‘सह्याद्रि’कडून २६.४० कोटींचे ऊस बील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

कराड/प्रतिनिधी : –

ऊस गाळप, साखर उत्पादन आणि आर्थिक व्यवस्थापनात अग्रेसर असलेल्या सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याने सन २०२५-२६ गळीत हगामामध्ये नोव्हेंबर, २०२५ मधील पहिल्या पधरवड्यातील कारखान्याकडे गळीतास आलेल्या ऊसास प्रति में टन ३५०० रुपयांप्रमाणे एकूण २६ कोटी ४० लाख रुपयांच्या ऊस बिलाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक विश्वजीत शिंदे यांनी दिली.

शेतकरी वर्गातून समाधान : कारखान्याने पहिल्या पंधरवड्यात आलेल्या ऊसापोटी प्रति मे टन ३५०० रुपयांप्रमाणे एकूण २६ कोटी ४० लाख रूपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. ‘सह्याद्रि’ने नेहमीची रास्त भाव देण्याची परंपरा याही गळीत हगामात जोपासली आहे. ऊसाच्या बिलाची रक्कम जमा झाल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळालेला आहे.

आवाहन : कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व उस उत्पादक शेतकऱ्यांनी त्यानी पिकविलेला सर्व ऊस सह्याद्रि कारखान्याकडे गळीतास पाठवून जास्तीत जास्त ऊस गळीत होण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे चेअरमन, माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची यशस्वी वाटचाल सरू आहे.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

error: Content is protected !!