कराड/प्रतिनिधी : –
लवणमाची (ता. वाळवा) येथील प्राथमिक शाळेमध्ये ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत क्रीडा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
ग्रामीण जागरूकता : दादासाहेब मोकाशी कृषी महाविदयालय, राजमाची (ता. कराड) येथील सातव्या सत्रातील कृषिकन्यांनी क्रीडा उत्सव आयोजित केला होता. यावेळी महाविदयालय प्राचार्य डॉ. किरण बुटुकडे, प्रा. विनोद माने, डॉ. शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.
कृषिकन्यांचा सहभाग : या कार्यक्रमास कृषिकन्या वैष्णवी निकम, हर्षदा शिरतोडे, सानिया सुतार, प्रत्ता पिसाळ, धनश्री पाटील व प्राजक्ता मोहिते यांच्यासह मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.
