श्रीराम मंदिराचा वास्तुशांत, कलशारोहण व मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

बेलवडे बुद्रुकमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन 

कराड/प्रतिनिधी : – 

बेलवडे बुद्रुक, ता. कराड येथील श्रीराम मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम ग्रामस्थ, भाविक भक्त व देणगीदारांच्या सहकाऱ्यांने पूर्णतः झाले असून उद्या रविवार, दि. 22 डिसेंबर रोजी श्रीराम मंदिराचा वास्तुशांत, कलशारोहण व मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा मोठ्या भक्तीभावात संपन्न होत आहे. या सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे.

भव्य मिरवणूक : या सोहळ्यामध्ये रविवारी सकाळी 6 ते 8 या वेळेत श्रीराम वारकरी शिक्षण संस्था, आरेवाडी यांच्या गजरात गावातून श्रीराम प्रभूंची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. यामध्ये सर्व ग्रामस्थ, बेलवडे बुद्रुक येथील सर्व भजनी मंडळे व ह. भ. प. दिंडीचालक गणेश महाराज साजुरकर यांचा सहभाग असेल.

मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण : रविवारी सकाळी 8.15 ते 11.50 वाजता श्रीराम प्रभूंची मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा ह. भ. प. दिलीप महाराज कापुरकर (कासेगाव) यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. त्यानंतर दुपारी 1 ते 4 वाजेपर्यंत श्री राम मंदिर येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

कीर्तन : सायंकाळी 6 वाजता हरिपाठ होईल. त्यानंतर रात्री 9 वाजता ह. भ. प. भागवताचार्य विष्णुपंत चामणर (गुरुजी) पार्ले, ता. कराड यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे.

आवाहन : तरी भाविक भक्त व ग्रामस्थांनी बहुसंख्येने उपस्थित राहून या सर्व कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन बेलवडे बुद्रुक येथील समस्त ग्रामस्थ, सर्व भजनी मंडळे, सर्व गणेश व दुर्गामाता मंडळे यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

आणखी वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!