स्व. जयवंतराव भोसले यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सोमवारी आयोजन
कराड/प्रतिनिधी : –
सहकारमहर्षी स्वर्गीय जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांच्या जन्मशताब्दीनिमित्त यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यावर सोमवारी (दि. 23) दुपारी 2 वाजता व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानात ज्येष्ठ संपादक डॉ. वसंत भोसले हे ‘आजचा महाराष्ट्र’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती कराड तालुका साखर कामगार संघाच्यावतीने देण्यात आली.













