथील ज्येष्ठ विचारवंत आणि अभ्यासू वक्ते प्रा. ईश्वर रायण्णवर यांना या विशेष व्याख्यानासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. ते आपल्या व्याख्यानातून कराडकरांसमोर बाबासाहेबांचे आधुनिक भारताच्या जडणघडणीतील योगदान उलगडून सांगणार आहेत.

आवाहन : सर्व देशप्रेमी कराडकर नागरिकांनी या अभ्यासपूर्ण व्याख्यानासाठी अवश्य उपस्थित राहावे आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आधुनिक भारताच्या जडणघडणीतील योगदान समजून घ्यावे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कराड शहर कार्यवाह महंतेश तुळजणवर यांनी केले आहे.

 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!