सातत्यपूर्ण अध्ययन हीच यशाची गुरुकिल्ली

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

प्रा. एस.ए. काकडे; सायन्स कॉलेजवर ‘सेट-नेट व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन’ विषयावर व्याख्यान

कराड/प्रतिनिधी : –

विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत आत्मविश्वास, सातत्य आणि वेळेचे योग्य व्यवस्थापन आत्मसात केल्यास यश निश्चित मिळते. सातत्यपूर्ण अध्ययन हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन येथील शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयाच्या भूगोल विभागाचे सहा. प्रा. एस. ए. काकडे यांनी केले.

व्याख्यान : यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स, कराड येथील संगणक शास्त्र विभागात विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘सेट-नेट व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. बी. केंगार होते.

कोणतीही परीक्षा यशस्वीरीत्या पार : सेट-नेट, तसेच विविध स्पर्धा परीक्षांचे स्वरूप, अभ्यासाचे योग्य नियोजन, तयारीची दिशा, वेळेचे व्यवस्थापन आणि यशासाठी आवश्यक असलेली सातत्यपूर्ण मेहनत याबाबत प्रा. काकडे यांनी आपल्या व्याख्यानात सविस्तर मार्गदर्शन केले. योग्य नियोजन आणि सातत्य ठेवले तर कोणतीही स्पर्धा परीक्षा यशस्वीरीत्या पार करता येते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

स्पष्ट दिशा व प्रेरणा : या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी स्पष्ट दिशा व प्रेरणा मिळाल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

मार्गदर्शन : कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन बाळासाहेब पाटील, जनरल सेक्रेटरी अल्ताफहुसेन मुल्ला, विश्वस्त व सदस्य अरुण पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

प्रास्ताविक व आभार : कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगणक शास्त्र विभागप्रमुख श्रीमती अश्विनी नलवडे यांनी केले, तर आभार एस. जी. पड्याळ मॅडम यांनी केले.

उपस्थिती : या मार्गदर्शनपर व्याख्यानाला संगणक शास्त्र विभागातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांसाठी हे व्याख्यान अत्यंत उपयुक्त व मार्गदर्शक ठरले.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

error: Content is protected !!