कराडमध्ये अपंगांसाठी मोफत कृत्रिम अवयव मोजमाप व वाटप शिबीर

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

अपंगांना स्वावलंबी बनविण्याचा उपक्रम; रोटरी व रत्ननिधी ट्रस्टचा पुढाकार

कराड/प्रतिनिधी : –

अपंग व्यक्तींना स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने रोटरी डिस्ट्रिक्ट 3132 आणि रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कराड येथे अपंगांसाठी दोन दिवसीय मोफत उपकरणे मोजमाप व वाटप शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

वेळ व ठिकाण : हे शिबीर सोमवारी (दि. 9) व मंगळवारी (दि. 10) मार्च रोजी श्री कृष्णाबाई सांस्कृतिक केंद्र (कृष्णाबाई मंगल कार्यालय, जुने), पंताचा कोट, सोमवार पेठ, कराड येथे होणार आहे.

…यांना मिळणार लाभ : या शिबिरामध्ये शरीराच्या विविध भागांना अपंगत्व असलेल्या व्यक्तींना अत्याधुनिक कृत्रिम अवयव तयार करून देण्यात येणार आहेत. त्यामध्ये विशेषतः कोपराखालील भाग नसलेल्या व्यक्तींना कृत्रिम हात, गुडघ्याखाली किंवा मांडीखाली पाय नसलेल्या व्यक्तींना कृत्रिम पाय, तसेच पोलिओग्रस्त अपंगांसाठी कॅलिपर तयार करून देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या उपकरणांचे मोजमाप शिबिरात घेतले जाईल व त्यानंतर योग्य उपकरणे मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

मार्गदर्शन व सहकार्य : या शिबिरासाठी रोटरी डिस्ट्रिक्ट 3132 चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. सुधीर लातूरे यांचे मार्गदर्शन लाभत असून, रोटरी क्लब ऑफ कराड, रोटरी क्लब ऑफ मलकापूर, रोटरी क्लब ऑफ पाटण आणि रोटरी क्लब ऑफ दक्षिण मांड कराड यांच्या संयुक्त सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरामध्ये सहभागी होणाऱ्या लाभार्थींनी आधार कार्ड सोबत आणणे आवश्यक असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.

संपर्क : नोंदणी व अधिक माहितीसाठी रोटरी क्लब मलकापूर – रो. विकास थोरात (9284007730), रो. भगवानराव मुळीक (9175006498), रोटरी क्लब कराड – रो. सुनील चाळके (9822921391), रो. शिवराज माने (9821972469), रो. अनघा बर्डे (9422050985), रोटरी क्लब पाटण – रो. प्रदीप सालवकर (9850094840), रो.डॉ. अर्चना देशमुख (9420850287) या प्रतिनिधींशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आवाहन : अपंग व्यक्तींना दैनंदिन जीवनात स्वावलंबी बनविण्यासाठी आणि त्यांना चालणे-फिरणे सुलभ व्हावे, यासाठी हे शिबीर अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याने परिसरातील गरजू अपंगांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

error: Content is protected !!