बदलाच्या दृष्टीने ‘सह्याद्रि’च्या सभासदांची वाटचाल

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

आमदार मनोज घोरपडे; विद्यमान चेअरमनांनी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप

कराड/प्रतिनिधी : –

‘सह्याद्रि’चे वारे आता बदलाच्या दिशेने वाहू लागले आहे. ही निवडणूक सभासदांनीच हातात घेतली असून विद्यमान चेअरमनांनी माफी नामे लिहून घेतल्याचे सभासद विसरले नाहीत. जाणीवपूर्वक वारस नोंदी टाळल्या. कामगारांचा खासगी कामांसाठी गैरवापर केला. गेल्या ३०-४० वर्षांत सह्याद्रि कारखान्यात ७०-८० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आमदार मनोजदादा घोरपडे यांनी केला.

प्रचार सभा : तळबीड (ता. कराड) येथे स्व. यशवंतराव चव्हाण परिवर्तन पॅनेलच्या प्रचारार्थ ते बोलत होते.

मान्यवरांची उपस्थिती : यावेळी खरेदी-विक्री संघाचे चेअरमन अनिल मोहिते, कारखान्याचे माजी संचालक रमेश मोहिते, गामपंचायत सदस्य राजेंद्र मोहिते, माजी उपसरपंच दादासाहेब मोहिते, अॅड. शशिकांत मोहिते, सुनिल मोहिते, माणिक पाडळे, सुभाष गायकवाड, विकास यादव, बाबा माने, विलास गायकवाड, संजय चव्हाण, सयाजीराव मोहिते, सुजय मोहिते, शालिनीताई गुणवंत, महादेव गायकवाड, सुधाकर तुपे, प्रकाश मोहिते, रमेश मोहिते, सिद्धार्थ भोसले, संजय घोरपडे, संपतराव जाधव, अशोकराव चव्हाण, भास्कर पवार, महेशबाबा जाधव, तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इरिगेशन संस्थांना उर्जितावस्था देऊ : इरिगेशन संस्थांच्या माध्यमातून निर्माण केलेल्या दबावात आता कुणीही राहण्याची गरज नाही. उलट इरिगेशन संस्थांना आपण अधिक उर्जितावस्था मिळवून देवू, असा विश्वास व्यक्त करत कराड उत्तरचा पाणीप्रश्न सोडवणे हा माझ्या कामाचा प्रमुख अजेंडा असल्याचे आमदार घोरपडे यांनी सांगितले.

पाणीप्रश्न साडेतीन महिन्यात सोडवला : आज मी अपघाताने आमदार झाल्याची टीका केली जाते. परंतु, कराड उत्तरमधील पाणीप्रश्न सोडवण्याचे काम आम्ही साडेतीन महिन्यात केले. तुम्ही पंचवीस वर्षांत काय केले? असा सवाल उपस्थित करत आमदार घोरपडे म्हणाले, एकतरी नाव सांगा. सह्याद्रि हा महाराष्ट्रात नावाजलेला कारखाना. पण तुमच्यावरच कारखाना वाचवायला पाहिजे असं, म्हणण्याची वेळ आली.

कारखान्यात मोठा भ्रष्टाचार : कारखाना अडचणीत आणला कोणी? तुम्ही अमर्याद सत्ता वापरून स्वतःचे घर भरलं, कामगारांचा वैयक्तिक कामासाठी गैरवापर केला, असे सांगत आमदार घोरपडे म्हणाले, कारखान्यात फार मोठा भ्रष्टाचार झाला असून विद्यमान चेअरमनांनी 40 वर्षांत 70 ते 80 कोटी स्वतःच्या कुटुंबावर उडवले असल्याचा आरोप आ. घोरपड यांनी यावेळी केला.

राजकारणात पैसा वापरला : ऊस जाण्याच्या बाबतीत एकही शेतकरी, सभासद समाधानी नाही, असे सांगत आमदार घोरपडे म्हणाले, फक्त चेअरमन व त्यांचे कुटुंब समाधानी आहे. सगळ्यांची लूट करून राजकारणात पैसा वापरला. विधानसभा निवडणुकीत जनतेने यांना दाखवून दिले, आता कारखान्यात बदल करायचाय असे प्रत्येक सभासदाचे म्हणणे आहे.

सकारात्मक विचार केला का? : पाणी संस्थेच्या माध्यमातून सभासदांवर दबाव टाकला जातो, याचा अधिकार त्यांना दिला कोणी? इरिगेशन योजनांसाठी तुमचे योगदान काय? दरवर्षी इन्स्पेक्शनच्या नावाखाली दोन लाख रुपये फी घेऊन जाता. मात्र, 40-50 वर्षांत इरिगेशन संस्थांमध्ये नवीन टेक्नॉलॉजी बाबत सकारात्मक विचार का केला नाही? असा सवाल हे आमदार घोरपडे यांनी केला.

शेतकऱ्यांना 24 तास लाईट देण्याचा प्रयत्न : पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हा नियोजन मधून १६ तासांची लाईट योजनांना दिली. मात्र, यांच्याकडे लोक गेले असता, यांनी 70-80 लाख रुपये घेऊन यायला सांगितले. पण येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना 24 तास लाईट देता येईल; असे नियोजन करू, असे आमदार घोरपडे म्हणाले. कारखान्याच्या सर्व पाणीपुरवठा योजनांना ऊर्जेत अवस्था येण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. यासेच कारखान्यात सत्तांतर झाल्यावर ए टू झेड टंग्याचा बंदोबस्त केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

मनोगत : यावेळी सह्याद्रि कारखान्याचे माजी संचालक रमेश मोहिते, अॅड. शशिकांत मोहिते, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन अनिल मोहिते, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र मोहिते यांनी मनोगत व्यक्त केले.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!