अहिल्यादेवी ट्रस्टचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात महान कार्य 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

डॉ. इंद्रजीत मोहिते; पुरस्कार वितरण व गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा उत्साहात

कराड/प्रतिनिधी : –

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा वारसा अहिल्यादेवी ट्रस्टने खऱ्या अर्थाने जपला आहे. शिक्षणाच्या माध्यमातून समाज उत्थान करणारे कार्य हेच राष्ट्रनिर्मितीचे मूळ आहे, असे प्रतिपादन भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. इंद्रजीत मोहिते यांनी केले.

सन्मान व पुरस्कार वितरण सोहळा : अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट, कराड यांच्यावतीने आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा व पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.

प्रत्येक घरात एक ‘अहिल्या’ जन्मावी : डॉ. मोहिते म्हणाले, आज समाजात महान थोर व्यक्तींच्या विचारांचा विसर पडला आहे. अहिल्यादेवी होळकर यांचे दातृत्व, परोपकार आणि दूरदृष्टी यांची तोड नाही. प्रत्येकाच्या घरात जर एक ‘अहिल्या’ जन्माला आली, तर समाज आणि राष्ट्राचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही.

शिक्षणच विकासाचा पाया : ते म्हणाले, अहिल्यादेवी ट्रस्टने करोनाच्या काळातही दुर्गम भागातील विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक साहित्य पोचवले, हे अत्यंत प्रेरणादायी आहे. “शिक्षणापासून वंचित बहुजन समाजाला प्रवाहात आणण्यासाठीचे ट्रस्टचे कार्य उल्लेखनीय आहे. शिक्षणाशिवाय प्रगती नाही, शिक्षणच विकासाचा पाया आहे,” असे त्यांनी अधोरेखित केले.

मान्यवरांचा पुरस्कारांनी गौरव : याप्रसंगी डॉ. दौलतराव आहेर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कराडचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोकराव गुजर यांना राज्यस्तरीय शिक्षणरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच अण्णासाहेब डांगे शैक्षणिक संकुल, आष्टाचे गव्हर्निंग कौन्सिल मेंबर राजेंद्र अण्णासाहेब डांगे यांना समाजरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. तर हर्ष लॉजिस्टिक्स, नवी मुंबईचे चेअरमन सचिन बुरुंगले यांना उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

२२६ विद्यार्थ्यांचा सन्मान : या कार्यक्रमात १६२ विद्यार्थ्यांना शैक्षणिक मानपत्र, ४१ राज्यस्तरीय खेळाडूंना क्रीडा मानपत्र, तसेच २३ राष्ट्रीय खेळाडूंना क्रीडा मानपत्र देऊन गौरविण्यात आले. एकूण २२६ विद्यार्थ्यांचा एकाचवेळी सन्मान करण्यात आला. तसेच, त्रिशताब्दी जयंतीनिमित्त कराड येथे १४१, पुणे येथे ९० आणि मुंबई येथे १४१ महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

मान्यवरांची उपस्थिती : यावेळी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण काकडे, भूमिअभिलेख अधिकारी उल्हासराव वाघमोडे, मलकापूरचे माजी नगराध्यक्ष आबासाहेब गावडे, कृषिरत्न विश्वासराव मोरे, तसेच प्राचार्य भरत बल्लाळ, प्रा. रवींद्र कोकरे, प्रा. साहेबराव चौरे, धोंडीराम जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

परिश्रम : कार्यक्रमाचे प्रास्ताविक ट्रस्टचे अध्यक्ष प्रवीण काकडे यांनी, सूत्रसंचालन प्रा. कुमार देवकाते यांनी, तर एम.डी. दडस यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. शितल काकडे, कैलास काकडे, योगेश कुरले, अंशुमन काकडे, राजवर्धन भोसले, आदित्य भोईटे, सार्थ झेले, तन्मय खरात, आनंदराव कचरे, रामचंद्र पुकळे, सतिश थोरात, महेश जाधव, प्रभाकर कवळे, उमेश हिवरे, उत्कर्ष वाघमोडे व रोहित येडगे यांनी परिश्रम घेतले.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

आणखी वाचा

Buzz4 Ai
error: Content is protected !!