महाव्यवस्थापक हेमंत तुपे यांची माहिती; प. पु. शिवयोगी विजयलिंग शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते उद्घाटन
कराड/प्रतिनिधी : –
अहिल्यादेवी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, सोलापूरच्या कराड शाखेचा शुभारंभ सोमवार (दि. १७) फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता समर्थ प्राईड, शाहू चौक, कराड येथे संपन्न होणार असल्याची माहिती बँकेचे महाव्यवस्थापक हेमंत तुपे यांनी दिली.

पत्रकार परिषद : नूतन कराड शाखेच्या शुभारंभ कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेचे बोलत होते. याप्रसंगी श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले असून, सर्व हितचिंतकांनी उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी बँकेच्यावतीने केले. यावेळी चंद्रकांत चव्हाण यांची उपस्थिती होती.
मान्यवर : या शुभारंभ समारंभास श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्ट, पुसेगावचे मठाधिपती गुरुवर्य १०८ प. पु. श्रीमहंत सुंदरगिरीजी महाराज यांच्या हस्ते पूजन होणार आहे. तसेच प. पु. शिवयोगी विजयलिंग शिवाचार्य महाराज (महालिंगेश्वर मठ संस्थान, करवडी) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
उपस्थिती : याप्रसंगी अहिल्यादेवी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष अॅड. जनार्दन बोत्रे, तसेच संचालक, सल्लागार, ठेवीदार, खातेदार, अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित राहणार आहेत.
मार्गदर्शन : अहिल्यादेवी बँकेचे कामकाज शिवसमर्थ परिवाराचे कुटुंब प्रमुख अॅड. जनार्दन बोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली चालणार असल्याची माहितीही श्री तुपे यांनी यावेळी दिली.
