कराड अर्बन बझारच्या उपाध्यक्षपदी मनोज शिंदे बिनविरोध 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

कराड/प्रतिनिधी : –

कराड अर्बन बझारच्या उपाध्यक्षपदासाठी झालेल्या निवड प्रक्रियेत सहकार क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव असलेले मनोज रामदास शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

विशेष सभा : जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सातारा यांच्या दि. १ जानेवारी २०२६ रोजीच्या आदेशानुसार, कराड अर्बन बझारच्या संचालक मंडळाची विशेष सभा गुरुवारी (दि. ५) पार पडली.

एकमताने निवड : ही सभा अपर्णा यादव, अध्यासी अधिकारी तथा उपनिबंधक सहकारी संस्था, कराड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत ग्राहक सहकारी संस्थेचा प्रत्यक्ष अनुभव आणि सहकार क्षेत्रातील भरीव योगदान लक्षात घेऊन सर्व संचालक सदस्यांनी एकमताने मनोज शिंदे यांची कराड अर्बन बझारच्या उपाध्यक्षपदी निवड केली.

मान्यवरांची उपस्थिती : याप्रसंगी कराड अर्बन बझारच्या अध्यक्षा सौ. सायली जोशी, सहाय्यक अधिकारी अर्चना थोरात, तसेच बझारचे सर्व संचालक सदस्य उपस्थित होते.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

error: Content is protected !!