कराड/प्रतिनिधी : –
नांदगाव (ता. कराड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या निवृत्त मुख्याध्यापिका प्रभावती निवृत्ती पाटील यांचे (वय ७८) यांचे निधन झाले. ठाणे महापालिकेतील उपअभियंता मिलिंद पाटील यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, नातू असा परिवार आहे. टाळगाव (ता. कराड) हे सासर असलेल्या प्रभावती पाटील यांचा नांदगाव (ता. कराड) येथील उपक्रमांत सक्रिय सहभाग असायचा. प्रभावती पाटील यांनी कराड व पाटण तालुक्यातील विविध गावांतील शाळांत अध्यापनाचे कार्य केले. आदर्श शिक्षिका अशी त्यांची ओळख होती. त्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य देत मुला-मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित केले. शिक्षण क्षेत्रात त्यांची कामगिरी उल्लेखनीय राहिली. विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, उद्याेग क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल शाेक व्यक्त केला.
