सुझलॉन फौडेशने रक्तदान शिबीराद्वारे जोपासली सामाजिक बांधिलकी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

सुझलॉन फौडेशनच्या रक्तदान शिबीरास उत्स्फुर्त प्रतिसाद

कराड/प्रतिनिधी : –

सुझलॉन एनर्जी लि. व सुझलॉन फौडेशनचे संस्थापक स्व.तुलसीभाई तांती यांच्या जयंतीनिमित्त कराड येथे आयोजित रक्तदान शिबीरात सुझलॉन मधील विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संस्था प्रतिनिधी व रक्तदात्यांनी रक्तदान केले.

प्रमुख उपस्थिती : कृष्णा हॉस्पिटलमधील कृष्णा रक्तपेढी आणि यशवंत रक्तपेढी यांच्या सहकार्याने आयोजित या रक्तदान शिबीरास सुझलॉन फौडेशन सीएसआर महाराष्ट्र प्रमुख संजय शिवदास, सुहास कापूरकर, मनोहर पवार, दत्तात्रय बोबाटे, गोविंद मोरे, डॉ.एस.के. चव्हाण, संध्या पाखले, विवेक चव्हाण, तेजश्री थोरात, ज्ञानदीप संस्थेचे आनंदा थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रेरणादायी कार्य : सुझलॉन फौडेशनने नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासत सेवाकार्य केले असल्याचे सांगताना डॉ. चव्हाण म्हणाल्या, गेली 20 वर्षे रक्तदान शिबीरे आयोजित करुन गरजू रुग्णांच्या रक्ताची सोय केली आहे. विविध गावांत आणि दुर्गम भागात सामाजिक उपक्रम राबविताना आरोग्याच्या सोयी सुविधा देण्याचे त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे. यावेळी रक्तदान केल्यानंतर रक्तामधील विविध घटकांचे महत्व सांगत त्यांनी रुग्णांना काय फायदा होतो, त्याची माहिती दिली.

मनोगत : दत्तात्रय बोबाटे, राजेंद्र शेरखाने यांनी मनोगत व्यक्त करताना रक्तदान सर्वात श्रेष्ठदान असल्याचे सांगितले.

उपक्रमांची माहिती : सुझलॉन फौडेशन सीएसआर महाराष्ट्र प्रमुख संजय शिवदास यांनी प्रास्ताविकात स्व. तुलसीभाई तांती यांनी सुझलॉनच्या माध्यमातून सुरु असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.

स्वागत व आभार : विक्रांत पोटे, अमोल इंगळे, निलेश सावंत, रमेश सुतार यांनी स्वागत केले. गोविंद मोरे यांनी आभार मानले.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

error: Content is protected !!