ॲड. संभाजीराव मोहिते; ‘कथा आणि चिंतन’ पुस्तकाचे प्रकाशन उत्साहात
कराड/प्रतिनिधी : –
लेखक चंद्रकांत जाधव लिखित ‘कथा आणि चिंतन’ पुस्तकात जीवनाचे साधे सोपे तत्त्वज्ञान पुस्तकाच्या पानापानांत सांगितले आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. संभाजीराव मोहिते यांनी केले.
पुस्तक प्रकाशन सोहळा : यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन, कराड येथे झालेल्या ‘कथा आणि चिंतन’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
मान्यवरांची उपस्थिती : याप्रसंगी लेखक सुभाष कवडे, शिक्षण मंडळ कराडचे सहसचिव व ‘शब्दवेध’ वाचक चळवळीचे सदस्य राजेंद्र लाटकर, अरुण काकडे, शिक्षणतज्ज्ञ डॉ. राजाराम कुंभार, भारती विद्यापीठाच्या शालेय शिक्षण विभागाचे प्रमुख एम.डी. कदम, माजी सभापती विठ्ठल मुळीक, शाळगावचे सरपंच दत्तात्रय वेदपाठक, माजी सरपंच संभाजी मुळीक, भगवान पाटील, काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष अजित करांडे, विजया वितरण प्रकाशनचे त्रिनेत्रनाथ जोशी, लेखकाचा मित्र परीवार, नातेवाईक मोठया संख्येने उपस्थित होते.
साहित्य विश्वातील वेगळा प्रयोग : ‘कथा आणि चिंतन’अतिशय दर्जेदार पुस्तक असून, मराठी साहित्य विश्वातील एक वेगळा प्रयोग आहे. प्रत्येक कथा चांगुलपणाने भरलेली व जीवनाला होकारात्मक दिशा देणारी आहे. समाजाचे हित साधणारे हे पुस्तक असून, पुस्तकाची भविष्यात अनेक भाषेतून भाषांतर होतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
गाथा पूजन : कार्यक्रमाची सुरुवात जगद्गुरु तुकाराम यांच्या गाथा पूजनाने झाली. प्रास्ताविक राजेंद्र लाटकर, सूत्रसंचालन सुनिता पाटील, त्रिनेत्रनाथ जोशी यांनी आभार मानले.