‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉन अवॉर्ड’ने अभिजीत मोकाशी सन्मानित

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

कराड/प्रतिनिधी : –

महाराष्ट्रातील उद्योजकतेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करणारा ‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉन अवॉर्ड २०२५’ मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठानचे जनरल सेक्रेटरी अभिजीत मोकाशी यांना प्रदान करण्यात आला.

भव्य समारंभ : रिसील डॉट इन यांच्यावतीने नाशिक येथील सोमा वाईन व्हिलेज येथे आयोजित भव्य समारंभात प्रसिद्ध सिनेकलाकार प्रार्थना बेहरे यांच्या हस्ते हा बहुप्रतिष्ठित पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.

समर्पित : अभिजीत मोकाशी यांनी हा पुरस्कार आपले वडील, स्वर्गीय शिक्षणमहर्षी दादासाहेब मोकाशी यांना समर्पित केला.

मोलाचा वाटा : आपल्या यशामागे मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ. विश्वजित मोकाशी, कुटुंबीय, तसेच सर्व सहकाऱ्यांचा मोलाचा वाटा असल्याचे त्यांनी नमूद केले.

वाटचाल प्रेरणादायी : कृषी शिक्षण व उद्योग क्षेत्रात श्री. मोकाशी यांची वाटचाल प्रेरणादायी ठरली आहे. मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार कृषी शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

वेगळी ओळख : त्याचबरोबर उद्योग क्षेत्रात नव्याने पदार्पण करणाऱ्यांसाठी मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सातत्यपूर्ण परिश्रम, दूरदृष्टी आणि नाविन्यपूर्ण संकल्पनांच्या जोरावर त्यांनी अनेक तरुणांसाठी आदर्श निर्माण केला आहे.

अभिनंदनाचा वर्षाव : या गौरवाबद्दल मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठानचे संचालक विलास चौधरी, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी, तसेच सहकारी वर्गाकडून श्री. मोकाशी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राज्यभरातील उद्योग क्षेत्रातील मान्यवर, तसेच विविध सामाजिक घटकांकडूनही अभिजीत मोकाशी व डॉ. विश्वजित मोकाशी यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

योगदानाचे फलित : पुरस्काराबाबत प्रतिक्रिया देताना अभिजित मोकाशी यांनी, महाराष्ट्र बिझनेस आयकॉन अवॉर्ड २०२५ हा मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठानमधील प्रत्येक कर्मचाऱ्याच्या योगदानाचे फलित आहे. भविष्यातही सामाजिक बांधिलकी जपत प्रगतीची वाटचाल सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

आणखी वाचा

Buzz4 Ai
error: Content is protected !!