कोपर्डे हवेली गटासाठी शाश्वत विकासाचा निर्धार

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

रामकृष्ण वेताळ यांची जाहीर सभेत ग्वाही; करवडीत उमेदवारांच्या प्रचाराला उस्फूर्त प्रतिसाद

कराड/प्रतिनिधी : – 

कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटाचा सर्वांगीण व शाश्वत विकास साधण्यासाठी शासनाच्या विविध योजनांतून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याचा ठाम निर्धार कराड उत्तरचे युवा नेते रामकृष्ण वेताळ यांनी व्यक्त केला.

साथ द्या : कोपर्डे हवेली गटाला सातारा जिल्ह्यातील विकासाचा आदर्श बनवण्यासाठी जनतेने साथ द्यावी, असे आवाहनही रामकृष्ण वेताळ यांनी केले.

जाहीर सभा : करवडी (ता. कराड) येथे कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सौ. विद्या वेताळ, कोपर्डे पंचायत समिती गणाचे उमेदवार अमित पाटील तसेच वाघेरी गणाच्या उमेदवार सौ. नीलम पिसाळ यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

मान्यवरांची उपस्थिती : सभेच्या अध्यक्षस्थानी संजय पाटील होते. यावेळी कोयना दूध संघाचे संचालक सुदाम चव्हाण, कामथीचे सरपंच सुरेश खंडागळे, ज्येष्ठ नेते भानुदास पोळ, सोसायटीचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण, देवानंद चव्हाण, माजी पंचायत समिती सदस्य सुरेश कुंभार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

जनतेचा विश्वास : या सभेसाठी उसळलेली प्रचंड गर्दी हीच जनतेचा विश्वास दर्शवत असल्याचे सांगत रामकृष्ण वेताळ म्हणाले, या विश्वासाचे रूपांतर निश्चितपणे विजयात करून कोपर्डे हवेली गटाला संपूर्ण जिल्ह्यात आदर्शवत बनवण्याचा माझा प्रयत्न राहील.

आवाहन : सभेचे अध्यक्ष संजय पाटील यांनी, श्री. वेताळ यांच्याकडे कोणतेही पद नसताना त्यांनी राबवलेल्या विविध सामाजिक उपक्रमांचा, तसेच मिळवलेल्या विकासनिधीचा आढावा घेतला. विशेषतः दिवाळी भेट उपक्रमाचा उल्लेख करत त्यांनी उमेदवारांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचे आवाहन केले.

स्पष्ट व्हिजन : यावेळी उमेदवार सौ. विद्या वेताळ, अमित पाटील सौ. नीलम पिसाळ यांनी विकासकामांचे स्पष्ट व्हिजन मांडले. शासकीय योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याची दिशा त्यांनी स्पष्ट केली.

रेकॉर्ड ब्रेक गर्दी : सभेला महिला व पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. करवडीतील पटांगणावरील आतापर्यंतची ही सर्वाधिक रेकॉर्ड ब्रेक गर्दी असलेली सभा आहे, अशी प्रतिक्रिया उपस्थित नागरिकांमधून व्यक्त होत होती.

प्रास्ताविक व आभार : कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय पिसाळ यांनी केले, तर आभार उपसरपंच अधिकराव पिसाळ यांनी मानले. सभेला परिसरातील विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सामाजिक जाणिवेचा प्रत्यय देणारा दिवाळी भेट उपक्रम 

रामकृष्ण वेताळ यांनी मतदारसंघातील ज्या कुटुंबांवर दुःखद प्रसंग ओढावला होता व ज्यांच्या घरी यंदा दिवाळी साजरी होणार नव्हती, अशा कुटुंबांसाठी राबवलेल्या ‘दिवाळी भेट’ उपक्रमाचे या सभेत विशेष कौतुक करण्यात आले. या उपक्रमामुळे अनेक दुःखी कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद फुलल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या उपक्रमामुळेच आम्ही वेताळ यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असे मत अनेकांनी व्यक्त केले. 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

आणखी वाचा

Buzz4 Ai
error: Content is protected !!