कराड/प्रतिनिधी : –
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड शहर व परिसरातील व्यापारी, व्यावसायिक, तसेच थेट नागरिकांच्या घरी जावून भेटी देत संवाद साधला.आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या या दौऱ्यात कराडमधील नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद देत बाबांना बहुमताने निवडून देण्याचा निर्धार केला.

बाबांनी केलेल्या विकास डोळ्यांनी दिसतोय : शहरातील सुद्य नागरिकांनी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात केलेला विकास प्रत्यक्ष डोळ्याने दिसत असल्याचे बोलून दाखवले. मात्र, विरोधकांनी विकासाची पोस्टरबाजी केली आहे. याचा तुलनात्मक विचार करता पृथ्वीराजबाबांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार ठिकठिकाणच्या भेटीदरम्यान नागरिकांनी केला.
कराडचा चेहरामोहरा बदलला : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा स्वच्छ प्रतिमा, निष्कलंक कारभार व उत्तम प्रशासक म्हणून देशात लौकिक झाला. सहाजिकच कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा विकास करण्यात पृथ्वीराजबाबांना यश आले आहे. त्यांनी कराडमध्ये मध्यवर्ती बसस्थानक, सुसज्ज प्रशासकीय इमारत, पोलीस वसाहत, कृष्णा नदीकाठी संरक्षक भिंत, शहराला जोडणाऱ्या पाच प्रमुख रस्त्यांचे विस्तारीकरण, भूकंप संशोधन केंद्र, एम – एच ५० व आरटीओ ऑफिस, शासकीय कृषी महाविद्यालय या प्रमुख गोष्टी उभारत कराड शहराचा चेहरामोहरा बदलला.
कराड जिल्हा करण्यासाठी पायाभूत सुविधा : माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड जिल्हा करण्यासाठी लागणाऱ्या सर्व पायाभूत सुविधा उभारत कराडकरांना विश्वास दिला. या बळावर पृथ्वीराज चव्हाण यांना कराड शहरात प्रचारादरम्यान संवाद साधताना प्रतिसाद मिळत आहे. त्यांनी शहरातील व्यापारी, व्यावसायिक ते थेट नागरिकांच्या घरी जावून भेटी दिल्या. प्रत्येक ठिकाणी त्यांचे नागरिकांनी उस्फूर्तपणे स्वागत केले. ठिकठिकाणी सुज्ञ नागरिकांनी आपल्या भावना मांडल्या.












