शिक्षक सोसायटीचे उपक्रम आणि प्रगती दैदिप्यमान

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

महेश पालकर; गुणवंत विद्यार्थी व सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार

कराड प्रतिनिधी : –

कराड पाटण प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटी सभासदांच्यासाठी राबवत असलेले उपक्रम आणि 75 वर्षांतील संस्थेची प्रगती दैदिप्यमान आहे, असे प्रतिपादन शिक्षण संचालक योजना महेश पालकर यांनी केले.

सत्कार समारंभ : कराड पाटण प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटीच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी व सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार समारंभप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षक समितीचे राज्य नेते उदय शिंदे होते.

उपस्थित मान्यवर : यावेळी शिक्षणाधिकारी योजना अनिस नायकवडी, अखिल भारतीय शिक्षक संघाचे दीपक भुजबळ, शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विश्वंभर रणनवरे, सातारा जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानबा ढापरे, महेंद्र जानुगडे, प्रसिद्ध व्याख्याते सचिन गोसावी, अमृत भिसे माजी अध्यक्ष दिनेश थोरात, अंकुश नांगरे, शशिकांत तोडकर, भारत देवकांत, आनंद चाळके, अध्यक्ष रमेश जाधव, उपाध्यक्ष रुक्मिणी सातपुते यांची प्रमुख उपस्थिती होती.

विद्यार्थ्यांचा गुणगौरव : कराड पाटण प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटीच्या वतीने विविध परीक्षेमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार समारंभ असा सोहळा वेणुताई चव्हाण सभागृहामध्ये आयोजित केला होता. यामध्ये सहावी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, सैनिक स्कूल आणि शिष्यवृत्ती परीक्षा, आठवी शिष्यवृत्ती परीक्षा, दहावीच्या परीक्षेमध्ये 90 टक्क्यांपेक्षा जास्त व बारावीच्या परीक्षेमध्ये 80 टक्क्यांपेक्षा पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव, नीट परीक्षा, एमबीबीएस प्रवेश, राज्य, जिल्हा, आदर्श शिक्षक पुरस्कार,सेवा निवृत्ती शिक्षक सत्कार, एनएमएमएस परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार असा भरगच्च कार्यक्रम आयोजित केला होता.

संस्थेच्या प्रगतीचा अभिमान : या कार्यक्रमात पुढे बोलताना श्री. पालकर म्हणाले, मी स्वतः या संस्थेचा सभासद असून 75 वर्षांतील संस्थेची प्रगती पाहून अभिमानाने उर भरून येतो.

दैदीप्यमान परंपरा कायम रहावी : शिक्षक समितीचे राज्य नेते उदय शिंदे भाषणात म्हणाले, 75 व्या वर्षांत वाटचाल करणाऱ्या शिक्षक सोसायटीची दैदीप्यमान परंपरा कायम राखावी, यासाठी सर्व संचालकांनी पारदर्शक प्रयत्न करावे.

सेवानिवृत्त सभासदांचा सन्मान : यावेळी शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी, सचिन गोसावी, अमृत भिसे यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. सर्व विद्यार्थ्यांना आणि सेवानिवृत्त सभासदांना प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

उपस्थिती : यावेळी दत्ता पाटील, माजी संचालक सुभाष शेवाळे, अरुण पाटील, सातारा बँक माजी उपाध्यक्ष मोहन सातपुते, संचालक प्रदीप कुंभार, दत्ता जाधव, नीलम नायकवडी, तानाजी पाटील, संजय नांगरे, दादा शेडगे, सुनील नागे, बंडू पवार, राजेंद्र पवार, चंद्रकांत कांबळे, संजय उबाळे, धनंजय नवाळे, उत्तम नांगरे, शशिकांत कांबळे, विनायक चव्हाण, गणेश जाधव व सर्व संचालक यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोसायटीचे चेअरमन रमेश जाधव यांनी केले. उपाध्यक्ष रुक्मिणी सातपुते यांनी आभार मानले.

बोट धरून सोसायटीत आलो

कराड पाटण शिक्षक सहकारी सोसायटीत मी वडिलांच्या बरोबर बोट धरून बँकेत आलो होतो. आज याच बँकेत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यासाठी उपस्थित राहण्याचा मला योग आला. ही माझ्या जीवनातील अविस्मरणीय अशी ठेव आहे. बँकेने सर्वसामान्य सभासदांना उर्जितावस्था प्राप्त करून दिली आहे. अनिस नायकवडी, शिक्षणाधिकारी योजना. जिल्हा परिषद सातारा.

सुसंस्कृत पिढी घडवणे शिक्षकांचे काम

समृद्ध आणि सुसंस्कृत समाज घडायचा असेल, तर शिक्षकाचे काम खूप महत्त्वाचे आहे. शिक्षकांनी बालवयापासूनच विद्यार्थ्यांना सुसंस्कारित केले, तर भावी समाज विनयशील, संस्कारशील, गुणवत्तापूर्ण लोकशाहीची मूल्ये जपणारा तयार होईल, असे मत प्रसिद्ध व्याख्याते सचिन गोसावी यांनी व्यक्त केले.

 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!