आ. मनोज घोरपडे; बाबरमाची येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन
कराड/प्रतिनिधी : –
गेली पंचवीस वर्षांत बाबरमाची गावच्या विकासकामाचा जो बॅकलॉग राहिला आहे, तो येत्या दोन वर्षांत भरुन काढणार आहे. पुर्वीच्या लोकप्रतिनिधींनी पाच-दहा लाख रुपये देऊन लोकांना केवळ झुलवत ठेवण्याचे काम केले आहे. परंतु, मला लाखात नव्हे; तर कोटीत मागा, तेवढा निधी उपलब्ध करून देण्याची क्षमता ठेवावी लागेल, असे प्रतिपादन आ. मनोजदादा घोरपडे यांनी केले.
भूमिपूजन व उद्घाटन : बाबरमाची (ता. कराड) येथे विविध विकासकामांच्या भूमिपूजन आणि उद्घाटन आयोजित कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.
मान्यवरांची उपस्थिती : यावेळी शेती उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विजय कदम, महेश जाधव, पै. हिंदकेसरी संतोष वेताळ, राहुल पाटील-पार्लेकर, कामगार नेते नवनाथ पाटील, शिवसेनेचे विनायक भोसले, बाबुराव धोकटे, कोयना दूध संघाचे व्हा. चेअरमन अशोक नलवडे आदी मान्यवर उपस्थित होते.













