
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून कृष्णा काठाला (स्व.) यशवंतराव मोहिते (भाऊ) यांच्यानंतर अतुलबाबा भोसले यांच्या रूपाने उमदे, कार्यतत्पर नेतृत्व मिळाले आहे. (स्व.) यशवंतराव भाऊंनी २७ वर्षे या मतदारसंघाचे नेतृत्व केले. कापूस एकाधिकार योजना, कोयना धरण, एस. टी महामंडळ आदी महत्वपूर्ण निर्णयांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात मंत्री म्हणून काम करताना त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला. आज आमदार अतुलबाबा भोसले हेही भाऊंच्या आदर्शांवर वाटचाल करीत करून भविष्यात एखाद्या महत्वपूर्ण खात्याचे मंत्री म्हणूनही ते लवकरच धुरा सांभाळतील, यात शंका नाही…
– राजेंद्र मोहिते/ कराड : –
कृष्णा काठाला यशवंत विचारांची मोठी पार्श्वभूमी आणि तेवढाच दैदीप्यमान इतिहासही आहे. अतुलबाबा भोसले आमदार झाल्यानंतर त्यांनी दिवंगत यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीस्थळी नतमस्तक होत यशवंत विचारांची कास धरून त्यांच्या उंचीला साजेसे, सुसंस्कृत राजकारण करण्याचे वचन दिले आहे.
कराड दक्षिणच्या विकासाचा ध्यास : आमदारकीची शपथ घेतल्यानंतरपासून अतुलबाबा अविरत कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचा ध्यास घेऊन त्याच्या पुर्ततेसाठी प्रयत्नांची शिकस्त करीत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहर आणि मतदारसंघाच्या सर्वांगीण विकाससाठी काय काय करता येईल, यादृष्टीने ते प्रयत्नशील आहेत.
कराड आदर्श शहर म्हणून देशाच्या नकाशावर आणण्याचा प्रयत्न : कराड शहर देशाच्या नकाशावर एक प्रगतशील व आदर्श शहर म्हणून नावारूपाला आणण्याचा त्यांचा मानस आहे.
विकसित कराडचे व्हिजन : शहरातील छत्रपती श्री शिवाजी महाराज स्टेडियमचा नवा आराखडा तयार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकरवी त्यांनी कोट्यवधी रूपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. तसेच कृष्णा घाट व प्रीतिसंगम बागेचे पुनर्निर्माण करण्याचा संकल्पही त्यांनी केला आहे. त्याचबरोबर शहरावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी नदी काठावरून नेकलेस रोड निर्माण करण्याचे व्हिजनही त्यांनी ठेवले आहे.
धार्मिक पर्यटनावर भर : शिवाय कराडसारख्या संतांच्या भूमीतील पुरातन, ऐतिहासिक महत्व असलेल्या मंदिरांचा जीर्णोद्धार व डागडुजी करून येथील धार्मिक पर्यटन वाढवण्याकडेही त्यांचा कल आहे. या सगळ्यातून धार्मिक पर्यटन वाढवून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मनोदय आहे. त्यादृष्टीने त्यांनी पावकेश्वर मंदिरासाठी निधीची उपलब्धी करून महत्वपूर्ण पाऊल टाकले आहे. त्याचबरोबर युवकांच्या हाताला काम देण्यासाठी त्यांनी कराडला फायूस्टार एमआयडीसी उभारण्याचाही संकल्प केला आहे.
मुख्यमंत्र्यांचे विश्वासू म्हणून ओळख : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू असलेले उमदे नेतृत्व अशी डॉ. अतुलबाबा भोसले यांची राज्यभरात ओळख निर्माण झाली आहे.
दमदार कामगिरी : लोकसभेला श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून मोठे लीड देत दिल्लीला पाठवण्यात डॉ. अतुलबाबा भोसले यांनी मोलाची कामगिरी पार पडली आहे. तसेच अनेक नेत्यांना भारतीय जनता पार्टीत आणण्यात त्यांना यश आले. त्यानंतर स्वतः विक्रमी मतांनी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडून येण्याची किमयाही त्यांनी साधली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वेळोवेळी कामाची दखल : डॉ. अतुलबाबा भोसले यांनी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आतापर्यंत केलेल्या कामाची दखल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नक्कीच घेतली आहे. त्यामुळे आगामी काळात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे उमदे, दमदार नेतृत्व आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांची एखाद्या महत्वपूर्ण खात्याचे मंत्री म्हणून वर्णी लागेल, यात शंका नाही.
लाख लाख शुभेच्छा : अशा या दमदार आमदार आणि भावी मंत्री डॉ. अतुलबाबा भोसले यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेछा…
