मलकापुरात रविवारी संत श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळा  

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

१४८ व्या प्रकट दिनानिमित्त विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन 

कराड/प्रतिनिधी : – 

संत परंपरेतील महान विभूती, भक्तांचे श्रद्धास्थान संत श्री गजानन महाराज यांच्या १४८ व्या प्रकट दिनानिमित्त मलकापुरात भव्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. “गण गण गणांत बोते” या जयघोषात हा प्रकट दिन सोहळा भक्तिभावाने साजरा होणार आहे.

वेळ व ठिकाण : हा सोहळा रविवार (दि. ०८) फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजल्यापासून कराड तालुक्यातील मलकापूर येथील श्री संत गजानन महाराज मंदिरात भक्तिमय वातावरणात संपन्न होणार आहे.

मलकापूर : श्री संत गजानन महाराज मंदिर, मलकापूर (कराड) 

सांप्रदायिक भजन : या पावन प्रसंगी विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, परिसरात भक्तीचा जागर अनुभवता येणार आहे. कार्यक्रमाची सुरूवात रविवारी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत होणाऱ्या सांप्रदायिक भजनाने होणार असून, हे भजन हनुमान भजनी मंडळ, साळशिरंबे (ता. कराड) सादर करणार आहे.

महाआरती व महाप्रसाद : यानंतर दुपारी १२ वाजता महाआरती संपन्न होणार असून, भाविक मोठ्या संख्येने या आरतीस उपस्थित राहणार आहेत. दुपारी १२.३० ते २.३० या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

संतविचारांचा जागर : त्यानंतर दुपारी २.३० ते सायंकाळी ४.३० या वेळेत श्री स्वामी समर्थ महिला भजनी मंडळ, मार्केट यार्ड, कराड यांचे सांप्रदायिक भजन होणार असून, या भजनातून संतविचारांचा जागर केला जाणार आहे.

आवाहन : या सोहळ्याचा लाभ भाविकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन श्री संत गजानन महाराज मंदिर, मलकापूर (ता. कराड) चे सेवाधारी हणमंतराव पवार यांच्यावतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क (मो. ९८८१३६५३०८) यांच्याशी संपर्क साधावा.

।। तुच दिले हे जीवन देवा । तुझ्या कारणी पडो

जाता जाता दो हाताने । काही चांगले घडो ।। 

।। मी गेलो ऐसे मानू नका ।। भक्तीत अंतर करु नका ।।

।। कदा मज लागी विसरु नका ।। मी आहे येथेच ।।

।। ऐसे भाषण करुन ।। योगे रोधिला असे प्राण ॥ 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

आणखी वाचा

Buzz4 Ai
error: Content is protected !!