ॲड. परवेज सुतार यांची नोटरीपदी निवड

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

कराड/प्रतिनिधी : –

येथील प्रसिद्ध विधीज्ञ ॲड. परवेज अब्दुलरज्जाक सुतार यांची भारत सरकारच्या विधी व न्याय मंत्रालयाने नोटरीपदी नियुक्ती केली आहे. त्यांना ऑनलाईनद्वारे नोटरी अधिकारी म्हणून निवड झाल्याचे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.

24 वर्षे विधीज्ञ म्हणून सेवा : केंद्र सरकारच्या विधी व न्याय मंत्रालयाच्यावतीने विविध ठिकाणच्या नोटरी अधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये कराड येथील विधीज्ञ ॲड. परवेज सुतार यांचा समावेश आहे. ॲड. सुतार हे कराड येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात विधीज्ञ म्हणून काम करीत आहेत. गेल्या 24 वर्षांत त्यांनी अनेक दिवाणी व फौजदारी खटले यशस्वीरित्या हाताळले आहेत. 

सामाजिक कार्याचे आवड : ॲड. परवेज सुतार यांना सामाजिक कार्याचीही विशेष आवड आहे. विजय दिवस समारोह समितीचे ते सक्रिय सदस्य आहेत. तसेच रोटरी क्लब ऑफ कराडचे ते पदाधिकारी होते. सध्या ते कराड तालुक्यातील अनेक वित्तीय संस्थांचे कायदेशीर सल्लागार म्हणून काम पाहत आहेत.

मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा : ॲड. परवेज सुतार यांची भारत सरकारच्या नोटरीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे विजय दिवस समारोह समितीचे अध्यक्ष कर्नल संभाजीराव पाटील, ॲड. अमोल सिकची, विक्रम खटावकर, अमित पवार, निसार शेख, फिरोज शिकलगार, इंजि. सादिक पठाण, जावेद पठाण, उद्योजक जीवन सावंत आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. 

 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!